भारतात हरवलेल्या मुलींचा प्रश्न आजही तितकाच गंभीर आहे. यासंदर्भात सरकारी आणि पोलीस स्तरावर ‘मुस्कान’सारख्या मोहिमा राबविल्या जातात आणि बर्याच मुलींना त्यांच्या कुटुंबांकडे सुुखरुप सुपूर्दही केले जाते. पोलिसांबरोबर अनेकविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही या मोहिमांमध्ये आवर्जून सहभागी होतात. परंतु, तरीही या समस्येवर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. नुकताच ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने या समस्येवर नेमक्या कशाप्रकारे उपाययोजना राबविता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख…