प्रवीण दीक्षित
अवधूत वाघ ह्यांनी लिहिलेल्या माओवाद ह्या छोट्या पुस्तिकेच्या निमित्ताने हे दोन शब्द मांडत आहे. ह्या पुस्तिकेतून लेखकाने माओवाद, नक्षलवाद ह्याची सुरवात कशी झाली पासून आजची त्याची स्थिती ह्याबद्दल तरुणांना मार्गदर्शन केले आहे. सामान्य लोकांनीही हे समजुन घ्यावे ह्यासाठी त्यांनी ही माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
मार्क्सवाद हा जर्मन लेखक मार्क्स याने तो इंग्लंडमधे असताना कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी मांडला पण तिथे त्याला कोणी स्वीकारले नाही. संधिसाधू लेनिनने ह्याचा वापर करून रशियातील झारशाही संपवली व लोकशाहीचा गळा घोटला. स्ट्यालिनने त्याचा वापर करून लाखो लोकांची निघृण हत्या केली. पुढे माओने ह्याच्या मदतीने चीनमधे अनन्वित अत्याचार केले व स्वतःची हुकुमशाही स्थापन केली. त्यामधे त्याच्या अनेक सहकार्यांनी भ्रष्टाचार करून स्वतःचे उखळ पांढरे केले. आज ह्या दोन्ही देशांनी हे तत्वज्ञान निरुपयोगी आहे हे ओळखून त्याचा त्याग केला आहे.
भारतातीलही अनेक लोकांनी आम्ही कामगारांचे, मजुरांचे भले करतो अशा थापा मारून लाखो लोकांचा असलेला रोजगार संपवला व त्यांना देशोधडीला लावले. आज ह्या सर्व नेत्यांना जनतेने मतपेटीच्या मार्फत घरी बसवले आहे. तरीही शहरी नक्षलवादाच्या रूपाने विकास घडू दयायचा नाही, लोकांना भ्रमित करायचे व प्रगती होऊ द्यायची नाही हे त्यांचे उद्योग चालुच आहेत. आत्मसमर्पण केलेल्या अनेक पूर्वीच्या नक्षलवाद्यांनी जाहीर कबुली दिली आहे आमचा हिंसक क्रांतीचा मार्ग चुकला, लोकांनी आम्हाला नाकारले आहे व आम्ही घटनामार्गाने लोकांची परिस्थिती सुधारायला उत्सुक आहोत.
तेव्हा आतातरी ह्या डाव्या चळवळीतील लोकांना शहाणपण येईल अशी आशा बाळगून त्यांचा खरा चेहरा समजण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे व शहाणे व्हावे असे माझे आग्रहाने सगळ्यांना सांगणे आहे.
March 4, 2026
February 24, 2026
February 21, 2026
February 9, 2026
January 19, 2026
November 13, 2025
November 12, 2025
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted