पोलीसनामा आॅनलाईन-
राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांची मॅट कोर्टाच्या प्रशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे. प्रविण दीक्षित यांनी राज्याचे पोलिस महासंचालक पद तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी यापूर्वी यशश्वीपणे पार पाडली आहे. ते नागपूरचे पोलिस आयुक्त देखील होते. एसीबी च्या प्रमुखपदी असताना त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली होती.
मॅट कोर्टाच्या प्रशासकीय सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.