पूर्वांचल म्हणजे अष्टलक्ष्मी आणि आसाम हे भारताच्या ईशान्येकडील एक महत्त्वाचे राज्य तथा ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते.आसामचे सर्वात मोठे शहर गुवाहाटी आहे.गेल्या काही दशकात आसाम देशविघातक आणि उग्रावादी कृत्याच्या गतिविधीचे केंद्र बनलं होते.आसामला हिंदुस्तान पासून तोडण्याचा डाव रचणाऱ्या उग्रवादी,दहशतवादी सशस्त्र संघटना तेथे मोठ्या प्रमाणात कार्यरत होत्या.स्वतंत्र आसामची मागणी करणारी उल्फा United Liberation Front of Asom आणि स्वतंत्र बोडो लँडची मागणी करणारी एन.डी.एफ.बी (National Democratic Front of Bodoland ) संघटनाचे अनेक सशस्त्र गट तेथे सक्रिय काम करत होते.नंतरच्या काळात या संघटनेचे अनेक उग्रावादी कृत्य करणारे गट झाले होते.परंतू गेल्या तीन दशकात तेथे शांतता नांदत आहे.आसाम तथा पूर्वांचलमध्ये राष्ट्रीय एकात्मता,शांतता प्रस्थापित झाली असून त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या बलिदानाची महत्त्वाची भूमिका आहे.प्रमोद नारायण दिक्षित पूर्वांचल मधील बलिदानी संघ प्रचारक होते. आसाम प्रदेशाची भौगोलिक रचना,घुसखोरी आणि देशविघातक शक्तीचा प्रभाव लक्षात घेता संघाने पूर्वांचलमध्ये त्या काळात संघाच काम तेथे मोठ्या संघर्षा मधुन उभे केलेल आहे.जुन्या काळातच संघाचे पहिल्या फळीतील प्रचारक दादाराव परमार्थ, वसंतराव ओक आणि कृष्णाजी परांजपे यांनी पूर्वांचलच्या आसाम मध्ये संघ कामाच्या राष्ट्रवादी विचारांची पेरणी केली होती आणि कठीण परिश्रम तथा संघर्षा मधुन संघाचे काम तेथे स्थायी स्वरूपात उभे केलेल आहे.पूर्वांचल मधील आसाम त्रिपुरा, केरळ मध्ये फुटीरवादी शक्ती कडून संघ कामाला सतत प्रचंड विरोध झालेला आहे.संघ कार्यकर्ता आणि प्रचारक यांना मोठ्या संघर्षाला तेथे तोंड सुद्धा द्यावे लागले होते.त्यामध्ये अनेक स्वयंसेकांच्या क्रूरपणे हत्या सुद्धा झालेल्या आहेत. परंतु जीवा ची पर्वा न करता प्रसंगी बलिदान देऊन संघ स्वयंसेवकानी संघाचा राष्ट्रवादी विचार त्या भूमीत पेरला,जिवंत ठेवला आहे.म.गांधी यांच्या हत्येचा खोटा आरोप करून आज ही डावे, ढोंगी सेक्युलर संघाला बदनाम करण्याची चर्चा देशात निरंतर करतात.परंतू संघाला बदनाम करणारी हीच दांभिक मंडळी पूर्वांचल मध्ये झालेल्या शेकडो संघ कार्यकर्ता व प्रचारकांच्या क्रूर हत्या संबंधी ब्र शब्द न काढता मुंग गिळून गप्प बसतात.साधी चर्चा सुद्धा करत नाहीत.त्यामुळे प्रमोद दिक्षित यांच्या बलिदान स्मरणदिना निमित्त डावे व ढोंगी सेक्युलर पोंगापंडीत यांचा ढोंगी तथा दुटप्पी चेहरा ओळखण्याची आवश्यकता आहे.
प्रमोद दिक्षित आसाम मध्ये प्रचारक पुणे जिल्ह्यातील भोर येथील असलेला दिक्षित परिवार पुणे येथे स्थायिक झालेला असून प्रमोद नारायण दिक्षित पुण्याचे स्वयंसेवक होते.त्यांचा जन्म दि.५ जून १९४९ रोजी पुण्यात झाला.शिक्षण सुद्धा पुण्यातच झाल.पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी.एससी चे शिक्षण पूर्ण केलं.लहानपणीच संघाच्या शाखे सोबत त्यांचा संपर्क आला होता.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रभावित झालेले प्रमोद दिक्षित संघाचे कार्यकर्ते झाले आणि पुढे प्रचारकी जीवन सुद्धा स्विकारले.आणीबाणीच्या दडपशाही कालखंडात त्यांनी भूमिगत राहून जनजागरणाच कठीण काम केले होते.पुढे त्यांनी नौकरीचा विचार न करता १९७८ साली प्रचारकी जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि पुणे शहरा मधून संघाचे प्रचारक म्हणून निघाले होते.त्यांना आसाम कार्यक्षेत्र देण्यात आले होते.संघाच्या कार्यपद्धती मध्ये संघाने दिलेल्या कार्यक्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे लागते.प्रचारकी जीवन एक साधना असुन संघ कार्य तपश्चर्या तेथे आपल्या मनाने काम करता येत नाही. हा संस्कार प्रमोद दिक्षित यांच्या रक्तात असल्यामुळे ते आसाममध्ये प्रचारक म्हणून दाखल झाले.नालबारी येथे प्रचारकी जीवनास सुरुवात केली.भाषा खानपान आणि अपुरी साधने इत्यादीवर मात करून त्यांनी नालबारी येथे जवळ पास चार वर्ष काम केल्या नंतर त्यांच्या कडे आसाम मधील गुहावटी नगर प्रचारक दायित्व आले होते.काम उभे करतांना नवीन प्रयोग व कल्पकता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट होते.मजुरा पासून प्रथम श्रेणी अधिकारी आणि के.जी ते पी.जी विद्यार्थ्या सोबत संवाद साधून त्यांना संघ कामाशी जोडण्याच कौसल्या त्यांच्या अंगी होते.म्हणूनच त्यांनी गुवाहाटी शहरात नवीन प्रयोग,नवीन कल्पकतेचा वापर करून संघ कामाला स्थायी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.त्यामधील रक्तदान चळवळ हा मोठा प्रयोग म्हणावा लागेल.
डॉ. हेडगेवार स्मारक रक्तनिधी प्रमोद दिक्षित गुहावटी नगर प्रचारक असताना गुहवटी मध्ये रक्तदानाची मोठी समस्या होती.अनेक वेळा रुग्णांना रक्ता साठी पैसे मोजावे लागत.तसेच नागरिका मध्ये रक्तदाना विषयी प्रचंड गैरसमज आणि अंधश्रद्धा सुद्धा होती.त्यामुळे अनेक वेळा रक्ताच्या अभावी रुग्ण दगावत सुद्धा असत.प्रमोद दिक्षित यांनी रक्त समस्येच्या मुळाशी जाऊन कायम स्वरुपी उपाय करण्या साठी प्रयत्न सुरू केले.संघ गीता मधील खालील ओळी प्रमाणे समस्याचे आव्हान स्वीकारून कायम स्वरुपी रचना गुहावटी शहरात उभी केली. भगवंताचे जया लाभले, चिर विजयी वरदान ! संघा वाचून कोण स्वीकारिल काळाचे आव्हान॥ प्रमोद दिक्षित यांनी रक्तदाना विषयी समाजात जन जागरण करून जागरूकता निर्माण केली. त्यासाठी तरुणा मध्ये संपर्क ठेवून विस्तृत रक्तदाता सूची केली संदेश वहनाचे अपुरे साधने असतांना तत्पर संपर्क योजना सुद्धा आखली.डॉक्टरा सोबत विशेष संपर्क ठेवून रक्तगट तपासणी शिबिरांचे आयोजन आणि त्याद्वारे रक्तदाता सूची अद्यावत करण्यावर विशेष लक्ष दिले. त्यामुळे गुहावटी शहरात रक्त समस्याचे निदान होऊन कायम स्वरुपी रचना उभी झाली. या कार्याला समाज व्यापक स्वरूप देण्यासाठी डॉक्टर हेडगेवार स्मारक रक्तनिधी संस्था स्थापन करण्यात आली.आसाम मध्ये ही संस्था आज रक्तदान चळवळीत मोठे योगदान देत असून संघाच काम सुद्धा वर्धिष्णू ठरत आहे.
छातीवर गोळ्या झेलणारा निडर प्रमोद दिक्षित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धती मध्ये प्रचारकांचे भौगोलिक कार्यक्षेत्र आणि दायित्व बदल नेहमीच अपेक्षित असतो. त्यानुसार प्रमोद दिक्षित यांचे गुहावटी कार्यक्षेत्र बदल होऊन त्यांना बारपेटा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती.प्रमोद दिक्षित यांनी गुहावटी शहरात संघ कार्या सोबतच सेवा कार्याला सुद्धा स्थायी स्वरूप दिले होते.त्यामुळे त्यांनी बारपेटा जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्ती होताच तेथे सुद्धा नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली.शंकरदेव शिशू निकेतन हा त्यांचा नवीन प्रयोग म्हणावा लागेल.बारपेटा जिल्हात त्या काळी उग्रवादी संघटनांचा मोठा प्रभाव होता उल्फा United Liberation Front of Asom)संघटनेचे जाळे होते.तसेच पश्चिम आसामात बारपेटा,बक्सा,चिरांग,कोकराझार परिसरातNational Democratic Front of Bodoland या बोडो उग्रवादी संघटनेच्या हालचालीही मोठ्या प्रमाणात होत्या.त्यामुळे उग्रवादी संघटनाच्या गडात मध्ये संघाच काम करणे सोप नव्हते तर आव्हानात्मक काम होते.प्रमोद दिक्षित यांनी उग्रवाद्याचे आव्हान स्वीकारून तेथे संघ काम उभे केले, संघ कामाची व्याप्ती सुद्धा वाढविली होती पण ही संघ कामाची व्याप्ती उग्रवाद्याच्या डोळ्यात सतत सलत होती.दिनांक १६ ऑगस्ट १९९१ रोजी प्रमोद दिक्षित बारपेटच्या केशवधाम संघ कार्यालयात असताना सशस्त्र उग्रावादी कार्यालयात घुसले त्यांनी.प्रमोद दिक्षित यांनाच विचारणा केली प्रमोद दिक्षित कोण आहे. कार्यालयात आलेले व्यक्ती उग्रावादी आहेत हे माहित असताना सुद्धा निडर असलेल्या प्रमोद दिक्षितानी क्षणाचाही विलंब न लावता आसामी भाषेत उत्तर दिले मीच प्रमोद दिक्षित आहे.उग्रावादयाने पिस्तूल काढले धडाधड गोळ्या झाडल्या. झालेल्या गोळीबारात प्रमोद दिक्षित रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि धारातीर्थी पडून संघ कार्या साठी हुतात्मा ठरले आहेत.वयाच्या ४२ वर्षी राष्ट्र कार्यासाठी हुतात्मा ठरलेल्या स्व.प्रमोद दीक्षित यांचे बारपेटा येथे स्मारक असून संघर्ष आणि निडरतेची समाजाला साक्ष देते.स्मृती दिना निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी लेख आहे. अशोक राणे,९४२३६५८३८५
July 27, 2026
July 21, 2026
June 23, 2026
May 25, 2026
May 4, 2026
May 4, 2026
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2026 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimited