Author:

Praveen Dixit

Articles

लोकप्रतिनिधी व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक श्री दीपकजी पायगुडे ह्यांनी पाठवलेले शुभेच्छा पत्रः

By on July 29, 2025

लोकप्रतिनिधी व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक श्री दीपकजी पायगुडे ह्यांनी पाठवलेले शुभेच्छा पत्रः
सन्माननीय श्री.प्रवीणजी दिक्षित साहेब
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘सुपर कॉप’ म्हणून ख्याती मिळवलेले माजी पोलिस महासंचालक श्री.प्रवीणजी दिक्षित साहेब आज आपला वाढदिवस.पोलीस खात्यात सर्वोच्च मानले जाणारे पद म्हणजे ‘पोलीस महासंचालक’ . प्रचंड मेहनत व कष्टाच्या जोरावर आपण हा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवून घेतला आहे.
आपल्या संपूर्ण जीवनक्रमाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आपले संगोपन झाले. वडील प्राध्यापक असल्याने जगण्यात एक विलक्षण शिस्त दिसून येते.वडिलांना प्रचंड मोठ्या वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागले.पुढे सेवेत रुजू झाल्यानंतर आपली पोस्टिंग लेह व लडाख येथे झाली. येथील सविस्तर वृत्तांकन आपण वाचकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘नाते लडाखशी’ या पुस्तकात केले आहे.
आपल्यातील असलेल्या गुणवत्तेच्या जोरावर सॅनफोर्ड स्कुल ऑफ पब्लिक पॉलिसी नॉर्थ कॅरोलोना यूएसए येथून जागतिक शांतात व संघर्ष यात फेलोशिप मिळवली. जेएनयू या नामवंत महाविद्यालयात शिक्षण घेण्याची संधी आपण मिळवली. अभ्यासू व्यक्तिमत्व आपले असल्याने इंटरनॅशनल पॉलिटिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण मेहनतीने पूर्ण केले.
आपल्यातील गुणवत्ता व मेहनतीच्या जोरावर यू पी एस सी सारखी परीक्षा आपण प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालात.१९७७ मध्ये आयपीएस या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आणि शिस्तबद्ध जीवनशैलीतून हा पोलीस दलातील प्रवास सुरु झाला. या प्रवासात सर्वोच्च शिखर गाठत ते पोलीस महासंचालक या पदापर्यंत पोहोचले.
ह्या पदापर्यंत पोहचण्याच अगोदर महाराष्ट्र राज्य लाच लुचपत विभागाचे प्रमुख म्हणून अत्यंत जबाबदारीने आपण ही धुरा सांभाळली. या कालावधीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले व संपूर्ण महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या प्रयत्नात आपला मोलाचा वाटा आहे.
पोलीस महासंचालक हे पद सांभाळत असताना ह्या पदासोबत आणखी किती जबाबदाऱ्या येत असतील , याची जाणीव आम्हाला आहे. हे फक्त मानाचे पद नव्हे तर संपूर्ण राज्यातील पोलीस दलाची जबाबदारी अंगावर पेलणे होय. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्याहून अधिक संघर्ष या पदाच्या कार्यादरम्यान करावा लागतो. हे पद म्हणजे एक प्रकारचा काटेरी मुकुटच असतो.
आपल्या मार्गदर्शनाखाली ईगल ब्रिगेड फॉउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी 2015 ते आजपर्यंत ‘पोलीस मित्र’ या चळवळीत आघाडीवर योगदान दिले आहे.
आपण आजवर केलेला प्रवास आज असंख्य तरुणांना नवसंजीवनी देणारा आहे.आपल्या केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन अनेकांच्या जीवनाला आकार येणार आहे.

पुढील वाटचालीसाठी वाटचालीसाठी आपणास खूप खूप सदिच्छा. पुनः श्च एकदा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपला कृपाभिलाशी
दीपक पायगुडे
संस्थापक अध्यक्ष
लोकसेवा शैक्षणिक संकुल
पुणे

Articles

विशेष जन सुरक्षा विधेयक 2025

By on July 12, 2025

विशेष जन सुरक्षा विधेयक 2025

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलीस महासंचालक

दिनांक 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेने बहुमताने व दिनांक 11 जुलै 2025 रोजी विधान परिषदेने बहुमताने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकास मान्यता दिल्याने राज्यपालांच्या मंजूरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग खुला झाला आहे.  सदर विधेयकाची आवश्यकता स्पष्ट करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी सांगितले की, देशाातील काही राज्ये नक्षलग्रस्त किंवा माओवादी यांच्या कडव्या डाव्या विचारसरणीचे बळी ठरले होते.  सुरवाीलाा बंदूका हातात घेऊन भारतीय संविधानाने उभी केलेली व्यवस्था आम्हाला मान्य नाही व आम्हाला साम्यवादी व्यवस्था उभी करायची आहे ह्या विाचारातून ह्या संघटना तयार झाल्या होत्या. भारत सरकारने नक्षलवाद 31 मार्च 2026 पूर्वी संपवायचा निश्चय करून कठोर कारवाई केल्यानंतर माओवाद्यांनी वेगळे तंत्र वापरायला सुरवात केली होती. जेव्हा सक्रीय नक्षलवादी मिळत नाहीत तेव्हा, निष्क्रीय नक्षलवादी तयार करायचे ह्यातून मोठ्या प्रमाणात जनसंघटना तयार करायच्या.  त्यांची नावे वाचल्यावर ह्या लोकशाही वाचविण्यासाठी आहेत असे वाटते, पण त्यांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मान नाहीत आणि त्या संघटना भारताचे संविधानही मानत नाहीत हे अधोरेखित होते, हे मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी स्पष्ट केले. भारतीय संविधान व्यवस्था उलटवून लेलिन, मार्क्स, माओ ह्यांनी चीनमधे उभी केलेली व्यवस्था भारतात उभी करायची हा ह्या संघटनांचा विचार आहे.

ह्यापूर्वी अशाप्रकारचा कायदा छत्तिसगड, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड ह्या राज्यांनी केला आहे. असा कायदा केला पाहिजे असे केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना सांगितले आहे. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकरणांमधे युएपीए लावणयात होता. पण जोपर्यंत सक्रीय दहशतीची कारवाई होत नाही तोपर्यंत युएपीए लावता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना चार राज्यांप्रमाणे कायदा तयार करण्यास सांगितले. युपिए सरकारने लोकसभेमधे दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात पुढील संघटना हया घटनाविरोधी कारवायांमधे सक्रीय असल्याचे आढळते. त्या अशाः दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना, क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना,  रेव्होल्यूशनरी डेमोक्रेटिक फ्रंट, विरोधी सांस्कृतिक चळवळ, इंडियन असोसिएशन ऑफ पिपल्स लॉयर, कमिटी अगेन्स्ट व्हॉयलन्स अगेन्स्ट विमेन्स आणि कबीर कला मंच.

ह्या विधेयकाचा कोणताही दुरुपयोग होणार नाही हयाची ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘‘हा कायदा महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी व भारतीय संविधानााच्या विरोधात जे युद्ध पुकारू इच्छितात त्यांच्या विरोधात  तयार केलेला आहे.’’

जनसुरक्षा कायद्याप्रमाणे कोणत्याही कडव्या विचारांच्या संघटना जर सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवाा राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरत असेल तर त्यांना ताब्यात घेण्याची तरतूद आहे. एखा्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येणार आहे. तसेच त्या संघटनेचे कार्यालय, परिसर, इतर सम्पत्ती जप्त करता येईल. बेकायदेशीर जाहीर झालेल्या संघटनांची बँकेतील खाती गोठवता येतील. बंदी घातलेल्या संघटनेचे पदाधिकारी, कर्यकर्ते नव्या नावाने संघटना उभारून हेच कार्य करत असतील तर नवी उभारलेली संघटना ही मूळ बेकायदेशी सम्पत्तीचा भाग समजून बेकायदेशीर ठरवली जाईल.

कोणत्याही संघटना बेकायदेशीर आहेत असे शासनाने घोषित केल्यानंतर नेमण्यात आलेल्या सल्लागार मंडळाकडून त्याची विशेष तपासणी केली जाईल.सदर गुह्न्याचा तपास उप पोलीस अधीक्षक अधिकारी करेल. सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सेवानिव़ृत्त न्यायाधीश अध्यक्ष असतील व त्या शिवाय सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हे त्या समितीचे सदस्य असतील. गुह्ना दाखल होण्यापूर्वी पोलीस उप महानिरीक्षक ह्यांची मान्यता घेणे अनिवार्य असेल.

सदर विधेयक विधान सभेत चर्चेस आले असताना विरोधी पक्षांनी त्यास कोणताही आक्षेप घेतला नाही. परंतु विधान परिषदेत सभात्याग करून एका पत्राद्वारे पुढील आक्षेप नोंदवलेः बेकायदेशीर कृतीच्या संदिग्ध आणि व्यापक व्याख्या, जप्‌ती आणि अटकेचे अनियंत्रित अधिकार, जिल्हा न्यायालयांना पूर्णपणे वगळणे, सल्लागार मंडळाच्या रचनेत स्वतंत्र देखरेखीचा अभाव, योग्य प्रक्रियेशिवाय व्यापक पाळत ठेवणे, आणि आर्थिक जप्तीचे अधिकार, समितीची अपारदर्शक आणि बहिष्कृत कार्यप्रणाली, समितीकडे आलेल्या हरकतींपैकी 9500 हरकती ह्या हे विधेयक रद्द करावे अशी मागणी करणार्‍या होत्या पण त्यांची दखल घेण्यात आली नाही.

वरील हरकती सखोलरीत्या तपासल्यास स्पष्ट आहे की, बेकायदेशीर कृत्ये ह्यांची व्याख्या सुस्पष्ट आहे व ज्या घटनाविरोधी, लोकशाही विरोधी व घटनेने स्थापन केलेली व्यवस्था उलथून टाकण्यासाठी अशी जी कृत्ये असतील त्यांनाच बेकायदेशीर कृती असे म्हटले आहे. सल्लागार मंडळ हे कायद्याने स्थापन केलेले विशेष मंडळ असल्यामुळे जिल्हा न्यायालयांना वगळण्याचा मुद्दा गैरलागू आहे. सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश व उच्च न्यायालयातील सरकारी वकील सदस्य असल्यामुळे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही. सदर विधेयकास विरोध करण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे नसल्यामुळे विरोधकांचे आक्षेप हे निराधार आहेत. ह्या कायद्याचा लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍यांच्या विरुद्ध वापर होऊ नये यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे कोणत्याही संस्थेस गैरकायदेशीर जाहीर करण्यापूर्वी सर्व उपलब्ध पुरावे ह्या कायद्याने प्रस्थापित विशेष सल्लागार मंडळापुढे ठेवावे लागतात. ह्या सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सदस्य आहेत व त्यांना त्याचे प्रमुख करण्यात आले आहे. सल्लागार मंडळाने मान्य केल्यानंतरच एखादी संस्था गैरकायदेशीर म्हणून जाहीर होते व त्यांच्या बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करणे शक्य होते. त्यामुळे ह्या कायद्याचा गैरवापर होईल अशी हाकटी पिटणार्‍यांना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अशा प्रकारचा कायदा उपलब्ध नसण्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व अन्य अनेक ठिकाणी शहरी माओवादी वेगवेगळ्या माध्यमातून सार्वजनिक सभा घेऊन गैरकायदेशीर कृत्यांना राजरोस प्रोत्साहन देत आहेत. Tata Institute of Social Sciences (TISS) सारख्या केंद्रीय संस्था, राज्यातील अनेक विद्यापीठे व वसतीगृहे ह्या ठिकाणी अशा गैर्‍कायदेशीर कारवायांना प्रोत्साहन द्यायचे अड्डे बनले आहेत व त्यातून तरुणांमधे जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक दंगली पसरविणे, गैरकायदेशीर कृत्यांसाठी नेतृत्त्व निर्माण करणे, निधी व रसद गोळा करणे अशा कारवाया चालू आहेत.

विरोधी पक्षांच्या मते सध्याचे कायदेच वापरावेत पण सध्याच्या प्रचलित कायद्यामध्ये या गोष्टी चालत असलेल्या दिसत असून देखील प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडे किंवा न्यायसंस्थेकडे पुरेशा तरतुदी नाहीत. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे खून होणे, दहशतवादी कृत्य होणे हे प्रकार चालू आहेत. त्यामुळे ह्या विशेष कायद्याची आवश्यकता होती.

उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी जाहीर केले आहे की ते सदर कायद्याविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार आहेत.त्यामुळे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, की छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्रप्रदेश व अन्य अनेक राज्यांनी `विशेष जनसुरक्षा अधिनियम’ कायदा 2005 नंतर लागू केला आहे.   भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी व शहरी माओवादी सुधा भारद्वाज यांनी People’s Union for Civil Liberties (PUCL) तर्फे छत्तीसगड उच्च न्यायालयात सदर कायदा रद्द करावा, तो बेकायदेशीर आहे, अशाप्रकारचा कायदा करण्यास राज्ये असमर्थ आहेत अशी मागणी केली होती. ह्यासंबंधी 11 एप्रिल 2014 रोजी छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश व अन्य एक न्यायाधीश यांच्या खंडपीठाने हे सर्व आक्षेप अमान्य करत स्पष्ट केले होते की, `लोकांमध्ये भीती व दहशतवाद पसरू नये ह्यासाठी राज्यांनी केलेला कायदा, कुठल्याही प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध नाही, तो तर्काला धरून आहे व त्यात बेकायदेशीर असे काहीही नाही.’ त्यामुळे अशाच प्रकारचा कायदा राष्ट्रविघातक अशा वर उल्लेखलेल्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे.

विशेष जनसुरक्षा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातील काही भागात व अन्य नक्षलग्रस्त भागात डाव्या कडव्या चळवळीस सक्रीय पाठिंबा देणारे व जनप्रक्षोभ निर्माण करून घटनेने स्थापन केलेली लोकशाही व्यवस्था उलथवू पाहणार्‍यांना चाप बसणार आहे; त्यामुले आदिवासी, दलित, मजूर, विद्यार्थी, महिला ह्यांच्या नावाने आक्रोश निर्माण करणे हे ह्या संघटनांना शक्य होणार नाही. सदरच्या कायद्याने महाराष्ट्र व देशातील सुदृढ लोकशाही बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे हे नक्की. विरोधी पक्षांनी सदर विधेयकास पाठिंबा दिला असता तर त्यातून त्यांची लोकशाहीवरील निष्ठा व्यक्त झाली असती. सदर कायद्याचा गैरवापर करण्याचा भाजप प्रणित सरकारचा कोणताही मानस नाही, हे शासनाने वारंवार अधोरेखित केले आहे.

 

_____________ __ ******** ______________

 

Articles

संघ आणि मी

By on June 5, 2025

2025 चे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शतकोत्तर प्रवास सुरू केला आहे. चारित्र्यवान, राष्ट्रप्रेमी लोक निर्माण करणे व त्यातून राष्ट्राचा व जगाचा उत्कर्ष साधणे ह्या ध्येयाने संघाशी निगडित प्रत्येकजण अविरत कार्य करत आहे. राष्ट्रावर मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती आल्यास पीडित व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणे व त्याबद्दल वैयक्तिक फळाची कोणतीही अपेक्षा न करणे हे संघाच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. समाजातील उपेक्षित, वनवासी, दुर्लक्षित अशा व्यक्तींमधे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे व त्यांना सक्षम बनविणे हे काम संघ निरंतर करत आला आहे. विशेष म्हणजे, हे काम करणार्‍या प्रचारकांनी सुशिक्षित असूनही, फायद्याचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही, त्याकडे पाठ फिरवून ह्या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. तळमळीने कार्य करणार्‍या राष्ट्रप्रेमी संघकार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो व भारत-मातेला उच्चासनावर नेण्याच्या त्यांच्या ध्येयाला अभिवादन करतो व त्यांना सुयश इच्छितो.

माझे थोरले भाऊ प्रमोद दीक्षित ह्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्णवेळ प्रचारक म्हणून संघासाठी आयुष्य समर्पित करण्याचे ठरवले व संघाच्या आदेशानुसार ते आसाम मधे रुजू झाले. 1973-74 हे ते वर्ष होते. आम्ही पाच भाऊ होतो. त्यातील एकाने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करावे असे ते आमच्या आईला सांगत असत. पुढे सरसंघचालक बाळासाहेब देवरस हेही आमच्या घरी आले होते. व त्यांनी प्रमोदजी ह्यांनी स्वीकारलेला मार्ग योग्य आहे ह्याला मान्यता दिली होती. आसाममधे शाळा चालवणे, रक्यपेढी चालवणे व इतर लोकोपयोगी कामे करत असताना देशद्रोही उल्फाच्या सदस्यांना मात्र ते खुपत होते. संघाच्या कार्यालयात प्रमोदजी बसलेले असताना बंदूकधारी उल्फा दहशतवादी तिथे आले व प्रमोदजींचे नाव विचारून खात्री झाल्यावर 14 ऑगस्ट 1991 रोजी त्यांच्यावर गोळीबार करून भ्याडपणे त्यांची हत्या करण्यात आली. स्थानिक लोकांनी मात्र प्रमोदजींचे बारपेटा येथे भव्य स्मारक बांधून त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना अमर केले.

1966 साली ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नासाठी आईबरोबर मी नागपूरला गेलो होतो. लग्न झाल्याबरोबर आई मला घेऊन रेशीमबागेत गेली होती व तेथे परमपूज्य संघ संस्थापक डॉ. हेडगेवार ह्यांच्या समाधीचे आम्ही दर्शन घेतले होते. आमचे मूळ गाव भोर. माझे आजोबा भोरचे संस्थानिक पंतसचिव ह्यांच्याकडे काम करत असत. त्यावेळेस रथखाना येथे चालणार्‍या शाखेत जाऊन संघाची प्रार्थना गंभीरपणे म्हणण्याचा प्रसंग आजही माझ्या मनावर कोरलेला आहे.

पुढे भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर माझी पोलीस आयुक्त नागपूर म्हणुन नेमणूक झाली. 2006 साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संघाच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु सतर्क अशा पोलीसांनी त्या सर्वांना थोपवून यमसदनी पाठविल्यामुळे पुढचा भीषण प्रसंग टळला होता. संघकार्यालयाची सुरक्षा हा त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असे. त्या अनुषंगाने मी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ह्यांना भेटायला गेलेलो असताना हसत हसत ते मला म्हणाले, ‘‘पोलीसांशिवाय संघाची सुरक्षा करणारे आजूबाजुचे सर्व लोक सदैव सतर्क असतात व त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला आम्ही सज्ज आहोत.’’

मुंबईत असताना डॉ. मोहनजी वेळात वेळ काढून आमच्या घरी आले होते व जवळ जवळ एक तास त्यांनी मोकळेपणानी गप्पा मारल्या होत्या. संघाची अनेक कामे मी जवळून पाहिली आहेत व चारित्र्यवान लोकांनी ती चालवलेली असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर सतत द्विगुणित झाला आहे.

भारत माता की जय!

नमस्ते सद वत्सले मातृभूमे—–!