निसर्गाने भारताला तीन बाजूंनी समुद्र वलयाचे फार मोठे वरदान दिलेले आहे. समुद्रातून होणारा व्यापार, समुद्रातील जलजीव तसेच समुद्राच्या तळामधे असलेले तेल, खनिजे ही भारताच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. भारतातील मत्स्य व्यवसाय आज निर्यातीमधे अत्यंत महत्त्वाचा हिस्सा बनला....