Author:

Praveen Dixit

Articles

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय

By on September 19, 2023

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय

प्रवीण दीक्षित

पोलीस महासंलक(निवृत्त)

देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वतःचा व राष्ट्राचा विकास करता यावा ह्या उद्देशाने शासनाने पोलीसदलाची निर्मिती केली आहे. परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामधे धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवू आणणारे व त्यातून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेकजण असतात. अशा ह्या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे व त्यांना नयायालयामार्फत शिक्षा करणारे पोलीस दल आवश्याक आहे व ते पोलिसांचे  आद्य कर्तव्य आहे. परंतु पोलीसांच्या कामामधे ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे ह्यासाठी समाजाील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात. पोलीसांचे मनोधर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे ह्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी चालू ठेवता यावी हयासाठी स्वतःच्या हातचे बाहुले होऊन वागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणार्‍या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्याराजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा ह्यासाठी ह्या पोलीस अधिकार्‍यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणार्‍या अधिकार्‍यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलीसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात.

ह्याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणार्‍या पोलिसांवर हल्ले करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशातून अनेक सिनेमे काढले आहेत; ज्यात पोलीसांचा पांडु हवालदाार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे पोलीसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे हा उद्देश असतो. 

पोलीसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे ह्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महानगरातील पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. रोज 12 तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता ह्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्यावेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे ह्याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढायला लागतात.   

ह्यावरील उपाय म्हणून पोलीसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. त्याशिवाय पोलीसांची टिंगल टवाळी करणार्‍या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलीसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलीस-मित्र म्हणून काम करणे जरुरीचे आहे. येणार्‍या गणपती, मोहरम, नवरात्र उत्सव ह्यासाठी पोलिसांनीही पोलीस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे जरूरीचे आाहे. राजकीय नेतृत्त्वानेही पोलीसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलीसांची बदली अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलीसांनाच मदत होईल असे नव्हे तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.

———————————————

Videos

mpsc psi 2023

By on September 19, 2023
Articles

फौजदारपदी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 

By on August 26, 2023
फौजदारपदी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 
प्रवीण दीक्षित
निवृत्त पोलीस महासंचालक 
१ फौजदार ह्नया प्रतिष्ठित व कठीण परीक्षेत यशस्वी   झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन
२ त्यांना सहाय्य करणाऱ्या विविध शिक्षक , प्रशासकीय कर्मचारी  तसेच त्त्यांयांचे कुटुंबीय ह्यांचे अभिनंदन!
३ निवड झालेल्या उमेदवारांनी  वैयक्तिक चारित्र्य निष्कलंक राखणे महत्वाचे आहे
४ मैत्रीण मित्र असणार्यांना लग्नाचे आश्वासन देऊन फसवणुक करू नका. विवाहपूर्व शरीर संबंध ठेवणे कटाक्षाने टाळा . असतील तर त्याच व्यक्तींशी विवाह करा अन्यथा त्यामुळे नोकरी जाऊ शकते.
५ भ्रष्टाचार करण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळा. तुम्हाला फसवण्यासाठी अनेक सापळे मुद्दाम केले जातील .स्वतःवर संयम ठेवा.
६ तुम्ही करत असलेल्या प्रत्येक तपासाचे digital record ठेवा जमेल तेव्हा ते लिहून काढा . आवश्यक असल्यास वरिष्ठांना पाठवा.
७ अकादमीत प्रत्येक विषय समजून घ्या जरूर तर प्रश्न विचारा . तुमच्या शब्दात समजलेला विषय लिहून काढा
८ नवीन तंत्रज्ञान नवीन विषय आत्मसात करा जसे Forensic medicine, artificial intelligence, cyber crimes, economic offences, यांच्यात पारंगत व्हा
९ नेमणुकीच्या ठिकाणी हद्दीतील कार्यालये प्रसिद्ध लोक ह्यांना वारंवार भेटा तुमच्या कार्याची त्यांना माहिती द्या .
१० दैनंदिन गोष्टींबाबत जागरूक रहा . जमेल तेव्हा प्रसार भारती आकाशवाणी च्या माध्यमातून बातम्या पहा/   ऐका
११ अनेक विषय online उपलब्ध आहेत ते मुद्दाम शिकायचा प्रयत्न करा
१२ जमल्यास IB,  CBI , NIA सारख्या संस्थांमधे प्रति नियुक्तीवर जा .
१३ मुंबई सकट कुठेही नेमणुकीस तयार रहा . रहायची अडचण वाटली तरी ती सहन करा . मुंबईत राहण्याने   तुम्हाला काम शिकायला मदत होईल
१४ तुम्हाला कोणी भ्ष्टाचार करायला लावल्यास त्याची सविस्तर नोंद ठेवा योग्य वेळ येताच   त्याचा उपयोग करा.
१५ तुमच्या प्रत्येक कामास तुम्ही जबाबदार आहात व न्यायालयात त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण देयावे लागेल यांचे भान ठेवा
१६ कोठडीतील छळवणूक करू नका. तुम्ही गोत्यात येऊ शकता.
१७ तुम्ही गणवेशात असा किंवा नसा तुमच्यावर केव्हाही जीवघेणा हल्ला होऊ शकतो . त्या साठी सतत तयारीनिशी सुसज्ज रहा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बळीचा वापर करणे ही तुमची जबाबदारी आहे . त्यात कचरू नका.
१८ जे काम तुम्हालाच करायचे आहे ते तातडीने पूर्ण करा. त्या नंतर routine कामे करा अन्यथा वेळ कधीच पूरणार नाही .
१९ प्रामाणिकपणे काम करा
२० आई वडिलांना विसरू नका.
२१ तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर राहून साथ देईल अशा व्यक्तीशी विवाह करा.
तुमचे यश म्हणजे राष्ट्राचे यश हे लक्षात ठेवा . 
Videos

ब्राह्मण अविकसित आहेत का?

By on August 21, 2023

ब्राह्मण अविकसित आहेत का?

प्रवीण दीक्षित

माजी पोलीस माहासंचालक, महाराष्ट्र

 

स्वातंत्र्यपूर्वकाळामधे आपल्या समाजातील अनेक नामवंत व्यक्तींनी राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे बहुमोल कामगिरी करून, केवळ आपल्या जातीबांधवांनाच नव्हे तर जातीची बंधने ओलांडून देशातील सर्व समाजाला फार मोठे मार्गदर्शन केले होते. दुर्देवाने गांधीहत्येनंतर विनाकारण ब्राह्मण समाजातील शेकडो कुटुंबांना आपल्या घराची व सम्पत्तीची राखरांगोळी होतांना पहावे लागले; त्यामुळे प्रसिद्ध कादंबरीकार व आनंदीगोपाळचे लेखक श्री. ज. जोशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व ब्राह्मण समाज हा स्वयंकेंद्री झाला व त्याने अन्य समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून दिले. ह्याचा परिणाम म्हणून समाजातील हजारो तरूण तरूणी देश सोडून इतर राष्ट्रांमधे गेले व तिथे त्यांनी स्वतःचे अत्युच्च यशाचे शिखर पादाक्रांत केले. ब्राह्मणांवरील शारीरिक हल्ले जरी आता फारसे होत नसले तरीही त्यांना नावे ठेवायचे, शाब्दिक टोमणे मारायचे आणि विनाकारण त्यांची निंदानालस्ती करायची हा स्वतःला नेते म्हणविणार्‍या अनेक व्यक्तींचा गेली अनेक दशके लाडका उद्योग आहे. अन्य वर्णीयांना सतत ब्राह्मणांविरुद्ध खरे खोटे सांगत राहून ब्राह्मणांनी आमच्यावर अत्याचार केले अशी आवई कोणत्याही पुराव्यांशिवाय उठवत राहणे ह्याच्यामधेच त्यांना आनंद मिळत असतो. दुर्दैवाने ह्यामागे भारत तोडो हा परकीय शक्तींचा कुटिल डाव आहे व त्याला काही लोक बळी पडत आहेत.

परंतु ह्या सतत होणार्‍या उपेक्षेने किंवा ब्राह्मणांना होणार्‍या सर्व प्रकारच्या विरोधाने किंवा पारंपारिक व्यवसायाला खीळ बसल्याने प्रचंड गरीबीला न घाबरता ब्राह्मण समाजाने आपली मूल्यांवरील श्रद्धा ही सतत मनःपूर्वक जपली आहे. मिळेल त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्यातही आपली अस्मिता, भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचार जपणे आणि वाढवत राहणे, कोणतेही काम हे हलके किंवा निषिद्ध न समजता प्रामाणिकपणे कौशल्याने, सचोटीने करत राहणे ही ती मूल्ये आहेत. त्यात महिला असोत वा पुरूष; मुले असोत वा वृद्ध, स्वतःचा स्वाभिमान राखून, एकमेकांना मदत करून परंतु कोणाकडेही तोंड न वेंगाडता कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीच्या मार्गाला न जाता, फसवाफसवी न करता ब्राह्मण समाज वाटचाल करत आला आहे व ती अव्याहत चालू आहे. वेळ पडल्यास वाराने दुसर्‍यांकदे जेवून, एकवेळ उपाशी राहून अनेकांनी विद्याभ्यास पूर्ण केला व अपल्या अनेक नातेवाइकांना शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली.  कोणत्याही प्रकारे आरक्षणाचा फायदा नाही, किंवा शिष्यवृत्या नाहीत तरीही ब्राह्मण समाजातील अनेक मुले, मुली यांनी मोठमोठ्या पदव्या मिळवल्या आहेत व ज्ञानसमृद्धी केली आहे.

 आजही ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती अत्युच्च पदी पोचलेल्या असल्या तरी आपले हजारो जातीबांधव हे निम्न मध्यमवर्गीय ह्या स्तरात मोडतात व त्यांच्यासाठी यशाच्या संधी अजून उपलब्ध व्हायच्या आहेत.  हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ही मुले मुली आम्हाला मदत करा असे म्हणणार नाहीत तरीही जे आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत त्यांनी आपल्या यशाची गुरुकिल्ली ह्या मुलांसाठी उघड करणे आवश्यक आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार ह्यातल्या अनेक विभागांमधे दरवर्षी हजारो व्यक्तींची स्पर्धा परीक्षा घेऊन भरती केली जाते. ह्या संबंधीची माहिती आज आंतर्जालाच्या मार्फत सर्वांना आपल्या टिचकीवर उपलब्ध आहे. केवळ भारत सरकारचाच विचार केला तर, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल हया सारख्या सहा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनी मागील पाच वर्षात दोन लाख लोकांना रोजगार दिला आहे. ह्या शिवाय येणार्‍या 18 महिन्यात 10 लाख युवकांना रोजगार देण्याचा मोदी शासनाने निश्चय केला आहे. महाराष्ट्रातही 75 हजार युवकांना लवकरच रोजगार देणार असल्याचे महाराष्ट्राचे नेते व ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस ह्यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही रोजगार व शिक्षण ह्यात आर्थिक मागास व अन्य कोठलेही आरक्षण नसलेल्या अशा गरिबांसाठी 10% आरक्षण घटनेस अनुसरून आहे असा ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारने अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था हयाला मान्यता दिली आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरू होइल. ह्या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजातील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अमृतची स्थापना करण्यात आली आहे. ब्राह्मण तरुणांना स्पर्धा परिक्षेत मदत दे्ण्याचा अमृतचा निर्धार आहे.

सनदी सेवांसाठी तरूण विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची `स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर’ येथे सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते. आवश्यक त्या विषयांच्या टिप्पणी, प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा ह्यांची तज्ज्ञांकडू तयारी करून घेतली जाते. महेश कुलकर्णी (9820364243) हे वरील काम निष्ठेने करीत आहेत. अशाच प्रकारे स्पार्‌क संस्था (9823298147) पुण्यात निःशुल्कपणे काम करीत आहे. व्यवसायातही आज अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा आपण फायदा घेला पाहिजे.

माझ्या वडिलांची मी शाळेत असतांनाच डोळ्यांनी दिसत नाही ह्या कारणासाठी नोकरी गेली. पण तरीही शाळेचे शिक्षण मी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झालो. महाविद्यालयात व विश्वविद्यालयात गुणांमुळे नादारी मिळाली व पुणे विद्यापीठ येथून उत्तम गुणांनी पदवी घेतली. School of International Studies JNU येथून पदव्युत्तर अभ्यासक्रम शिष्यवृत्ती मिळवून पूर्ण केला. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर रोटरी क्लबतर्फे अमेरिकेतील Duke विद्यापीठातील School of Public Policy येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली. यथावकाश मी पोलिस महासंचालक झालो व सर्वांना आनंद झाला.

तुम्ही जर प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केला असेल तर अनेक संधी तुम्हाला शोधत येतात व त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे अधोरेखित करण्यासाठी मी हे उदाहरण सांगत आहे.तरूणांनी मिळणार्‍या प्रत्येक संधीचा आह्वान समजून स्वीकार करावा. येणार्‍या अडचणींवर मात करावी व आायुष्यात यशस्वी व्हावे ही माझी व सर्व ब्राह्मण समाजाची कळकळीची इच्छा आाहे. ब्राह्मण अविकसित नसून ते स्वत;बरोबर सर्वांचा विकास घडवणारे आहेत.

——————   ——————–  ——————