Browsing Category

Articles

VIEW POST

View more
Articles

तंत्रज्ञानाने चकमकी टाळता येतील

By on October 5, 2024

तंत्रज्ञानाने चकमकी टाळता येतील
         – प्रवीण दीक्षित

                नक्षलवादी, अंडरवर्ल्डशी संबंधित लोक, दहशतवादी यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी, त्यांची माहिती मिळवण्यासाठी यंत्रणा बरेचदा रस्त्यावर उतरते. अशा वेळी असमाजिक तत्त्वांकडून गोळीबार वा अन्य प्रकारच्या हल्ल्याद्वारे पोलिसांना धोका पोहोचवण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराला ‌‘एन्काउंटर‌’ म्हणतात. अलिकडच्या घटना अशा असतात का?

              बदलपूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या आणि संबंधित गुन्हेगार पोलिसांकडून मारला गेल्याच्या घटनेनंतर उठलेले चर्चेचे वादळ खूप मोठे आहे. या एका घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात एन्काउंटर संस्कृती बळावत असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. अशा पद्धतीने गुन्हेगारांना संपवणे योग्य आहे की नाही, यासारखे अनेक विषय चर्चेत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम एन्काउंटर आणि पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेली कारवाई यातील फरक समजून घ्यायला हवा.

              अनेक असामाजिक तत्त्व वेगवेगळ्या कारणांनी पोलिसांवर हल्ला करु शकतात. जसे की, दरोडेखोरांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलीस मागे गेल्यास संशयित दरोडेखोर हल्ला करतात. बरेचदा महिलांना पुढे करुन संशयितांकडून हल्ला केला जातो. अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसाने बेशिस्त वाहनाला थांबवले तर राग धरुन वा नशेच्या अमलाखाली लोक त्यांच्यावर हल्ला करु शकतात. पोलिसाला धक्का देत प्रसंगी गाडीच्या बॉनेटवर चढवून गाडी दामटवत राहतात. दंगल वा दहशत माजवण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरणाऱ्या गटाचे उद्दिष्ट सरकारी संपत्तीचे नुकसान करणे कवा पोलिसांवर हल्ला करणे, त्यांना ठार मारणे असे असू शकते. नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षली चळवळींमध्ये सहभागी असणारे आपल्या सुरक्षित अड्ड्यांवर कारवाई करण्यास येणाऱ्या पोलिसांवर हल्ला करतात. स्वत:जवळचे बाँब, बंदुका वा अशाच घातक शस्त्रांचा त्यासाठी वापर केला जातो. आतापर्यंत सांगितलेल्या या सगळ्या प्रकारांमध्ये शासन व्यवस्था कायम ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने पोलिसांना  शस्त्र दिलेले असते. जमाव हिंसक होऊन नुकसान करत असेल तर त्यावर नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावाच लागतो. अर्थात बळाचा वापर करतानाही तो कमीत कमी आणि योग्य परिणाम होईल, अशा रितीने करण्याविषयी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.

                बदलापूरच्या घटनेतील आरोपीच्या बाबतीतील घटनाक्रम लक्षात घेतला तर त्याने पोलिसाकडील पिस्तुल खेचून गोळीबार करण्यामागे निश्चितच त्यांना जीवे मारण्याचा   प्रयत्न स्पष्ट होता. गाडीमध्ये प्रवास सुरू असताना मध्ये अगदी दोनफूट जागा असल्यामुळे गुन्हेगाराला पिस्तुल खेचणे शक्य होते. या झटापटीतून शस्त्र अनलॉक होऊन तीन वेळा गोळीबार करण्याची घटना घडली. यात सहाय्यक पोलीस निरिक्षक जखमी झाला. अशा परिस्थितीत गुन्हेगाराचा पोलिसांना ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगाराला नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करुन प्रत्युत्तर देणे अत्यावश्यक होते. याला काही एन्काउंटर म्हणता येत नाही. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी नाईलाजाने केलेला हा गोळीबार होता.
आता आपण एन्काउंटर कशाला म्हणतात ते बघू या. नक्षलवादी, अंडरवर्ल्डशी संबंधित लोक, दहशतवादी यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी, त्यांची माहिती मिळवण्यासाठी यंत्रणा जाते आणि वर उल्लेख केलेल्या असमाजिक तत्त्वांकडून त्यांना धोका पोहोचवण्याचा प्रयत्न होतो, म्हणजेच गोळीबार वा अन्य प्रकारचा हल्ला होतो तेव्हा त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराला एन्काउंटर म्हणतात. खरे सांगायचे तर ही एक प्रकारची लढाईच असते. एका बाजूने शस्त्रांचा वापर होत असल्यामुळे पोलिसांना त्यांच्या बाजूने शस्त्रांचा वापर करावा लागतो. म्हणूनच उच्च न्यायालयानेही बदलापूर केसमधील आरोपीच्या संदर्भातील घटनेसाठी ‌‘एन्काउंटर‌’ हा शब्द वापरलेला नाही, उलटपक्षी, हे एन्काउंटर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कैदी तुरुंगात असले तरी विविध कारणांसाठी अनेकदा त्यांना न्यायालयात न्यावे लागते. त्यांना रुग्णालयात न्यावे लागते. अशा प्रसंगी गुन्हेगार डॉक्टरांवर हल्ला करण्याच्या घटना घडू शकतात. संधी मिळाली की ते पळून जाण्याचा प्रयत्न करु शकतात. आत्महत्येचाही प्रयत्न करतात. अशी अनेक उदाहरणे आपल्या वाचनात असतात. अनेकदा तपासात ‌‘सीन रिक्रिएट करणे‌’ हा प्रकार असतो. यामध्ये प्रत्यक्ष गुन्हा घडलेल्या ठिकाणी गुन्हेगारांना न्यावे लागते आणि तिथे त्यांची चौकशी वा विचारपूस करावी लागते. म्हणजेच अशा वेगवेगळ्या कारणासाठी तुरुगांतून बाहेर नेत असताना आरोपींना अन्यांकडून वा आरोपींकडून अन्य लोकांना मोठा धोका असतो. हीच बाब लक्षात घेऊन भारत सरकारने एक जुलै 2023 पासून नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत. त्यात अधोरेखित केलेली बाब सगळीकडे डिजिटलायझेशनचा वापर करण्याची आहे. याचा अर्थ असा की आता प्रत्येक कारागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. याचा वापर करुन तुरुंगात बंदिस्त असणारे आरोपी न्यायाधिशांसमोर साक्ष देऊ शकतात. ते याच पद्धतीने रुग्णालयात डॉक्टरांशी बोलून टेली मेडिसिनचा वापर करु शकतात. नातेवाईक वा अन्य लोकांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधू शकतात. म्हणजेच त्यांना प्रत्यक्ष हलवण्याची कमीत कमी गरज भासते.

                थोडक्यात, भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असणारी ही बाब न्यायाधीश, सुरक्षा अधिकारी, डॉक्टर या सगळ्यांनी लवकरात लवकर आणि ताकदीने आत्मसात करणे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. यात कैदयाची सुरक्षाही अबाधित राहू शकते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे बरेचदा गुन्हेगारांना तुरुंगातून न्यायालयात नेताना संतप्त जनसमुदायाकडून जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता असते. तुरुंगाच्या आवारातच लोकांनी ठार मारलेल्या नागपूर येथील अक्कू यादवची घटना वाचकांच्या स्मरणात असेल. उत्तर प्रदेशमधील एक घटनाही खूप चर्चेत होती. तिथे पूर्वी खासदार असणारा आतिक भयंकर गुन्हेगार म्हणून कुख्यात होता. असा हा माणूस न्यायाधिशांपुढे जाण्यासाठी गाडीतून उतरला आणि त्याच क्षणी बाजूने आलेल्या चार लोकांनी त्याच्यावर गोळीबार केला. म्हणजेच असे प्रकार बरेचदा घडले आहेत. तुम्ही कैद्याला तुरुंगाबाहेर काढता तेव्हा त्याच्या मनात वा त्याच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. स्वाभाविकच निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा परिणाम काय होईल, हेदेखील कोणीच सांगू शकत नाही. म्हणूनच नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पोलिसांना ऐन वेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. तो कोणताही पूर्वरचित कट नसतो तर परिस्थितीमुळे निर्माण झालेली एक समस्या असते. ही बाब स्विकारणे गरजेचे आहे.

या समस्येवर मात करायची तर तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारांसंदर्भातील निर्णय घेणे, तशी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. पूर्वी ही सोयही नव्हती आणि स्वाभाविकच त्याला मान्यताही नव्हती. मात्र आता बदलत्या परिस्थितीत सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली असताना सुनावणी वा अन्य प्रकारांसाठी नव्या तंत्राचा वापर करायला हवा. त्यामुळे गुन्हेगारांबरोबर पोलीस आणि आजूबाजूचा समाजही सुरक्षित राहू शकेल. यातूनच पुढे असे प्रकार वाढत आहेत की कमी होत आहेत, हा मुद्दाच राहणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर केला तर अशा घटनांना कायमस्वरुपी चाप बसेल. त्या कधीच घडणार नाहीत. याच्याशी संबंधित आणखी एक बाब म्हणजे गरज वाटली तर न्यायाधिश स्वत: तुरुंगात जाऊन न्यायालय सुरू करु शकतात. पुण्याला जनरल वैद्य यांच्या खुनाच्या प्रकरणी ही पद्धत अंमलात आणली गेली होती. संबंधित खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या न्यायाधिशांनी येरवड्याच्या तुरुंगातच न्यायालय सुरू केले होते. यामुळे आरोपीला बाहेर काढण्याचा प्रश्न, निर्माण होणारा धोकाच नाहिसा झाला. गडचिरोलीच्या नक्षलवाद्यांबाबतचे अनेक खटले सध्या याच पद्धतीने चालवले जातात. नक्षली नागपूरच्या तुरुंगात असतील आणि न्यायाधिश गडचिरोलीला असतील तर अनेकदा न्यायाधिश महोदय आपल्या खोलीत बसून ऑनलाईन पद्धतीने खटले निकाली काढताना दिसतात. 2008 च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोपी असणारा हेडली अमेरिकेत होता. मात्र त्याची ऑनलाईन साक्ष घेण्यात आली होती. म्हणजेच पूर्वीपासून या पद्धतीचा वापर आणि उपयुक्तता सिद्ध होत आली आहे. आता हे तंत्रज्ञान सर्रास आणि सर्व ठिकाणी वापरणे तेवढे गरजेचे आहे. विशेषत: संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायाधिशांकडूनच या पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या जाणे गरजेचे वाटते. वकील वर्गानेही त्यात सहकार्य करण्याचे आवश्यक आहे.

*******************   *************************   *****************************

VIEW POST

View more
Articles

Salient features of B N S S 2023 from police perspective

By on October 4, 2024

Salient features of B N S S 2023 from police perspective Praveen Dixit, IPS DGP ( Retired)

Significance of BNSS

  • Bharatiya Nagarik Suraksha Sanhita , 2023 , came in effect from 1 July 2024
  • Replaces Criminal Procedure Code
  • Applicable throughout India except State of Nagaland and some tribal areas of Assam
  • There are 531 sections instead of earlier 434
  • Changes made in 177 sections
  • 9 new sections have been added
  • 14 sections have been deleted

Important changes

  • Appreciating technological innovations, it recognises ‘audio-video electronic means’ which includes any communication device for the purposes of video conferencing, recording of processes, of identification, search and seizure or evidence, transmission of electronic communication and for such other purposes as the State Govt may provide by Rules
  • ‘Electronic communication’ means communication of any written, verbal, pictorial information or video content by an electronic device including a telephone, mobile phone or other wireless telecommunication device or computer/audio-video player/camera
  • It is victim-centric

Arrest of persons

  • Details provided in Chapter V
  • In cognisable offences, police may arrest
  • To prevent such person from committing any further offence
  • For proper investigation of the offence
  • To prevent such person from tampering the evidence
  • To prevent such person from influencing the witnesses
  • To ensure presence of such person before the court
  • In non-cognisable offence, police shall not arrest a person against whom the complaint is made, without warrant or order of a Magistrate

Precautions in arresting

  • Police officer who makes arrest, will bear an accurate, visible, and clear identification of his name
  • Prepare a memorandum which will be countersigned by the person arrested
  • Inform the person arrested that he has a right to have a relative or a friend or any other person named by him to be informed
  • Details of arrested persons including their names, addresses, nature of the offence shall be prominently displayed in any manner including digital mode in every police station and district headquarters
  • Search of female will be made another female decently

Examination of arrested person

  • Arrested person shall be examined by registered medical practitioner
  • Examination shall include examination of blood stains, semen, swabs, in case of sexual offences, sputum, and sweat, hair r samples, and finger nail clippings by the use of modern and scientific techniques including DNA profiling and such other tests which are considered necessary.
  • If a registered medical practitioner from government hospital is not available in the radius of sixteen kilo meters, examination may be done by any registered medical practitioner
  • If female is arrested, she will be examined under the supervision of female medical officer/female registered medical practitioner

Summons

  • Summons can be in an encrypted or any other form of electronic communication and shall bear the image of the seal of the Court or digital signature
  • Summons bearing the image of the Court’s seal can be served by electronic communication in such form and in such manner , as the State Government may, by rules, provide

Utilising Forensic experts

  • Sec 176:Offences which are punishable for seven years or more, forensic expert shall visit the crime scene to collect forensic evidence and cause videography of the process on mobile phone or any other electronic device.
  • Sec 179: During investigation, recording of the statement of male person under the age of fifteen years or above the age of sixty years or a woman or a mentally or physically disabled person or a person with acute illness shall be done at residence of such person.
  • Statements of witnesses may also be recorded by audio-video electronic means

Detention period

  • Sec 187:If the investigation cannot be completed in twenty –four hours, and if the accused is not released on bail, authorise, from time to time, detention in custody for a term not exceeding fifteen days in the whole or in parts during initial forty days
  • Magistrate may authorise detention of the accused for a period of ninety days in offences punishable with life imprisonment or a term of ten years or more
  • And for sixty days where investigation relates to any offence
  • Police custody may be extended only when person is produced in person. But judicial custody can be extended even through audiovideo electronic means

Diary of proceedings in investigation

  • Sec 192: In every investigation, police shall maintain a diary, which will mention timing when investigation started,, closed, places visited and statement of the circumstances
  • Diary shall be paginated.
  • Neither the accused nor his agent is entitled to call for such diaries nor can they see this
  • On completion of investigation, police shall forward a report and other documents including by electronic communication to the Magistrate who will provide these to the accused.
  • Progress to be informed within ninety days including by electronic communication to the informant or the victim

Death, rape in police custody

  • Further investigation may be conducted with the permission of the Court.
  • Sec 196: when a person in police custody or any other custody dies or disappears, or rape is alleged empowered Magistrate may hold an inquiry into the cause of death and rape either instead of ,or in addition to, the investigation held by the police officer
  • When such enquiry is conducted, Magistrate shall allow relatives to remain present at the inquiry
  • Relative means parents, children, brothers , sisters and spouse.

Trial and proceedings to be held in electronic mode

  • Sec 530: All trials, inquiries, and proceedings including
  1. Issuance, service and execution of summons and warrant;
  2. Examination of complainant, and witnesses;
  3. Recording of evidence in inquiries and trials; an
  4. All appellate proceedings or any other proceeding, may be held in electronic mode, by use of electronic communication or use of audio-video electronic means

References

VIEW POST

View more
Articles

Indo-Bangla Relations

By on October 4, 2024

Indo-Bangla Relations

Praveen Dixit

Pravindixit77@gmail.com

Recent developments overthrowing Hasina-led government in August 2024 are a fait accmpli.

Causes which led to the collapse

Internal fractions: Radicals headed by Jamat-e-Islami, Bangla Desh, Hifajat-E-Islam, which runs more than 25000 mosques, political opponents led by BNP of Zia, group led by Md. Yunus under the influence of western countries particularly US contributed to escalating the crisis.

Following Covid pandemic, economy was in shambles as Bangla Des has garment factories, but the fabric comes from India. Garment industry was in doldrums. Inflation is very high and sufferings of the people are manyfold.

External influences: Awami party founded by Mujibur Rahman, his daughter Sh. Hasina were perceived to be under the influence of India, though this group was working to keep Bangla Desh away from the unreasonable demands from external pressures particularly USA, China and Pakistan. US wants an island to oversee China, China desires to have access to waters to enable her exports of its cheap products, Pakistan claims, religiously both the regions have common identity, historically they were part of the same country. Civil war in Myanmar among Buddhists and Rohingyas has forced Bangla Desh to admit Rohingyas who are Muslims in the country. Though, they are Muslims, Bangla Desh is not happy with them and is happy if they are pushed in India.

Problems faced by India:

Mostly due to economic reasons, Muslims as well as few Hindus are continuously infiltrating illegally in India from all possible places. The number of such Muslims is only to be imagined as there are several pockets in India where they are able to find safe heavens along with religious sympathizers. For getting cheap labor, Hindu households, contractors, companies are welcoming their illegal stay. A few state governments such as West Bengal are promoting their reckless entry for 2vote politics in their favor. Demographic assault has put entire labor market under strain.

Many artisans from traditional profession have been replaced by Bangla Deshis. Many mosques in India have Maulvis from Bangla Desh and are rabidly propagating radicalism. This has increased threat of ISIS, Al Quaid on Indian soil. This is likely to get further aggravated. Bangla Deshis aided and abided by Pakistan are going to exacerbate various crimes including cyber offences, fake currency, terrorist activities, prostitution, kidnapping, love-jihad incidents and most importantly launching of disinformation campaign. To counter these, any stringent and stern action against Bangla Dash would push it further into the lap of India’s adversaries including Pakistan, China as well as USA. Moreover, India may have to fight war by proxy by Bangla Deshis, trained and funded by Pakistan. Demographic threat to North Eastern and Eastern region, and other parts of India is imminent.

Measures: to counter the threat:

Find out areas of mutual interest so that meaningful dialogue can proceed Areas bordering with Bangla Desh need to be secured using newer technologies such as drones, satellites as well as ground infrastructure State governments need to be directed to intensify measures to identify illegal migrants and segregate them. Government of India needs to create a separate Ministry for Immigrants immediately which would focus on the issue of illegal immigrants as well as ensure people who have entered legally, but have not left, leave India accordingly. Most of the developed countries in the world including USA, UK, Japan etc. have a separate Ministry to look after this important security concern. At present, IB under MHA has peripheral arrangements restricted to managing air check-posts and CsP, SsP, of the districts look after visa extension procedure.

But there is no trained machinery to identify illegal immigrants and ensure their deportation. Even after 75 years of independence, the problem is getting worse and there is no authority which can be held accountable to same. Aadhar card centers, passport offices, banks which help in regularizing stay of Bangla Deshis in India need to be more scrupulous before they accept the applicants. Cases involving fraudulent activities at the places are rampant. Law enforcing agencies need to be trained to identify and deport illegal immigrants. Government of India may consider introducing work permit facility for Bangla Deshis entering in India legally. Joint action force be considered against Rohingyas. May associate Bangla Desh as well in this endeavor. All trade and commercial activities of more than rupees 5000 be compulsorily done through UPI/online to control the menace of fake currency being pushed through neighboring countries including Bangladesh.

**************** ************ ******************

VIEW POST

View more
Articles

नक्षलवाद बीमोड करण्याची योजना

By on October 1, 2024

Naxalwadi

नक्षलवाद बीमोड करण्याची योजना

प्रवीण दीक्षित.

‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)’ अर्थात ‘सीपीआय (एम)’ या राजकीय पक्षाने दि. 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024 या काळात, पक्षाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्ताने 25 पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली. वास्तविकपणे, 2009 पासूनच आपल्या देशात ‘सीपीआय (एम)’वर ‘दहशतवाद विरोधी कायदा (युएपीए)’ कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. चारु मुजूमदार आणि कान्हाई चॅटर्जी यांनी 1968 मध्ये नक्षल चळवळीची स्थापना केली होती. त्यानंतर या चळवळीच्या कारवायांमध्ये फुट पडून अनेक गट पडले. त्यानंतर दि. 21 सप्टेंबर 2004 मध्ये मार्क्स, लेनिन आणि माओच्या तत्वांनी प्रेरित झालेल्यांनी एकत्र येऊन ‘सीपीआय (एम)’ या संघटनेची स्थापना केली. अमेरिका पुरस्कृत भांडवलशाही आणि या देशात उरलेली सरजांमशाही प्रवृत्ती समूळ नष्ट करण्यासाठी, सशस्त्र क्रांतीच्या आधारे सत्ता काबीज करण्याचे ध्येय या संघटनेने निर्धारित केले होते.

                           या क्रांतीची सुरुवात देशाच्या ग्रामीण भागातून करून, पुढे शहरी भागात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याची या संघटनेची योजना आहे.  ‘सीपीआय (एम)’ या संघटनेच्या मते, शहरी भागात त्यांच्या विचारांशी साधर्म्य राखणारे कार्यकर्ते, संघटना पुरस्कृत क्रांतीला सहानुभूती देऊन, व्यापक जनआंदोलनाला पुढे नेतील. याच विचाराने भारलेल्या ‘सीपीआय (एम)’ या संघटनेनच्या पत्रकाप्रमाणे गेल्या 20 वर्षांत त्यांनी निमलष्करी आणि पोलीस दलांवर अनेक हल्ले करून 3 हजार 90 कमांडो किंवा पोलिसांची हत्या केली आहे. या संघटनेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांत आजवर 4 हजार 77 जण जखमी झाले आहेत, 2 हजार 366 आधुनिक शस्त्रास्त्रे तसेच 1 लाख 19 हजार 682 गोळ्यांच्या फेर्‍या पळवल्या आहेत. परंतु ही दर्पोक्ती करीत असतानाच,  या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांची निव्वळ ते पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नृशंस अशी हत्या केली आहे, त्यावर मात्र पत्रक मौन बाळगून आहे.. चळवळीतील क्रौर्याने हाताश होऊन आत्मसमर्पण केलेल्या सहकार्‍यांचीही माओवाद्यांनी अमानुषपणे हत्या केली. या देशात सामाजिक न्याय, वास्तविक स्वातंत्र्य, लोकराज्याची स्थापना आणि देश तोडणे सहज शक्य होईल, असे स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्य हवे असल्यास ‘सशस्त्र क्रांती’ हा एकच मार्ग असल्याचे ‘सीपीआय (एम)’ या संघटनेचे ठाम मत आहे. ‘सीपीआय (एम)’ या संघटनेने छापलेल्या पुस्तिकेमध्ये ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तीन उत्तम मार्गही नमूद केले आहेत. त्यामध्ये पहिले म्हणजे ‘सीपीआय (एम)’ ही संघटना, त्यानंतर दंडकारण्यात सक्रिय असलेली ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ आणि या संघटनेच्या बेकायदेशीर कृत्यांसाठी शहरी भागांमध्ये सहानुभूती आणि संसाधने उभे करणारे शहरी भागातील संघटन होय.
या संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सन 2007 मध्ये ‘सीपीआय (एम)’ने त्यांची रणनीती स्पष्ट केली होती. त्यामध्ये सर्वप्रथम जास्तीत जास्त भारतीय सैन्य, पोलीस आणि सरकारी अधिकार्‍यांचा यांचा खात्मा करण्याबाबत रणनीती निश्चित केली होती. संघटनेला अपेक्षित असणारे मुक्त क्षेत्र निर्माण करण्यासाठी हे करणे अत्यावश्यक होते. तसेच या नक्षलवादी चळवळीसाठी नवीन तरुणांची भरती करणे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करणे, तसेच लढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवण्याचे उद्दिष्टदेखील निश्चित करण्यात आले होते. तसेच या चळवळीचा प्रसार सर्वदूर करण्यासाठी प्रामुख्याने कामगार, अर्धकुशल कामगार, मध्यमवर्गीय बुद्धिजीवी आणि विद्यार्थी यांना सहभागी करुन घेण्याबाबत ठरविण्यात आले होते. तसेच या चळवळीच्या यशासाठी महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींपर्यंत पोहोचण्याचे अधिक प्रयत्न केले जावेत, असे ठरवण्यात आले. तसेच चळवळीतील कार्यकर्त्यांना कामगारांच्या शोषणाविरोधात, जागतिकीकरणाला विरोध करण्यासाठी आणि हिंदू वर्चस्वाविरोधात लढा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्याबाबतही चर्चा झाली. एवढेच नव्हे तर शहरी नक्षलवादी, संघटनेच्या कार्यकर्त्यांना निमलष्करी दल, पोलीस दल आणि वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या वर्तुळात घुसखोरी करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाणार होते.

                               प्रशासकीय व्यवस्थेत घुसखोरी केलेल्या या संघटनेच्या शहरी कार्यकर्त्यांनी चळवळीच्या उदिष्टपूर्तीसाठी अचूक माहिती देणे, मोक्याची माहिती देऊन चळवळीला सर्वप्रकारे साहाय्य करणे, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा गरजेनुसार पुरवठा सुनिश्चित करणे, प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन, औषधांचा पुरवठा करणे, चळवळीला प्रसिद्धी देणे आणि जखमी व्यक्तींना मदत करून, चळवळीला अंतर्गत मदत करणे इत्यादी अपेक्षित आहे. सद्यस्थितीत, देशात अशा सुमारे 227 विविध संस्था कार्यरत आहेत, ज्या वरुन उपद्रवशून्य दिसत असल्या तरी चळवळीचे खोलवर कार्य करत आहेत. या संस्था ‘ए 4’ म्हणून वर्गीकृत असून, त्या संस्थांना कम्युनिस्ट नसलेल्या समाजवादी विचारांच्या संघटना म्हणून ओळखले जाते. या संस्थांमधील काही सदस्यही चळवळीत सक्रिय सहभागी होण्याची इच्छा बाळगून असतात. मग त्यांना प्रारंभी प्रबोधनासाठी निवडण्यात येते. त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन त्यांना ‘ए 3’ अर्थात सशस्र क्रांती करणार्‍यांपर्यंत त्यांची पदोन्नती होते. या चळवळीविषयी सहानुभूती बाळगून असणारे पक्षाचे कार्यकर्ते काही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विद्यापीठांतील विद्यार्थी चळवळीतही दृष्टिपथास पडतात. ‘सीपीआय (एम)’ने पक्षाच्या कार्यकर्त्यांना नुकत्याच दिलेल्या निर्देशांनुसार, ‘सीपीआय (एम)’ हा पक्ष भारतीय जनता पक्षाला क्रमांक एकचा शत्रू मानतो आणि भाजपचा पराभव करण्याचे ध्येयच या पक्षाने निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी विरोधी पक्षामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाविरोधात प्रचार करण्याचे आदेश ‘सीपीआय (एम)’ने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

                         वास्तविक पाहता, नक्षली चळवळ पश्चिम बंगालमधील सिलीगुडीजवळील नक्षलबारी येथून सुरू झाली असली तरी, तिचा विस्तार अल्पकाळातच पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत जवळपास सर्वच राज्यांमध्ये झालेला दिसतो.  2013 पर्यंत तर देशातील 110 हून अधिक जिल्ह्यांमध्ये या चळवळीचे संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले होते. मात्र, 2014 मध्ये केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मोदी सरकारने ‘अंत्योदया’च्या सिद्धातांनुसार, त्यांचे सर्व विकासात्मक उपक्रम कोणत्याही अडचणीशिवाय शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत, यासाठी एक खिडकी मदत योजनेसह विविध विकासात्मक उपाययोजना सुरू केल्या. या योजनेंतर्गत, अधिवासाचे प्रमाणपत्र, तसेच आवश्यक अन्य सर्व प्रमाणपत्रे, तरुणांना व्यावसायिक कौशल्ये, रोजगार किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या सुविधांचा लाभ मिळेल हे देखील सुनिश्चित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक तरुण मुला-मुलींनी या योजनेचा लाभ घेतला असून, ते याबाबत अत्यंत समाधानी आहेत. या योजनांव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारांनीही ‘सीपीआय (एम)’ पुरस्कृत नक्षलवादी चळवळीपासून विभक्त होऊ इच्छिणार्‍यांसाठी ‘समर्पण धोरण’ तयार केले असून, याचा लाभ घेणार्‍यांसाठी पुनर्वसनाच्या योजनादेखील कार्यन्वित केल्या आहेत. नक्षलवाद्यांनी ‘बाल सैनिक’ म्हणून पकडलेल्या आणि चळवळीत महत्त्वाच्या पदावर कार्यरत महिलांसह, अनेक नक्षलवादी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सरकारच्या या धोरणामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय, सरकारने खनन क्षेत्रात स्थानिक अनुसूचित जमातीच्या कर्मचार्‍यांच्या सहकार्यानेे खाणकाम सुरू केले आहे. यामुळे अनेकांना शाश्वत रोजगार मिळत असून, स्थानिकांच्या जीवनमानावर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आज दिसतो. पूर्वी नक्षल चळवळीने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांना भारत सरकारने ‘महत्त्वाकांक्षी जिल्हे’ म्हणूनही घोषित केले आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये रस्ते आणि दूरसंचार सुविधांव्यतिरिक्त चांगल्या वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधांद्वारे स्थानिकांची स्थिती सुधारण्यासाठीही सरकारी पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

                            भारत सरकारने नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांतील पोलीस दलांमध्ये गुप्त माहिती, पोलीस दलातील समन्वय, प्रशिक्षण कार्यक्रम याचा विकास करण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांनी अतिरिक्त निमलष्करी दल आणि वित्तपुरवठाही केला आहे. परिणामी, नक्षलवादी चळवळीचा प्रतिकूल परिणाम झालेल्या जिल्ह्यांची संख्या आधीच्या 110 वरून 34 जिल्ह्यांवर आली आहे. सध्या छत्तीसगढमधील अबुजमल पहाड भागात ‘सीपीआय (एम)’ सक्रिय असल्याचे दिसून येते. कठीण भूभाग, दुर्गम वस्ती यामुळे या भागाला ‘मुक्त क्षेत्र’ म्हणून संबोधणार्‍या नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या अराजकतेला स्थानिकांची असाहाय्यताही कारणीभूत ठरली आहे. या भागातील नक्षली हल्ल्यांमुळे होणारे सुरक्षा यंत्रणांचे नुकसान कमी करणे, नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्थानिकांना मदत करणे आणि या माध्यमातून नक्षली चळवळीचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी त्वरीत नवीन ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.

                        अशा प्रशासकीय पातळीवरील उपायांव्यतिरिक्त, सर्व लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्याची जोपासना करणार्‍या राजकीय पक्ष, सर्व विरोधी पक्ष, माध्यमे, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिक यांसारख्या समाजात प्रभावशाली असणार्‍यांनी हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे की, सीपीआय (एम) ची विचारधारा ही कदापि बदलणारी नाही. त्यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारत तोडण्याचा आणि माओवाद्यांच्या हुकूमशाहीचा उदय करण्यासाठी, राजकीय सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी ‘सार्वजनिक सुरक्षा विधेयक, 2024’ जे महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आले आहे, त्यास सर्व राजकीय पक्षांनी एकमुखी पाठिंबा देणे गरजेचे आहे. नुकताच भारताच्या गृह मंत्र्यांनी मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद समाप्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वरील योजनांमुळे नक्षलवादाची पाळेमुळे तो पर्यंत नक्कीच नष्ट होतील असा विश्वास आहे.

VIEW POST

View more
Articles

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजची आवश्यकता

By on September 28, 2024

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजची आवश्यकता

प्रवीण दीक्षित

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करण्याची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे की, शरीररूपी सावरकर जेव्हढे महत्त्वाचे होते; तेव्हढेच विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व त्यांचे विचार हे अमर आहेत. सावरकरांची कूटनीती, हिंदुत्त्वाचे महत्त्व, सैनिकीकरण, समाज क्रांतीकारक, सामाजिक बंधुता, भाषाशुद्धी, अर्थचिंतक, त्यांचे इस्लाम विषयक विचार, विज्ञाननिष्ठता, गो-विचार, स्त्री सबलीकरण, युवकांना प्रेरणा देणारे ही सावरकरांची बहु आयामी व्यक्तिमत्त्वे आहेत. हिंदुस्थानची फाळणी सावरकर कसे टाळु शकले असते Veer Savarkar – The man who could have prevented Partition  ह्या पुस्तकाचे लेखकद्वय उदय माहूरकर आणि चिरायू पंडित ह्यांनी स्वातंत्र्य मिळण्या पूर्वीच्या काळाचा  व त्यावेळच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करून हे उत्कृष्ट पुस्तक लिहीले आहे. ते प्रत्येकाने वाचले पाहजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते ‘अल्पसंख्यांकांमधील जे विचारवंत आहेत, विवेकी आहेत, त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.’ स्वातंत्र्यवीर सावरकर स्षट करतातः ‘धर्मप्रचार वेगळा आणि फसवून, लालूच लावून धर्मांतर करणे वेगळे’.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काही विषयांवरील विचार थोडक्यात आपण पाहूया.

ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान-

भारताचा इतिहास अति प्राचीन असला तरी सर्वसामान्य इतिहासकार ज्याला मान्यता देतात अशा सिकंदरच्या भारतावरील मोहिमेपासूनच्या काळाचे सावरकरांनी विश्लेषण केले आहे. भारत सार्वभौम रहावा, स्वतंत्र रहावा व परकीयांचा गुलाम होऊ नये ह्यासाठी सावरकरांनी सहा सोनेरी पाने किंवा  Six Glorious Epochs   यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. सुवर्णपाने का लिहिली त्या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, “ प्रत्येक देशाला स्वातंत्र्य युद्धांचे स्मरण केल्यामुळे जोश प्राप्त होतो. त्यांची अस्मिता तीव्र होते व माणसे आत्मविश्वासाने काम करून अनेक क्षेत्रांमधे उत्तमोत्तम कामगिरी करतात जसे, अमेरिकेच्या बाबतीत American war of Independence  चे महत्त्व आहे. आपल्या प्राचीन इतिहासामुळे चीन, बॅबिलॉन, पर्शिया, इजिप्त, प्राचीन पेरू आणि मेक्सिको, ग्रीस आणि रोम अशा अनेक देशांना आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने परत परत वाचाविशी वाटतात. परंतु ह्यातील सर्व राष्ट्रातील ऐश्वर्य व वैभव काळाच्या ओघात नाहिसे झाले आहे व त्यांचे फक्त नाव शिल्लक राहिले आहे; परंतु भारताचा इतिहास हा सतत प्रेरणा देणारा व चिरंतन आहे. चीनच्या बाबतीत भारतासारखेच शक, हूण, मुघल ह्यांनी चिनी संस्कृती नामशेष केली. प्रसिद्ध चायना वॉल बांधूनही चीन स्वतःचे संरक्षण करू शकला नाही परंतु भारतीयांनी मात्र परकीयांचा प्रत्येकवेळी पराभव केला परंतु तरीही खोडसाळ इंग्रजी इतिहासकारांनी जाणूनबुजून खोटा प्रचार केला की, हिंदू हे सतत पराभूत होत राहिले व ते नेहमीच परकीयांचे गुलाम होते. दुर्देवाने  काही भाडोत्री भारतीय इतिहासकारांनीही त्यांचीच री ओढली. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, “हा प्रचार केवळ आपल्या देशाचा अभिमान कायम ठेवण्यासाठीच नव्हे तर ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी देशकार्य म्हणून करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, पिढ्यांमागून पिढ्यांनी, भारतीय योद्ध्यांनी परकीय हल्लेखोरांचा पराभव करून देशाचे स्वातंत्र्य कसे आबाधित ठेवले हे स्पष्ट करण्यासाठी मी सहा सुवर्णपाने वाचकांपुढे उलगडून दाखवत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले हे विचार त्रिकालाबाधित आहेत व शाळा, महाविद्यालयांच्या पुस्तकातून हे विचार जाणीवपूर्व दूर ठेऊनही ज्या कोणाला जेव्हा केव्हा हे विचारर वाचायला मिळतात तेव्हा त्यातील सत्यतेमुळे वाचक पूर्णपणे भारावला जातो व हे विचार आपण आधी का वाचले नाहीत म्हणून स्वतःला दोष देतो.

हिंदूपदपादशाही –

मराठ्यांच्या इतिहासाबद्दल लिहीतांना एक दुष्प्रचार केला जातो की, मराठे हे फक्त लुटारू होते व त्यांनी केवळ चौथाईचा हक्क वसूल करणे एवढेच काम केले. माराष्ट्राच्या बाहेरील हा खोटा प्रचार खोडून काढत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या लिखाणातून सप्रमाण दाखवून देतात की, शिवाजी महाराज व पेशवे ह्यांच्यामुळेच हिंदू साम्राज्य स्थापन होऊ शकले. मोगलांबद्दल लिहीणार्‍या त्या कालच्या सर्व मुसलमान लेखकांनी केवळ मुसलमान बादशहांबद्दल स्तुतीपर लिहीले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात,  हिंदू आणि मुसलमान ह्यांच्या ऐक्यासाठी भाऊसाहेब व विश्वासराव ह्यांनी 1761 साली दिल्लीचे तख्त फोडले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या घटनेनी हिंदूंनी आम्ही शारिरीक दृष्ट्याही समानतेच्या पातळीवर समर्थ आहोत हे दाखवून दिले. व हिंदूंना जिंकणार्‍यांचा त्यांनी पूर्ण पाडाव केला व  जर आमच्याबरोबर मुसलमानांना मैत्री पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी समानतेने वागले पाहिजे हे अधोरेखित केले व त्यामुळेच हिंदू व मुसलमान यांचे ऐक्य कायमचे कसे राहील ह्याचा धडा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामते छत्रपती शिवाजी, बाजीराव, भाऊसाहेब आणि जनकोजी, नाना आणि महादजी, रामदास आणि मोरोपंत यांच्या अभ्यासामुळे न्याय आणि मानवी हक्क तसेच स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता ह्याचे  उत्कृष्ट उदाहरण डोळ्यासमोर उभे राहते. सावरकरांचे वरील विचार  वाचल्यानंतर सामाजक ऐक्य राखण्यासाठी प्रत्येकाला मदत होईल ह्याचे अश्चर्य वाटायला नको.

1857 चे स्वातंत्र्यसमर –

1857 साली झालेले युद्ध हे शिपायांचे बंड नसून ते स्वातंत्र्य समर होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विस्तृतपणे दाखवून दिले आहे. ज्या देशाला आपल्या इतिहासाची योग्य जाणीव नसेल त्याला कोणतेही भविष्य असत नाही हे स्पष्ट करतांना इतिहासाचे योग्य ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सावरकर लिहितात. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे लिहीतात, छत्रपती शिवाजींच्या काळात मोगलांविरुद्धचा राग  योग्य असला  तरी आजच्या काळात मुसलमानांविरुद्ध कोणतीही भावना ठेवणं हे केवळ मूर्खपणाचेच नसून पूर्णपणे अन्यायकारक आहे. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हिंदू व मुसलमान यांनी एकत्रपणे परकीय इंग्रजांशी दिलेला लढा है उत्कृष्ट उदाहरण आहे. सिंधुपासून म्यानमारमधील इरावडी पर्यंत भारत हा एक आहे व भारत अखंड राहिला पाहिजे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ठाम मत होते.1857 चे युद्ध हे स्वधर्म व स्वराज्य ह्यासाठीचा लढा होता हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदू समाजील वैगुण्ये –

हिंदू समाजातील विविध चालींचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर  स्वातंत्र्यवीर सावरकर अंतर्मुख होतात आणि  भारतातील विविध प्रकारच्या  7 बंदींकडे लक्ष वेधतात. त्या अशा

1 वाळीत टाकणे – श्रुतीस्मृतीपुराणोक्त बेडी

2 लोटीबंदी (पाणी पिण्यावरील बंदी)

3 रोटीबंदी (जेवणावरील बंदी)

4 बेटी बंदी (आंतर्जातीय विवाहावरील बंदी)

5 स्पर्श बंदी (अस्पृश्यता)

6 शुद्धीबंदी (धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून/ आपल्या धर्मात घेण्यास बंदी)

7 सिंधुबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, ह्या सात बंदी म्हणजे हिंदू समाजाच्या पायातील बेड्या होत्या. ह्या बेड्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य परकीय सत्तेनी घातलेल्या नव्हत्या तर हिंदूंनीच त्यांच्या धर्म रक्षणासाठी घातल्या होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा उल्लेख सात स्वदेशी बेड्या असा करतात. हिंदूंचे गुणच विवेक न बाळगल्यामुळे त्यांचे दोष बनले. भगवद्गीतेचा संदेश की गुण हे सुद्धा सापेक्ष आहेत आणि परिपूर्ण  नाहीत. माणसा माणसामधे सत्त्व, रज आणि तामस गुणांवर आधारित भेद करण्याची आवश्यकता आहे ह्या भगवद्गीतेच्या महत्त्वाच्या संदेशाकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. जिंकल्यानंतर शरण आलेल्या शत्रूला जीवदान देणे  हा आपल्याकडे गुण समजला जातो; परंतु त्याचा गैरवापर करून कृतघ्न अशा महम्मद घोरी, रोहिला नजिबखान ह्यांना मोकळे सोडण्यामुळे त्यांच्यावर उपकार करणार्‍या पृथ्वीराज चव्हाण ह्याला त्यानी ठार मारले. व दुसर्‍याने मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात पराभव करण्याची हिम्मत दाखवली.  हिंदुंच्या अत्यंत पवित्र अशा सोमनाथ मंदीराचा विध्वंस मुसलमानांनी केला.  त्यानंतर अनेक वेळेला सुवर्णसंधी लाभूनही विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांच्या एकाही मशिदीची एकही वीट हिंदूंनी उपसून काढली नाही.

भुकेलेल्याला जेवण व तहानेलेल्याला पाणी देणे हा गुण आहे असे हिंदूंनी पाठ केले होते. त्यामुळे ह्या अत्यंत विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांना योग्य धडा शिकवण्या ऐवजी ते दूध पाजत राहिले. मथुरा काशी ते थेट रामेश्वर पर्यंतची अनेकमंदिरे  फोडून तिथल्या विटा हिंदूंचा अपमान करणयासाठी मुसलमानांच्या शौचालये आणि मुतार्‍यांमधे पायदळी तुडवल्या जात असतांना अशा अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करणे हा हिंदूंचा सर्वात मोठा अपराध समजला पाहिजे. राजकीय विजय मिळवल्यानंतरही काशी, मथुरा येथील एकही मशिद हिंदू राजांनी फोडली नाही. जास्तीतजास्त काही ठिकाणी त्यांनी पुन्हा मंदिरे उभारली. हे एकदा नव्हे तर वारंवार घडल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर अधोरेखित करतात.

हिंदूंच्या स्त्रिया पळवणे व त्यांना स्वतःच्या जनानखन्यात कोंबणे हे आक्रमक मुसलमान आपले धर्मकर्तव्य समजत होते. परंतु अनेकवेळा आक्रमक मुसलमानांवर विजय मिळवल्यानंतरही मुसलमानांनी कोंडलेल्या हिंदू बायकांना हिंदू राजांनी सोडवले नाही व त्यांना मुसलमानांच्या कैदेतच गुलाम म्हणून खितपत ठेवले. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते अक्षम्य अपराध होता. मुस्लिम स्त्रियांना हिंदू करणे हा तर घोर अपराध समजला  जात होता. अनेक मुलमान स्त्रियाही हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होत्या. परंतु तरीही स्त्रियांवर दया दाखवावी ह्या गुणाचा अतिरेक होऊन हिंदूंनी स्वतःचे अपरिमित नुकसान केले. स्वातंत्र्यवीर सावरकर खेदाने म्हणतात, अहिंसा, दया, शत्रूच्या बायकांबद्दलही उदारता, शरण आलेल्याला क्षमा, धार्मिक सहिष्णुता हे नक्कीच गुण आहेत परंतु ते कधी  व कसे वापरायचे याचा विवेक घालवल्यानेच हे गुण हिंदू समाजाचे दोष ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकर खेदाने म्हणतात,

पात्रापात्र विवेकशून्य, आचरि जरि सद्गुण ।।

तो तोचि ठरे दुर्गुण, सद्धर्मघातक ।।

(पाचवे सुवर्ण पान – प्रकरण 7)

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते “ज्याची ज्याची पितृभू आणि पुण्यभू आसिंधु सिंधू भारतभू आहे तो हिंदू! किती उदात्त कल्पना आहे. ह्याबद्दल कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही.

विज्ञाननिष्ठ सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यानी `विज्ञाननिष्ठ निबंध’ ह्यामधे  अनेक विषयांवर सविस्तर लिहीले आहे. निसर्गचक्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करून स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, विश्वातील यच्चयावत वस्तूजातीच्या मूळाशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर  देवाने हे सारे विश्व मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना भाबडी, खुळी व खोटी आहे. मनुष्य हा विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. ह्या विश्वाच्या देवाशी कोणताही संबंध जोडण्याची हाव मनुष्याने सोडून द्यावी हेच इष्ट. कारण तेच सत्य आहे. माणसाचे वाईट किंवा बरे करणे ह्या दोन्ही भावना विश्वाच्या देवाच्या ठायी असमंजस आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे लिहितात, मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट अशी नीती अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले. आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत. कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फारफार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे – असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची तीच खरी खरी पूजा !!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद –

बुद्धिप्रामाण्यावर भर देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांती केली. सावरकरांच्या मते हिंदू राष्ट्राच्या अधोगतेस कारणीभूत होणार्‍या दुष्ट राष्ट्रीय रूढींसही  हे श्रुतीस्मृतिपुराणोक्तच अमर करून ठेवीत आले आहे. कर्तृत्त्वाचे हातपाय जखडून टाकणार्‍या ह्या बेड्या तोडल्याच पाहिजत आणि ते सुदैवाने आपल्या इच्छेवर अवलंबुन आहे. कारण ह्या बेड्या मानसिक आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रहाने सांगतात, भारतीयांनी विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा! ह्यापुढे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट, सुधारणा इष्ट की अनिष्ट ह्या प्रश्नांचे उत्तर ती आज उपयुक्त की अनुपयुक्त आहे ह्या एकाच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का? हा प्रश्न आता केव्हाही विचारला जाऊ नये.

कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धरणार्थ आज आवश्यकआहे ते प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित आम्ही मानत नाही, पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो, पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्र उद्धारणास जे आवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार.

ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?

आधुनिक इतिहासातील 1000 वर्षांच्या इतिहासाचे विश्लेषण करून स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात की, केवळ ज्याला आपण तपस्या म्हणतो त्यामुळे कदाचित आत्मप्रसाद मिळत असेल पण, त्यामुळे राष्ट्रीय उत्थान इत्यादि भौतिक चळवळींचे यश किंवा अपयश अवलंबून नसते; तर मुख्यतः ते भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे तेव्हाच यशस्वी झाले जेव्हा त्यांनी ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादून विपक्षावर `सामर्थ्या’त मात केली. मग त्याला धार्मिक पोथ्यातील कल्पनांप्रमाणे आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो. हे स्पष्ट करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे म्हणतात, त्यामुळेच ह्या प्रत्येक धर्मातील लोकांचा कधी जय वा कधी पराजय झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे म्हणतात, ज्याना ज्याना आपल्या चळवीस ऐहिक यश हवे, त्याने त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, आम्ही विजयी होणारच अशा वल्गना करण्याच्या नादी न लागता `सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’, इतकेच काय ते खरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा यत्न करावा. हेही लक्षात ठेवावे की, कोणतेही वैभव कोणाचेही सदैव टिकलेले नाही. वैज्ञानिक बळाने  जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही हाच सिद्धांत!

 स्पर्श बंदी (अस्पृश्यता)

स्वातंत्र्यवीर परखडपणे  लिहितात, आम्ही शाळांतून पूर्वास्पृश्य मुलांना सरमिसळ बसविण्याची चळवळ रत्नागिरी जिल्हाभर चालविली तेव्हा गावोगाव स्पृश्य जनता चवताळून उठली. जो तो आम्हांस म्हणाला, ‘अहो, तुम्ही आम्हा स्पृश्यांच्या धर्मभावना का दुखवता?’ तेव्हा आम्ही त्यांना विचारावे की ‘आम्ही तरी काय करावे? तुम्हांस जशा भावना आहेत तशाच अस्पृश्यांना नाहीत का? तुमची भावना त्यांना कुत्र्याहून दूर सारावे ही. ती न दुखवावी तर आमच्या मानवी धर्मबंधूंना कुत्र्याहून अस्पृश्य मानण्यात नि ज्या शाळेत कुत्री बसतात त्यातून त्यांना हुसकून देण्यात त्यांच्या भावना दुखतात? अशा परिस्थितीत ज्यांची भावना अन्याय्य, लोकहितविघातक, आततायी त्यांचीच भावना दुखविणे प्राप्त. चोराची भावना दुखवू नये म्हणून सावास जागवू नये की काय?’ तोच न्याय बुध्दिभेद करू नका, भावना दुखवू नका ही ओरड करणार्‍या सर्वांच्या प्रकरणी लागू आहे!

खरोखरच चातुर्वर्ण्याचा आणि त्यासच जर सनातन धर्म म्हणावयाचा असेल तर सनातन धर्माचा-जर कोणी कट्टर शत्रू असेल तर तो जातीभेदाचे निर्मूलन करू निघालेला सुधारक नसून जातीभेदासही सनातन म्हणून उचलून धरणारा ‘सनातन धर्माभिमानीच’ होय.

सिंधुबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

स्वातंत्र्यवीर म्णतात,  मलबारातील मोपल्यांचे आणि मध्यप्रांतातील ‘हलबीचे’ उदाहरण वानगीसाठी विवंचून पहा! ‘समुद्रयातुः स्वीकारः कलौ पंच विवर्जयेत्’ – समुद्रगमन करणार्‍यास जातिबहिष्कृत करावे, हा सिंधुबंदीचा करंटा धर्मनियम जेव्हा शास्त्रांनी घालून दिला तेव्हापासून हिंदूराष्ट्राचा सारा परदेशीय वाणिज्य व्यापार आम्ही आपण होऊन परक्यांच्या हाती सोपवून दिला! अर्थात् मलबारातील हिंदूराजेही समुद्र उल्लंघणे महापाप समजू लागले. परंतु अरब लोक मलबाराशी जो सामुद्रिक व्यापार करीत त्याद्वारे अलोट संपत्ति मिळते तीही आपल्याला मिळावी, आपल्याच सत्तेखालच्या सेवकांनी आपल्या मोठमोठया वाणिकनौका घेऊन नि जगातील द्रव्य आणून आपल्या कोशात त्याची भर घालावी, अशीही लालसा त्या मलबारी हिंदू राजांना झाली. तेव्हा समुद्रगमनाचे पाप तर हिंदूंच्या हातून होऊ नये आणि समुद्रगमनानेच मिळणारी जागतिक वाणिज्यसंपदा तर संपादिता यावी, या दोन्ही परस्परविरूध्द हेतूंना साधणारी कोणती फक्कड युक्ति त्या हिंदू राजांनी काढली म्हणता? तर प्रत्येक हिंदू कुटुंबातील एकेक मुलाने मुळातच हिंदूचे मुसलमान व्हावे ही!! तशी राजाज्ञा सुटली, आणि या ‘धार्मिक’ भावनेपायी सहस्त्रावधि कुटुंबातील एकेक मुलगा मुसलमानास देऊन टाकला!! स्वयंपाक करावयास सरपण हवे म्हणून हातपायच कापून चुलीत कोंबण्यात आले!! ही ऐतिहासिक घटना आहे – सिंधुबंदीचा ‘धर्म’ रक्षावा म्हणून मुसलमान झाले – त्यांचेच वंशज हे मोपले मुसलमान! आज तेच हिंदू समाजावर अनन्वित बलात्कार करून, सहस्त्रावधि हिंदूंना तरवारीच्या धाकाने बाटवून गोताचेच काळ झाले आहेत!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे अजरामर आहेत. व त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे विचार मोठ्याप्रमाणात 1935 ते 1950 ह्या काळात लिहीलेले असले तरीही  ते जणु काही आजच लिहीलेले आहेत इतके ताजेतवाने आहेत व त्यातून त्यांनी काढलेली अनुमाने ही पूर्णपणे कालाच्या मर्यादांवरती विजय मिळवून चिरंतन झाली आहेत. हे विचार जेवढे आपण वाचतो, विचार करतो, तेवढे ते आपल्याला पटत जातात आणि अभ्यास करणारा तेव्हढाच  सावरकरमय होऊन जातो. विशेष म्हणजे लोकांनी स्वतःच हे विचार स्वीकारल्यामुळे त्यांचा कोणीही प्रचार न करताच ते विचार पुन्हापुन्हा वाचले जातात व त्यामुळेच लोकांना स्फूर्ती प्राप्त होऊन ते अमर झालेले आहेत. त्यामुळे गरज कशाची असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) विचारांचा सखोल अभ्यास करण्याची.

(लेखक महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत.)

https://www.marathi.hindusthanpost.com/special/veer-savarkar-thoughts-are-needed-today/

VIEW POST

View more
Articles

Freedom hero Savarkar’s thoughts are needed today

By on September 25, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजची आावश्यकता

              स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे की, शरीररूपी सावरकर जेव्हढे महत्त्वाचे होते; तेव्हढेच विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व त्यांचे विचार हे अमर आहेत. सावरकरांची कूटनीती, हिंदुत्त्वाचे महत्त्व, सैनिकीकरण, समाज क्रांतीकारक, सामाजिक बंधुता, भाषाशुद्धी, अर्थचिंतक, त्यांचे इस्लाम विषयक विचार, विज्ञाननिष्ठता, गो-विचार, स्त्री सबलीकरण, युवकांना प्रेरणा देणारे ही सावरकरांची बहु आयामी व्यक्तिमत्त्वे आहेत. हिंदुस्थानची फाळणी सावरकर कसे टाळु शकले असते Veer Savarkar – The man who could have prevented Partition  ह्या पुस्तकाचे लेखकद्वय उदय माहूरकर आणि चिरायू पंडित ह्यांनी स्वातंत्र्य मिळण्या पूर्वीच्या काळाचा  व त्यावेळच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करून हे उत्कृष्ट पुस्तक लिहीले आहे. ते प्रत्येकाने वाचले पाहजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते ‘अल्पसंख्यांकांमधील जे विचारवंत आहेत, विवेकी आहेत, त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.’ स्वातंत्र्यवीर सावरकर स्षट करतातः ‘धर्मप्रचार वेगळा आणि फसवून, लालूच लावून धर्मांतर करणे वेगळे’.

          स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काही विषयांवरील विचार थोडक्यात आपण पाहू या.

   1 ऐतिहासिक घटनांचे अचूक ज्ञान-

भारताचा इतिहास अति प्राचीन असला तरी सर्वसामान्य इतिहासकार ज्याला मान्यता देतात अशा सिकंदरच्या भारतावरील मोहिमेपासूनच्या काळाचे सावरकरांनी विश्लेषण केले आहे. भारत सार्वभौम रहावा, स्वतंत्र रहावा व परकीयांचा गुलाम होऊ नये ह्यासाठी सावरकरांनी सहा सोनेरी पाने किंवा  Six Glorious Epochs   यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. सुवर्णपाने का लिहिली त्या बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, “ प्रत्येक देशाला स्वातंत्र्य युद्धांचे स्मरण केल्यामुळे जोश प्राप्त होतो. त्यांची अस्मिता तीव्र होते व माणसे आत्मविश्वासाने काम करून अनेक क्षेत्रांमधे उत्तमोत्तम कामगिरी करतात जसे, अमेरिकेच्या बाबतीत American war of Independence  चे महत्त्व आहे. आपल्या प्राचीन इतिहासामुळे चीन, बॅबिलॉन, पर्शिया, इजिप्त, प्राचीन पेरू आणि मेक्सिको, ग्रीस आणि रोम अशा अनेक देशांना आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पाने परत परत वाचाविशी वाटतात. परंतु ह्यातील सर्व राष्ट्रातील ऐश्वर्य व वैभव काळाच्या ओघात नाहिसे झाले आहे व त्यांचे फक्त नाव शिल्लक राहिले आहे; परंतु भारताचा इतिहास हा सतत प्रेरणा देणारा व चिरंतन आहे. चीनच्या बाबतीत भारतासारखेच शक, हूण, मुघल ह्यांनी चिनी संस्कृती नामशेष केली. प्रसिद्ध चायना वॉल बांधूनही चीन स्वतःचे संरक्षण करू शकला नाही परंतु भारतीयांनी मात्र परकीयांचा प्रत्येकवेळी पराभव केला परंतु तरीही खोडसाळ इंग्रजी इतिहासकारांनी जाणूनबुजून खोटा प्रचार केला की, हिंदू हे सतत पराभूत होत राहिले व ते नेहमीच परकीयांचे गुलाम होते. दुर्देवाने  काही भाडोत्री भारतीय इतिहासकारांनीही त्यांचीच री ओढली. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, “हा प्रचार केवळ आपल्या देशाचा अभिमान कायम ठेवण्यासाठीच नव्हे तर ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी देशकार्य म्हणून करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात, पिढ्यांमागून पिढ्यांनी, भारतीय योद्ध्यांनी परकीय हल्लेखोरांचा पराभव करून देशाचे स्वातंत्र्य कसे आबाधित ठेवले हे स्पष्ट करण्यासाठी मी सहा सुवर्णपाने वाचकांपुढे उलगडून दाखवत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेले हे विचार त्रिकालाबाधित आहेत व शाळा, महाविद्यालयांच्या पुस्तकातून हे विचार जाणीवपूर्व दूर ठेऊनही ज्या कोणाला जेव्हा केव्हा हे विचारर वाचायला मिळतात तेव्हा त्यातील सत्यतेमुळे वाचक पूर्णपणे भारावला जातो व हे विचार आपण आधी का वाचले नाहीत म्हणून स्वतःला दोष देतो.

  2 हिंदूपदपादशाही –

 मराठ्यांच्या इतिहासाबद्दल लिहीतांना एक दुष्प्रचार केला जातो की, मराठे हे फक्त लुटारू होते व त्यांनी केवळ चौथाईचा हक्क वसूल करणे एवढेच काम केले. माराष्ट्राच्या बाहेरील हा खोटा प्रचार खोडून काढत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या लिखाणातून सप्रमाण दाखवून देतात की, शिवाजी महाराज व पेशवे ह्यांच्यामुळेच हिंदू साम्राज्य स्थापन होऊ शकले. मोगलांबद्दल लिहीणार्‍या त्या कालच्या सर्व मुसलमान लेखकांनी केवळ मुसलमान बादशहांबद्दल स्तुतीपर लिहीले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात,  हिंदू आणि मुसलमान ह्यांच्या ऐक्यासाठी भाऊसाहेब व विश्वासराव ह्यांनी 1761 साली दिल्लीचे तख्त फोडले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्या घटनेनी हिंदूंनी आम्ही शारिरीक दृष्ट्याही समानतेच्या पातळीवर समर्थ आहोत हे दाखवून दिले. व हिंदूंना जिंकणार्‍यांचा त्यांनी पूर्ण पाडाव केला व  जर आमच्याबरोबर मुसलमानांना मैत्री पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी समानतेने वागले पाहिजे हे अधोरेखित केले व त्यामुळेच हिंदू व मुसलमान यांचे ऐक्य कायमचे कसे राहील ह्याचा धडा दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामते छत्रपती शिवाजी, बाजीराव, भाऊसाहेब आणि जनकोजी, नाना आणि महादजी, रामदास आणि मोरोपंत यांच्या अभ्यासामुळे न्याय आणि मानवी हक्क तसेच स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता ह्याचे  उत्कृष्ट उदाहरण डोळ्यासमोर उभे राहते. सावरकरांचे वरील विचार  वाचल्यानंतर सामाजक ऐक्य राखण्यासाठी प्रत्येकाला मदत होईल ह्याचे अश्चर्य वाटायला नको.

 3 1857 चे स्वातंत्र्यसमर –

1857 साली झालेले युद्ध हे शिपायांचे बंड नसून ते स्वातंत्र्य समर होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विस्तृतपणे दाखवून दिले आहे. ज्या देशाला आपल्या इतिहासाची योग्य जाणीव नसेल त्याला कोणतेही भविष्य असत नाही हे स्पष्ट करतांना इतिहासाचे योग्य ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सावरकर लिहितात. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे लिहीतात, छत्रपती शिवाजींच्या काळात मोगलांविरुद्धचा राग  योग्य असला  तरी आजच्या काळात मुसलमानांविरुद्ध कोणतीही भावना ठेवणं हे केवळ मूर्खपणाचेच नसून पूर्णपणे अन्यायकारक आहे. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हिंदू व मुसलमान यांनी एकत्रपणे परकीय इंग्रजांशी दिलेला लढा है उत्कृष्ट उदाहरण आहे. सिंधुपासून म्यानमारमधील इरावडी पर्यंत भारत हा एक आहे व भारत अखंड राहिला पाहिजे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ठाम मत होते.1857 चे युद्ध हे स्वधर्म व स्वराज्य ह्यासाठीचा लढा होता हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

4 हिंदू समाजील वैगुण्ये –

  हिंदू समाजातील विविध चालींचा प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर  स्वातंत्र्यवीर सावरकर अंतर्मुख होतात आणि  भारतातील विविध प्रकारच्या  7 बंदींकडे लक्ष वेधतात. त्या अशा

1 वाळीत टाकणे – श्रुतीस्मृतीपुराणोक्त बेडी

2 लोटीबंदी (पाणी पिण्यावरील बंदी)

3 रोटीबंदी (जेवणावरील बंदी)

4 बेटी बंदी (आंतर्जातीय विवाहावरील बंदी)

5 स्पर्श बंदी (अस्पृश्यता)

6 शुद्धीबंदी (धर्मांतर केलेल्या लोकांना शुद्ध करून/ आपल्या धर्मात घेण्यास बंदी)

7 सिंधुबंदी (समुद्रप्रवासावर बंदी)

स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात, ह्या सात बंदी म्हणजे हिंदू समाजाच्या पायातील बेड्या होत्या. ह्या बेड्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य परकीय सत्तेनी घातलेल्या नव्हत्या तर हिंदूंनीच त्यांच्या धर्म रक्षणासाठी घातल्या होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा उल्लेख सात स्वदेशी बेड्या असा करतात. हिंदूंचे गुणच विवेक न बाळगल्यामुळे त्यांचे दोष बनले. भगवद्गीतेचा संदेश की गुण हे सुद्धा सापेक्ष आहेत आणि परिपूर्ण  नाहीत. माणसा माणसामधे सत्त्व, रज आणि तामस गुणांवर आधारित भेद करण्याची आवश्यकता आहे ह्या भगवद्गीतेच्या महत्त्वाच्या संदेशाकडे हिंदूंनी दुर्लक्ष केले आणि स्वतःचा विनाश ओढवून घेतला. जिंकल्यानंतर शरण आलेल्या शत्रूला जीवदान देणे  हा आपल्याकडे गुण समजला जातो; परंतु त्याचा गैरवापर करून कृतघ्न अशा महम्मद घोरी, रोहिला नजिबखान ह्यांना मोकळे सोडण्यामुळे त्यांच्यावर उपकार करणार्‍या पृथ्वीराज चव्हाण ह्याला त्यानी ठार मारले. व दुसर्‍याने मराठ्यांचा पानिपतच्या युद्धात पराभव करण्याची हिम्मत दाखवली.  हिंदुंच्या अत्यंत पवित्र अशा सोमनाथ मंदीराचा विध्वंस मुसलमानांनी केला.  त्यानंतर अनेक वेळेला सुवर्णसंधी लाभूनही विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांच्या एकाही मशिदीची एकही वीट हिंदूंनी उपसून काढली नाही.

भुकेलेल्याला जेवण व तहानेलेल्याला पाणी देणे हा गुण आहे असे हिंदूंनी पाठ केले होते. त्यामुळे ह्या अत्यंत विषारी अशा नाग सापांसारख्या क्रूर मुस्लिम हल्लेखोरांना योग्य धडा शिकवण्या ऐवजी ते दूध पाजत राहिले. मथुरा काशी ते थेट रामेश्वर पर्यंतची अनेकमंदिरे  फोडून तिथल्या विटा हिंदूंचा अपमान करणयासाठी मुसलमानांच्या शौचालये आणि मुतार्‍यांमधे पायदळी तुडवल्या जात असतांना अशा अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करणे हा हिंदूंचा सर्वात मोठा अपराध समजला पाहिजे. राजकीय विजय मिळवल्यानंतरही काशी, मथुरा येथील एकही मशिद हिंदू राजांनी फोडली नाही. जास्तीतजास्त काही ठिकाणी त्यांनी पुन्हा मंदिरे उभारली. हे एकदा नव्हे तर वारंवार घडल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर अधोरेखित करतात.

                  हिंदूंच्या स्त्रिया पळवणे व त्यांना स्वतःच्या जनानखन्यात कोंबणे हे आक्रमक मुसलमान आपले धर्मकर्तव्य समजत होते. परंतु अनेकवेळा आक्रमक मुसलमानांवर विजय मिळवल्यानंतरही मुसलमानांनी कोंडलेल्या हिंदू बायकांना हिंदू राजांनी सोडवले नाही व त्यांना मुसलमानांच्या कैदेतच गुलाम म्हणून खितपत ठेवले. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते अक्षम्य अपराध होता. मुस्लिम स्त्रियांना हिंदू करणे हा तर घोर अपराध समजला  जात होता. अनेक मुलमान स्त्रियाही हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होत्या. परंतु तरीही स्त्रियांवर दया दाखवावी ह्या गुणाचा अतिरेक होऊन हिंदूंनी स्वतःचे अपरिमित नुकसान केले. स्वातंत्र्यवीर सावरकर खेदाने म्हणतात, अहिंसा, दया, शत्रूच्या बायकांबद्दलही उदारता, शरण आलेल्याला क्षमा, धार्मिक सहिष्णुता हे नक्कीच गुण आहेत परंतु ते कधी  व कसे वापरायचे याचा विवेक घालवल्यानेच हे गुण हिंदू समाजाचे दोष ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकर खेदाने म्हणतात,

पात्रापात्र विवेकशून्य, आचरि जरि सद्गुण ।।

तो तोचि ठरे दुर्गुण, सद्धर्मघातक ।। 

(पाचवे सुवर्ण पान – प्रकरण 7)

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते “ज्याची ज्याची पितृभू आणि पुण्यभू आसिंधु सिंधू भारतभू आहे तो हिंदू! किती उदात्त कल्पना आहे. ह्याबद्दल कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही.

विज्ञाननिष्ठ सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यानी `विज्ञाननिष्ठ निबंध’ ह्यामधे  अनेक विषयांवर सविस्तर लिहीले आहे. निसर्गचक्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करून स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, विश्वातील यच्चयावत वस्तूजातीच्या मूळाशी जी शक्ती आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर  देवाने हे सारे विश्व मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना भाबडी, खुळी व खोटी आहे. मनुष्य हा विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. ह्या विश्वाच्या देवाशी कोणताही संबंध जोडण्याची हाव मनुष्याने सोडून द्यावी हेच इष्ट. कारण तेच सत्य आहे. माणसाचे वाईट किंवा बरे करणे ह्या दोन्ही भावना विश्वाच्या देवाच्या ठायी असमंजस आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे लिहितात, मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट अशी नीती अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले. आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत. कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही; फारफार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे – असे जे आहे ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची तीच खरी खरी पूजा !!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद

 बुद्धिप्रामाण्यावर भर देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांती केली. सावरकरांच्या मते हिंदू राष्ट्राच्या अधोगतेस कारणीभूत होणार्‍या दुष्ट राष्ट्रीय रूढींसही  हे श्रुतीस्मृतिपुराणोक्तच अमर करून ठेवीत आले आहे. कर्तृत्त्वाचे हातपाय जखडून टाकणार्‍या ह्या बेड्या तोडल्याच पाहिजत आणि ते सुदैवाने आपल्या इच्छेवर अवलंबुन आहे. कारण ह्या बेड्या मानसिक आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रहाने सांगतात, भारतीयांनी विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे. आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा! ह्यापुढे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट, सुधारणा इष्ट की अनिष्ट ह्या प्रश्नांचे उत्तर ती आज उपयुक्त की अनुपयुक्त आहे ह्या एकाच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का? हा प्रश्न आता केव्हाही विचारला जाऊ नये.

कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धरणार्थ आज आवश्यकआहे ते प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित आम्ही मानत नाही, पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो, पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून. अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान, अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्र उद्धारणास जे आवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार.    

ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?

आधुनिक इतिहासातील 1000 वर्षांच्या इतिहासाचे विश्लेषण करून स्वातंत्र्यवीर सावरकर लिहीतात की, केवळ ज्याला आपण तपस्या म्हणतो त्यामुळे कदाचित आत्मप्रसाद मिळत असेल पण, त्यामुळे राष्ट्रीय उत्थान इत्यादि भौतिक चळवळींचे यश किंवा अपयश अवलंबून नसते; तर मुख्यतः ते भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे तेव्हाच यशस्वी झाले जेव्हा त्यांनी ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढी साधने संपादून विपक्षावर `सामर्थ्या’त मात केली. मग त्याला धार्मिक पोथ्यातील कल्पनांप्रमाणे आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो. हे स्पष्ट करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे म्हणतात, त्यामुळेच ह्या प्रत्येक धर्मातील लोकांचा कधी जय वा कधी पराजय झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे म्हणतात, ज्याना ज्याना आपल्या चळवीस ऐहिक यश हवे, त्याने त्याने आमच्या पक्षास न्याय आहे, आमच्या पक्षास देव आहे, आम्ही विजयी होणारच अशा वल्गना करण्याच्या नादी न लागता `सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’, इतकेच काय ते खरे मानावे आणि वैज्ञानिक सामर्थ्यशाली प्रत्यक्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहून वरचढ होण्याचा यत्न करावा. हेही लक्षात ठेवावे की, कोणतेही वैभव कोणाचेही सदैव टिकलेले नाही. वैज्ञानिक बळाने  जे ऐहिक यश मिळवू शकतात ते ऐहिक यश ज्यास हवे, त्याने ते अद्ययावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असले तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून काही अडत नाही. ते सामर्थ्य नसले तर भगवंताच्या अधिष्ठानासाठी कोटी कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही हाच सिद्धांत!

 स्पर्श बंदी ( अस्पृश्यता )

स्वातंत्र्यवीर परखडपणे  लिहितात, आम्ही शाळांतून पूर्वास्पृश्य मुलांना सरमिसळ बसविण्याची चळवळ रत्नागिरी जिल्हाभर चालविली तेव्हा गावोगाव स्पृश्य जनता चवताळून उठली. जो तो आम्हांस म्हणाला, ‘अहो, तुम्ही आम्हा स्पृश्यांच्या धर्मभावना का दुखवता?’ तेव्हा आम्ही त्यांना विचारावे की ‘आम्ही तरी काय करावे? तुम्हांस जशा भावना आहेत तशाच अस्पृश्यांना नाहीत का? तुमची भावना त्यांना कुत्र्याहून दूर सारावे ही. ती न दुखवावी तर आमच्या मानवी धर्मबंधूंना कुत्र्याहून अस्पृश्य मानण्यात नि ज्या शाळेत कुत्री बसतात त्यातून त्यांना हुसकून देण्यात त्यांच्या भावना दुखतात? अशा परिस्थितीत ज्यांची भावना अन्याय्य, लोकहितविघातक, आततायी त्यांचीच भावना दुखविणे प्राप्त. चोराची भावना दुखवू नये म्हणून सावास जागवू नये की काय?’ तोच न्याय बुध्दिभेद करू नका, भावना दुखवू नका ही ओरड करणार्‍या सर्वांच्या प्रकरणी लागू आहे!

खरोखरच चातुर्वर्ण्याचा आणि त्यासच जर सनातन धर्म म्हणावयाचा असेल तर सनातन धर्माचा-जर कोणी कट्टर शत्रू असेल तर तो जातीभेदाचे निर्मूलन करू निघालेला सुधारक नसून जातीभेदासही सनातन म्हणून उचलून धरणारा ‘सनातन धर्माभिमानीच’ होय.

सिंधुबंदी ( समुद्रप्रवासावर बंदी)

          स्वातंत्र्यवीर म्णतात,  मलबारातील मोपल्यांचे आणि मध्यप्रांतातील ‘हलबीचे’ उदाहरण वानगीसाठी विवंचून पहा! ‘समुद्रयातुः स्वीकारः कलौ पंच विवर्जयेत्’ – समुद्रगमन करणार्‍यास जातिबहिष्कृत करावे, हा सिंधुबंदीचा करंटा धर्मनियम जेव्हा शास्त्रांनी घालून दिला तेव्हापासून हिंदूराष्ट्राचा सारा परदेशीय वाणिज्य व्यापार आम्ही आपण होऊन परक्यांच्या हाती सोपवून दिला! अर्थात् मलबारातील हिंदूराजेही समुद्र उल्लंघणे महापाप समजू लागले. परंतु अरब लोक मलबाराशी जो सामुद्रिक व्यापार करीत त्याद्वारे अलोट संपत्ति मिळते तीही आपल्याला मिळावी, आपल्याच सत्तेखालच्या सेवकांनी आपल्या मोठमोठया वाणिकनौका घेऊन नि जगातील द्रव्य आणून आपल्या कोशात त्याची भर घालावी, अशीही लालसा त्या मलबारी हिंदू राजांना झाली. तेव्हा समुद्रगमनाचे पाप तर हिंदूंच्या हातून होऊ नये आणि समुद्रगमनानेच मिळणारी जागतिक वाणिज्यसंपदा तर संपादिता यावी, या दोन्ही परस्परविरूध्द हेतूंना साधणारी कोणती फक्कड युक्ति त्या हिंदू राजांनी काढली म्हणता? तर प्रत्येक हिंदू कुटुंबातील एकेक मुलाने मुळातच हिंदूचे मुसलमान व्हावे ही!! तशी राजाज्ञा सुटली, आणि या ‘धार्मिक’ भावनेपायी सहस्त्रावधि कुटुंबातील एकेक मुलगा मुसलमानास देऊन टाकला!! स्वयंपाक करावयास सरपण हवे म्हणून हातपायच कापून चुलीत कोंबण्यात आले!! ही ऐतिहासिक घटना आहे – सिंधुबंदीचा ‘धर्म’ रक्षावा म्हणून मुसलमान झाले – त्यांचेच वंशज हे मोपले मुसलमान! आज तेच हिंदू समाजावर अनन्वित बलात्कार करून, सहस्त्रावधि हिंदूंना तरवारीच्या धाकाने बाटवून गोताचेच काळ झाले आहेत!

          स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे अजरामर आहेत. व त्यातून चिरंतन प्रेरणा मिळत असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे विचार मोठ्याप्रमाणात 1935 ते 1950 ह्या काळात लिहीलेले असले तरीही  ते जणु काही आजच लिहीलेले आहेत इतके ताजेतवाने आहेत व त्यातून त्यांनी काढलेली अनुमाने ही पूर्णपणे कालाच्या मर्यादांवरती विजय मिळवून चिरंतन झाली आहेत. हे विचार जेवढे आपण वाचतो, विचार करतो, तेवढे ते आपल्याला पटत जातात आणि अभ्यास करणारा तेव्हढाच  सावरकरमय होऊन जातो. विशेष म्हणजे लोकांनी स्वतःच हे विचार स्वीकारल्यामुळे त्यांचा कोणीही प्रचार न करताच ते विचार पुन्हापुन्हा वाचले जातात व त्यामुळेच लोकांना स्फूर्ती प्राप्त होऊन ते अमर झालेले आहेत. त्यामुळे गरज कशाची असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची.

—————————-    —————————  ———————–

VIEW POST

View more
Articles

माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!

By on September 25, 2024

नागपूर : पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवून उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा, सुविधांचा वापर केला असता तर सध्या सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणारे बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर घडलेच नसते, असे परखड मत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.

बहुचर्चित बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरोधाकंडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहे. यामुळे देशभर हे प्रकरण चर्चेला आले आहे. प्रत्येक जण वेगवेगळे मत मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने चर्चा केली असता त्यांनी या एन्काऊंटरचे तटस्थ विश्लेषण केले.

ते म्हणाले, सध्या जगात डिजिटलायझेशनचा डंका वाजत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान समाजाच्या अन्य घटकांसोबतच न्यायव्यवस्था आणि पोलिसांचेही काम सुरळीत करून गेले आहे. गुन्हेगार कितीही मोठा असो की खतरनाक, त्याला पुर्वीसारखे न्यायालयात पेशीला घेऊन जाण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच मोठ्या कारागृहात व्हीडीओ कॉन्फरंसिंग (व्हीसी)ची सोय आहे. त्यामुळे संवेदशनिल प्रकरणातील आरोपीला कारागृहातूनच त्याला ऑनलाईन कोर्टात पेश करता येतं. या प्रकारात कसलाच धोका नसतो. मात्र, पोलीस ते सोडून, आरोपीला कारागृहात नेण्यासाठी विनाकारण तामझाम करतात.

संवेदनशिल गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी ८ ते १० पोलीस, स्वतंत्र वाहन लागते. वेळ जाते, उर्जा खर्ची पडते अन् सर्वात मोठे म्हणजे, त्यात मोठा धोका असतो. आरोपी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करतो, स्वत:वर हल्ला करून जखमी करून घेतो किंवा पोलिसांवर हल्ला करतो. नंतर आरोपाच्या फैरी झडतात. तर कधीबधी असे एन्काऊंटरचे प्रकार घडतात. या प्रकरणात नेमके काय झाले अन् कसे झाले, याबद्दल वेगवेगळे तर्क मांडणे, अंदाज काढणे स्वाभाविक आहे. मात्र, पोलिसांनी थोडीशी सतर्कता दाखवत आरोपीला न्यायालयात नेण्याच्या भानगडीत न पडता त्याची कारागृहातूनच ऑनलाईन पेशी केली असती, तर हा प्रकारच घडला नसता, असेही दीक्षित म्हणाले.

प्रसंगी कोर्टाचे कामकाजही तुरुंगातच
नव्या भारतीय न्याय संहितेत डिजिटलयाझेशनचा (तंत्रज्ञानाचा) वापर व्हावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात, ईतकेच काय, आम्ही भारतातून परदेशातील कारागृहात असलेला २६/११ चा आरोपी डेव्हीड कोलमन हेडलीची साक्ष नोंदविली आहे. दुसरे म्हणजे, गरज वाटल्यास न्यायालयही तुरुंगात जाऊन कामकाज चालविते.

हा धोका असाच राहील
न्यायव्यवस्थेशी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी आताही पारंपारिकपणा सोडला नाही आणि प्रगत तंत्रज्ञानाचा उपरययोग केला नाही तर ही ‘एन्काऊंटर’सारख्या प्रकाराचा धोका, असाच कायम राहिल, असेही मत दीक्षित यांनी नोंदविले आहे.

VIEW POST

View more

VIEW POST

View more
Articles

Review of Naxal movement

By on September 16, 2024

Review of Naxal movement 

Praveen Dixit

Communist Party of India (Maoist), CPI(M) a banned organisation under Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) since 2009 has appealed its cadre and masses through its recently published twenty-five pages booklet to observe CPI(Maoists)’ twentieth foundation day from September 21 till Oct 20, 2024 throughout the country. Though the Naxal movement has been in existence from 1968 after its formation by Charu Majumdar and Kanhai Chatterji, it also witnessed splintering of its activities in various groups. On 21 September 2004, these splinter groups united themselves to form Communist Party of India (Maoists) inspired by the principles of Marx, Lenin and Mao. It firmly believes to capture power through armed revolution to eliminate capitalism advocated by United States, feudalism and its remaining remnants. It proposes to start this revolution from rural areas and encircle the urban areas. According to CPI(Maoists) the urban areas would provide sympathisers and further the mass movement. It boasts that during last twenty years, it launched several successful ambushes against para-military and police forces killing 3090 commandos or policemen, injured 4077 of them, and captured 2366 sophisticated modern weapons as well as 1,19,682 ammunition rounds. Significantly, the appeal is completely silent regarding gruesome murders committed by them of innocent persons who they claim to be police informers, even though they may belong to scheduled caste or scheduled tribe. Even many of their former colleagues who had surrendered out of frustration have been also eliminated brutally. The party is of the firm opinion, that without armed revolution, there would be no social justice, real freedom, establishment of peoples’ rule and freedom for self-determination with the resolve to break from India. As per the booklet, the three miraculous weapons to achieve these targets are the Party, Peoples’ Liberation Army (PLA) which operates in Dandakaranya, and various urban organisations which act as front to mobilise its sympathisers and resources.

In 2007, the party formulated “Strategy and Tactics of the Indian Revolution”. According to the same, the primary objective was to kill as many soldiers from Inian army, police and government officers. This was necessary to create liberated zones where there would be no control by the government. It further states that Urban Naxalism is required to recruit new candidates, ensure supply of various items including medicines, money, and acquire new technologies. This movement would be particularly spread among labour, semi-skilled workers, students and middle-class intellectuals. It will make special efforts in social groups belonging to women, scheduled castes and scheduled tribes. They would be encouraged to protest against exploitation of labour, oppose globalisation and act against Hindu supremacy. Members of Urban Naxal groups would be encouraged to infiltrate army, para-military forces, police and senior bureaucratic circles. They were expected to assist the movement from within by providing strategic information, ensure supply of arms and ammunition, manage media, unhindered provision of medicines, ensure favourable publicity and help for injured persons. At present, there are about 227 such organisations under various innocent looking nomenclatures functioning in the country. These have been classified as A 4 and are known to be non-communist socialist organisations. Members of these are sympathisers and a select few from these are identified for indoctrination and thereafter elevation to the level of A 3 which are Communist organisations having firm belief in armed revolution. Many of these sympathisers have captured students’ movements in Central and few State Universities. As per the recent directive, the Party considers BJP as its primary enemy and to defeat BJP, it has encouraged its cadre to join the opposition parties which are characterised as secondary enemy. 

Geographically, the Naxal movement, though started from Naxalbari, near Siliguri in West Bengal, spread to almost all states from Pashupati to Tirupati and by 2013 more than 110 districts were in the grip of it. However, after the BJP was elected to form the government at the Centre in 2014, it has initiated various developmental measures including ‘one window assistance’ to make sure all developmental activities reach the last person without any difficulty. Under this scheme, necessary certificates including domicile, EBC, are ensured facilitating youth to get professional skills, employment or start one’s business. More than 10000 young boys and girls from Gadchiroli district have taken the benefit of this scheme and are highly satisfied. Several State governments have formulated ‘surrender policy’ for the former cadre and providing rehabilitation measures for them. Many important carders including women who were captured as child soldiers by Naxals and were working as pivotal persons have come forward to take advantage of the scheme. This has struck a body blow to the Naxal movement. In addition, mining activities have started in collaboration with local scheduled tribe personnel which is providing sustainable employment to many and thus changing their lives. Government of India has also declared many of these areas as aspirational districts and making all out efforts to improve the condition of the locals through better medical and educational facilities, besides roads, and telecommunication facilities

Government of India has initiated measures for sharing intelligence, coordination, training among affected state police forces.  It has provided additional para-military forces and finance for improving existing infrastructure of the law-enforcing agencies. As a result, the number of adversely affected districts has come down drastically to thirty-four from earlier 110. At present, CPI(Maoists) appears to be still active in Abujmal Pahad area of Chhattisgarh. Difficult terrain, inaccessibility of the remote inhabitations is contributing to helplessness of the local people in being under the control of lawlessness of Naxals who call this area as ‘liberated areas.’ It is imperative that new loitering drone technology is swiftly adopted by law enforcing agencies to minimise losses to security personnel and assist the local people to neutralise the insurgent elements.

Apart from such administrative measures, it is imperative to realise by all democratic and freedom-cherishing political parties including those who are in opposition as well as social influencers such as media, academicians and professionals that there would be no change of heart of CPI(Maoists)’ cadre, who are determined to break India through armed revolution and capture political power to usher in their dictatorship.  Public Safety Bill 2024 introduced in Maharashtra legislature to ensure this democratic freedom also needs to be enacted unanimously.

**************   *******   *************

VIEW POST

View more

Widget Area

This section is widgetized. To add widgets here, go to the Widgets panel in your WordPress admin, and add the widgets you would like to Blog Sidebar.

*This message will be overwritten after widgets have been added