Author:

Praveen Dixit

Articles

इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर

By on May 18, 2023

इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकर 

प्रवीण दीक्षित

अध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक

अनेक इतिहासकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना इतिहासकार समजण्यास नाखूश असतात. परंतु सुप्रसिद्ध रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई एकदा वीर सावरकर ह्यांना मुद्दाम भेटायला गेले असतांना त्यांनी सांगितले की, ‘‘सावरकर, आपण इतिहासातील घटनांची जंत्री देणारे नसून आपण इतिहास निर्माण करणारे आहात.’’ वीर सावरकर ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांना भारत सोडायला लावण्यात महान कारवाई तर केलीच पण त्याशिवाय वसाहतवादी इंग्रज आणि इतर युरोपियन तसेच इंग्रजांच्या प्रोत्साहनाने स्वतःला इतिहासकार म्हणविणार्‍या पण खर्‍या इतिहासाची पूर्वग्रहदूषित मांडणी करणार्‍या भारतीय व तत्सम अन्य तज्ज्ञांचेही दावे हे सत्यावर आधारीत नाहीत हे सप्रमाण दाखवून दिले. 

वीर सावरकर ह्यांचे ठाम मत होते, जे देशवासीय जागरूकपणे आपल्या इतिहासाची माहिती करून घेत नाहीत, त्यांचे भविष्य हे अंधारमय आहे.  देशाने आपल्या इतिहासाची चोख माहिती ठेवावी परंतु, पूर्व इतिहासाचे गुलाम होऊ नये. वीर सावरकरांच्या मते छत्रपती शिवाजी महारांजांच्या वेळेस मोगलांचा विरोध हा त्या वेळेप्रमाणे न्याय्य व योग्य होता. परंतु तीच भावना आज कायम ठेवणे हे अयोग्य आणि वेडेपणाचे होईल.

  वीर सावरकरांनी त्यांच्या काळात असलेले इतिहासाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी संशोधन करून व अत्यंत परखडपणे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताचा खरा इतिहास लोकांपुढे ठेवला. वीर सावरकर आपल्या प्रत्येक लिखाणात प्रभावीपणे सांगतात, ‘‘इतिहासाच्या तीन सहस्र वर्षात प्रबळ राजकीय शत्रूंवर हिंदू राष्ट्राने वारंवार विजय मिळवून ‘हिंदू हे गुलाम रहायलाच योग्य आहेत.’ हा अपसमज दूर केला. अलेक्झांडरच्या यावनी सैन्याने हिंदुस्थानवर स्वारी केली त्यावेळेस त्यांना दाती तृण धरायला लावून हिंदुकुश पर्यंत पिटाळून लावले. प्रलयकारी हूणांच्या हल्ल्यात रोमन साम्राज्याचा चक्काचूर होऊन गेला पण त्याच हूणांना हिंदू राष्ट्राने पूर्णपणे नाहिसे करून टाकले. त्यानंतर आलेल्या शक, कुशाणांच्या बरोबर चाललेल्या तीन शतकांच्या युद्धात शेवटी शक, कुशाण कोण होते ते प्रदर्शनात दाखवण्यापुरते सुद्धा उरले नाहीत. पुढे मुसलमानांच्या हल्ल्यामधे सारे भारतवर्ष मुस्लिमांनी ग्रासून टाकले. पण वीर सावरकर सप्रमाण दाखवून देतात की, जसे राहू सूर्यास ग्रासतो तसे केवळ ग्रहणकाळापुरते संधी मिळताच हिंदूंनी मसलमानांना ‘दे माय धरणी ठाय’ केले. मोगली तख्ताच्या ठिकर्‍या उडविल्या. व सर्वात शेवटी ज्या समुद्रातून ब्रिटिश भारतावर चढून आले त्या समुद्रातच त्यांच्या साम्राज्य सत्तेला भारताने बुडवून टाकले. वीर सावकर आग्रहाने सांगतात, ‘‘Survival of the fittest — आम्ही हिंदू श्रेष्ठतम होतो म्हणून, जगावयास योग्य ठरलो.’’

 वीर सावरकर ह्यांनी सप्रमाण दाखवून दिले, हिंदुस्थानला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी मराठ्यांनी, भारताच्या सर्व भागांमध्ये चढाई केली व तिथे न्यायावर आधारित प्रशासन निर्मिती केली. अनेक इतिहासकारांनी मराठ्यांना पेंढारी, लुटारू म्हणून संबोधले परंतु, हे धादांत खोटे होते. हे त्यांनी दाखवून दिले.

आजही इंग्रज इतिहासकारांच्यावर विश्वास ठेऊन 1857 मधे केवळ शिपायांचे बंड झाले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकजण करत असतात परंतु, 1857 मधे इंग्रजांच्या विरुद्ध झालेले ते स्वातंत्र्यसमर होते हे अनेक इंग्रज इतिहासकारांच्याच पुस्तकांतून व तथ्यांच्या आधारे दाखवत अत्यंत कोवळ्या वयाच्या वीर सावरकरांनी अतुलनीय असे काम केलेले आहे. ह्‌या त्यांच्या लिखाणामुळे भारतातील सर्व ठिकाणच्या तरुणांमधे, विचारवंतांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व ‘‘ पूर्व दिव्य ज्यांचे , रम्य त्यांना भाविकाळ’’ ह्यावर वीर सावरकरांनी शिक्कामोर्तब केले. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजच्या स्मृतिदिनी त्यांच्या या द्रष्टेपणाला विनम्र अभिवादन!

——————————————–

 

 

 

Articles

एक संवेदनशील खटला

By on May 10, 2023

मुंबईत चालत्या गाडीत एका 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर सामुहिक बलात्काराचा आरोप असलेल्या दोघांना जामीन मंजूर करताना हायकोर्टानं मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. इतक्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाचा इतक्या हलगर्जीपणानं तपास केल्यामुळेच आरोपी आज मोकाट असल्याचा शेरा मारत याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित अधिका-यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही जारी केले आहेत.
‘पोक्सो’शी संबंधित प्रकरणात दोन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. सबळ पुराव्यांचा अभाव आणि तिस-या आरोपीला काही दिवासंपूर्वी मंजूर झालेल्या जामीमाचा आधार आरोपींनी या याचिकेत दिला होता. यावर न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाईंसमोर सुनावणी झाली होती.

काय आहे प्रकरण ? –
मानखुर्द पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 जुलै 2020 च्या रात्री साडे 10 वाजता शिवाजी नगर इथं आपल्या एका मित्राला भेटून 14 वर्षीय पीडिता तिच्या नातेवाईकांच्या घरी निघाली होती. त्यावेळी तीन अनोळखी लोकांनी तिला आपल्या गाडीत लिफ्ट दिली आणि तिला वाशी टोल नाक्याच्या दिशेनं घेऊन गेले. मात्र अचानक ते माघारी फिरले आणि वडाळ्याच्या दिशेनं निघाले. वाटेत त्यांनी चेंबर पेट्रोल पंपवर सीएनजी भरण्याकरता गाडी थांबवली होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार त्या तिघांनीही आळीपाळीनं तिचा बलात्कर केला, आणि नंतर तिला मानखुर्दला सोडून निघून गेले.
मुंबई पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे –
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या अल्पवयीन पीडितेनं दंडाधिका-यांना दिलेल्या जाबानीत म्हटलं होतं की तिनं या तिघांना कधीही पाहिलेलं नव्हतं. गाडीत हे तिघेही एकमेकांना टोपण नावानं हाक मारत होते. मात्र तपास अधिका-याला आरोपींची ओळख नीट तपासून घेण गरजेचं वाटलं नाही. पोलीस निरिक्षक पदावरील या अधिका-यानं अल्पवयीनं पीडितेला पोलीस ठाण्यात बोलावून आरोपींची ओळख परेड घेतली होती. पोलिसांची कामाची ही पद्धतच मुळात चुकीची आहे.
ही भयंकर घटना चालत्या गाडीत घडली होती, मात्र तपास अधिका-यानं गाडी हस्तगत केल्यानंतरही तिची न्यायवैद्यक चाचणी करणं जरूरी समजलं नाही. त्यामुळे सीमन, केस, ठसे असा आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे उपलब्ध नाही. पोलिसांनी त्या सीएनजी पंपवरील कर्मचा-याचा जबाब नोंदवला. ज्यानं ती गाडी त्या रात्री तिथं आल्याचं कबूल केलं, मात्र पीडिता त्या गाडीत बसली होती असंही त्यानं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे. मात्र तिला जबरदस्तीनं बसवलं होतं, असं पोलिसांच्या तपासात कुठेही समोर येत नाही. त्यामुळे इतक्या गंभीर गुन्ह्याच्या इतक्या हलगर्जीपणानं तपास केल्यामुळेच आरोपी मोकाट असल्याचा ठपका ठेवत याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना लक्ष घालण्याची सूचना हायकोर्टानं केली आहे.
On the other hand, the prosecutor is of the following opinion:
The lordships have discussed about the evidence in detail….it is not permissible…in considering bail application…non conducting of TIP is not a big issue… identification of the accused in the dock in the trial is more important…TIP is just an assistance to prosecution….a corroborative piece of evidence…what is important is the substantive piece of evidence…i.e.the Statement of the victim… because that is paramount .
While enquiry is ordered by CP Mumbai in the matter, the IO should’ve followed the SOP & summoned the forensic experts to assist in collection of biological evidence & completed investigation under the direction of senior officers.

Articles

पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या हत्या

By on May 9, 2023

पाकिस्तानमध्ये एकानंतर एक अशा चार बड्या दहशतवाद्यांची अज्ञातांनी हत्या केल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयची (ISI) झोप उडाली आहे. या चार दहशतवाद्यांना कुणी मारलं हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे ISI कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला स्पेशल कमांडोची सुरक्षा देण्यात आली असून त्याच्या निवासस्थानाच्या सुरक्षेतही वाढ केल्याची चर्चा आहे. दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याला आयएसआयची सुरक्षा असल्याची माहिती आहे. तसेच इतर काही दहशतवाद्यांच्या सुरक्षेतही पाकिस्तानने वाढ केल्याची माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये खलिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंग पंजवार यांची लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याआधी इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट IC 814 अपहरण करण्याच्या बदल्यात सुटका करण्यात आलेला कुख्यात दहशतवादी जहूर मिस्त्री याचीही कराचीतील अख्तर कॉलनी येथील घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरही जहूर मिस्त्रीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. त्याआधी काश्मीरमधील अल बद्र नावाच्या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर खालिद रझा याचीही पाकिस्तानातील कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.

खालिद हा काश्मीरमध्ये दहशतवादी कमांडर होता. यानंतर तो कराचीला गेल्याची माहिती आहे. कराचीमध्ये तो खाजगी शाळांच्या फेडरेशनचा उपाध्यक्ष होता. कराचीमध्ये राहत असताना त्याने दहशतवाद्यांची भरती केल्याची माहिती आहे. याआधी हिजबुलचा दहशतवादी बशीर पीर रावळपिंडीत ठार झाला होता. जानेवारीमध्ये भारत सरकारने घोषित केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत त्याला टाकण्यात आले आणि काश्मीरमधील त्याची मालमत्ताही जप्त करण्यात आली.

एकामागोमाग चार दहशतवाद्यांना ठार मारल्याने आयएसआयला धक्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांची सुरक्षा वाढवली आहे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमच्या संरक्षणासाठी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. दाऊदला पाकिस्तानी लष्कराने एक बुलेट प्रूफ वाहन आणि टीम दिली असल्याची माहिती आहे.

दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असून घटनेपासून तो पाकिस्तानमध्ये आश्रय घेत आहे. तिथे बसून दाऊद भारतातही आपले काळे धंदे चालवत आहे.

गुप्तचर अहवालानुसार, कारागृहात कथितरित्या उपस्थित असलेल्या सय्यद सलाहुद्दीनसह इतर काही दहशतवादी नेत्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. जेणेकरून कारागृहात असताना त्यांच्यावर कोणताही हल्ला होऊ नये.

तेहरिक-ए-तालिबानवर हत्येचा संशय

या दहशतवाद्यांच्या हत्येत तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसह अन्य काही दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला आहे. मारले गेलेले आणि आता ज्यांना संरक्षण पुरवण्यात आलेले असे सर्व दहशतवादी भारतात वॉन्टेड आहेत, त्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे.