2024 मधील महाराष्ट्रातील निवडणुकींचा अन्वयार्थ
प्रवीण दीक्षित
मे 2024 मधे देशतील अन्य भागांप्रमाणे महाराष्ट्रातही लोकसाभेच्या निवडणुका झाल्या व त्यात BJP प्रणीत NDA गटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात नोव्हेंबर मधे विधान सभेच्या निवडणुका झाल्या. त्यात मात्र BJP च्या नेतृत्वातील महायुती गटाला 52 वर्षांनंतर 200 हून अधिक 235 जागा जिंकता आल्या. अनेकांनी ह्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. BJP चे नेते व ह्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार देवेन्द्र फडणवीस ह्यांनी जनमतापुढे आपण नतमस्तक असून हे यश पंत प्रधान नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, विकासाच्या अपेक्षेने केलेले आहे, असे विनम्रतेने म्हणून ह्या विश्वासाला पात्र ठरण्यास येणार्या काळात प्रयत्न करू असे उद्गार काढले.
ह्या उलट काँग्रेस च्या राहूल गांधीनी हे अनपेक्षित असून ह्या निकालाची चौकशी झाली पाहिजे, नाना पटोले ह्यांनी EVM बरोबर नसल्याचे सांगून आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ म्हणून सांगितले. तर कार्ती चिदंबरम् ह्यांनी सांगितले, EVM मधे काही घोटाळा असेल असे वाटत नाही. राष्ट्रवादी (श प) गटाचे शरद पवार ह्यांच्या मते वापरलेली EVM ही गुजरात मधून आल्याने घोटाळा झाला असावा असे म्हटले. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्यामते हे असंभव असून ही लाट नसून त्सुनामी आहे. हे निकाल ठरवून घडवलेले आहेत व संजय राऊतांच्या मताप्रमाणे पुन्हा निवडणुक घेण्याची आवश्यकता आहे. मनसेच्या राज ठाकरे यांच्या मतेही हा EVM चा घोटाळा आहे. त्यांच्या विरार हून हरलेल्या उमेदवाराच्या मते निवडणुक हे थोतांड आहे व ह्याची आवश्यकताच नाही. पण ही त्यांची हाकाटी व्यर्थ आहे कारण अदयाप कोणीही EVM कसे चुकीचे आहे हे दाखवून देऊ शकलेला नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही EVM विरोधी याचिका रद्द करून मत पत्रिका परत कधीही वापरल्या जाणार नाहीत हे अधोरेखित केले आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे नेते व कार्यकर्ते गाफील राहिले व त्यामुळे बर्याच जागी त्यांचे थोडक्यात नुकसान झाले. मतांची टक्केवारी मात्र कायम होती व त्यामुळे, देवेन्द्र फडणवीस विधान सभा निवडणुकीतील विजयाबद्दल ठाम होते. मागील चुकांपासून शिकून अर्थकारण व धर्मकारण ह्यांची त्यांनी सांगड घातली. समाजातील ज्या घटकांना आर्थिक सहाय्याची नितांत आवश्कता होती, अशा गरीबीने गांजलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण ही य़ोजना, बेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना, विविध सामाजिक घटकांसाठी जातीनिहाय महामंडळे, असे अनेक निर्णय घेतले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. शिवाय, उद्धव ठाकरे ह्यांनी आकसाने बंद पाडलेले अनेक विकासाचे प्रकल्प पूर्ण केले. ह्या उलट उद्धव ठाकरे मुख्य मंत्री असताना त्यांनी अनेक सामान्या लोकांना तुरुंगात डाबले, पालघर येथे साधूंची निर्घृण हत्या होऊनही त्यात विशेष लक्ष्य दिले नाही, लव्ह जिहाद घटनांकडे काना डोळा केला, कलंकित पोलिस अधिकार्यांना पुनर्वसित केले, शरद पवार पक्षातील गृह मंत्र्यांनी पोलिस अधिकार्यांना 100 कोटी आणून देण्यास सांगितले, राहुल गांधी वारंवार स्वा. सावरकरांवर बेछूट आरोप करून त्यांचा जाणून बुजुन अपमान करीत होते, ह्या सर्व गोष्टी मतदारांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नह्वत्या. ह्याचा परिणाम होऊन अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय, व उच्च वर्णीय गटांनी बहुमताने महायुतीच्या उमेदवाराना भर भरून मतदान केले आहे. परंतु कोणीही मुसलमानांनी मात्र महायुतीच्या उमेदवारांना मत न देऊन स्वतःचे नुकसान करून घेतले आहे.
राहूल गांधींच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडीचे नेते खोटे नाटे आरोप करीत होते की BJP संविधान बदलणार आहे, आरक्षण समाप्त करणार आहे. प्रतयक्षात, जात निहाय गणना करून हिंदू समाज विघटन करायचे, व तुष्टी करणासाठी मुसलमानाना आरक्षण द्यायचे हा काँग्रेसचा डाव होता. महाराष्ट्रातील आर्थिक प्रगतीतून मिळणारा पैसा स्वार्थासाठी वापरायचा, भ्रष्टाचार करायचा, हे उद्दिष्ट होते. शिव सेना शिंदे गटातील उमेदवारांना पाडायचा राज ठाकरे ह्यांचा उद्देश होता व त्यासाठीच फक्त त्यांच्या विरुद्ध मनसे ने उमेदवारउभे केले होते. शरद पवारांना आशा होती, की त्यांच्या शिवाय नवीन सरकार बनू शकणार नाही. परंतु मतदारांनी ‘एक है तो सेफ है, व बटेंगे तो कटेंगे’ ह्या घोषणातील अर्थ ओळखुन नकारार्थी प्रचार करणार्या विरौधी पक्षांच्या सर्व महत्वाकांक्षी नेत्यांना घरी बसवले.
हरले तरीही, म्हणून हे नेते त्यांच्या सहकार्यांना स्वस्थ बसू देणार नाहीत. त्यांच्या कडून प्रोत्साहन घेणार््या जरांगे पाटील सारख्या व्यक्ती पुन्हा जोमाने काम करायला लागतील. जॅार्ज सोरोस कडून निधी घेऊन शहरी नक्षलवादी विकास कामे बंद पाडायचे प्रयत्न करतील. ओवेसी व भाइबंद जातीय दंगली घडवायला मागे पुढे पाहणार नाहीत.
त्यामुळे सामान्य जनतेने स्वा. सावरकरांच्या शिकवणुकी प्रमाणे सर्व हिंदु समाज एकसंध ठेवून आपला उत्कर्ष करायला मदत करणार्या BJP प्रणीत महायुती बरोबर राहणे ही काळाची गरज आहे.
******************** ******************* ***************
December 2, 2024
December 1, 2024
December 1, 2024
November 16, 2024
November 16, 2024
November 10, 2024
November 10, 2024
November 10, 2024
October 31, 2024
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted