१ फौजदार ह्नया प्रतिष्ठित व कठीण परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन
२ त्यांना सहाय्य करणाऱ्या विविध शिक्षक , प्रशासकीय कर्मचारी तसेच त्त्यांयांचे कुटुंबीय ह्यांचे अभिनंदन!
३ निवड झालेल्या उमेदवारांनी वैयक्तिक चारित्र्य निष्कलंक राखणे महत्वाचे आहे
४ मैत्रीण मित्र असणार्यांना लग्नाचे आश्वासन देऊन फसवणुक करू नका. विवाहपूर्व शरीर संबंध ठेवणे कटाक्षाने टाळा . असतील तर त्याच व्यक्तींशी विवाह करा अन्यथा त्यामुळे नोकरी जाऊ शकते.
५ भ्रष्टाचार करण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळा. तुम्हाला फसवण्यासाठी अनेक सापळे मुद्दाम केले जातील .स्वतःवर संयम ठेवा.
६ तुम्ही करत असलेल्या प्रत्येक तपासाचे digital record ठेवा जमेल तेव्हा ते लिहून काढा . आवश्यक असल्यास वरिष्ठांना पाठवा.
७ अकादमीत प्रत्येक विषय समजून घ्या जरूर तर प्रश्न विचारा . तुमच्या शब्दात समजलेला विषय लिहून काढा
८ नवीन तंत्रज्ञान नवीन विषय आत्मसात करा जसे Forensic medicine, artificial intelligence, cyber crimes, economic offences, यांच्यात पारंगत व्हा
९ नेमणुकीच्या ठिकाणी हद्दीतील कार्यालये प्रसिद्ध लोक ह्यांना वारंवार भेटा तुमच्या कार्याची त्यांना माहिती द्या .
१० दैनंदिन गोष्टींबाबत जागरूक रहा . जमेल तेव्हा प्रसार भारती आकाशवाणी च्या माध्यमातून बातम्या पहा/ ऐका
११ अनेक विषय online उपलब्ध आहेत ते मुद्दाम शिकायचा प्रयत्न करा
१२ जमल्यास IB, CBI , NIA सारख्या संस्थांमधे प्रति नियुक्तीवर जा .
१३ मुंबई सकट कुठेही नेमणुकीस तयार रहा . रहायची अडचण वाटली तरी ती सहन करा . मुंबईत राहण्याने तुम्हाला काम शिकायला मदत होईल
१४ तुम्हाला कोणी भ्ष्टाचार करायला लावल्यास त्याची सविस्तर नोंद ठेवा योग्य वेळ येताच त्याचा उपयोग करा.
१५ तुमच्या प्रत्येक कामास तुम्ही जबाबदार आहात व न्यायालयात त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण देयावे लागेल यांचे भान ठेवा
१६ कोठडीतील छळवणूक करू नका. तुम्ही गोत्यात येऊ शकता.
१७ तुम्ही गणवेशात असा किंवा नसा तुमच्यावर केव्हाही जीवघेणा हल्ला होऊ शकतो . त्या साठी सतत तयारीनिशी सुसज्ज रहा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बळीचा वापर करणे ही तुमची जबाबदारी आहे . त्यात कचरू नका.
१८ जे काम तुम्हालाच करायचे आहे ते तातडीने पूर्ण करा. त्या नंतर routine कामे करा अन्यथा वेळ कधीच पूरणार नाही .
१९ प्रामाणिकपणे काम करा
२० आई वडिलांना विसरू नका.
२१ तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर राहून साथ देईल अशा व्यक्तीशी विवाह करा.
तुमचे यश म्हणजे राष्ट्राचे यश हे लक्षात ठेवा .
September 28, 2026
September 28, 2026
July 27, 2026
July 21, 2026
June 23, 2026
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2026 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimited