प्रवीण दीक्षित
पोलीस महासंचालक (निवृत्त)
सध्या संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांच्या निवडीसाठी मुलाखत घेणे चालू आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यापूर्वी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 30 ते 45 मिनिटे मुलाखत घेतली जाते. पूर्वी ही मुलाखत संघलोकसेवा आयोगातर्फे इंग्रजीत घेतली जात असे; व…