Recent

Articles

दहशतवादाविरुद्ध महाराष्ट्रातील लढाई

By on November 26, 2026

प्रवीण दीक्षित

1993 पासुन महाराष्ट्र सतत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. समुद्रमार्गे आलेल्या स्फोटकांनी मुंबई परिसरात भीषण स्फोट कररून शेकडो निरपराध लोकांचे बळी घेतले. परंतु त्यातील आरोपींना शिक्षा देण्याच्या प्रयत्नात पुन्हा हल्ला होऊ शकेल ह्याकडे दुर्लक्ष झाले. 26 नोव्हेबर 2008 साली दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी अभूतपूर्व असा हल्ला केला व त्यातही शेकडो निष्पाप भारतीय व परदेशी लोक जिवाला मुकले. त्यानंतरही जवेरी बाजार सारख्या ठिकाणी स्फोट करून दहशतवादी हल्ले चालूच राहिले. 2008 सालच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन पथके जाहीर केली. एक म्हणजे दहशतवाद विरोधी पथक व दुसरे प्रभावी प्रतिसाद देण्यसाठी शस्त्रसज्ज व विशेष प्रशिक्षणप्राप्त कमांडो दल म्हणून “फोर्स वन”.

दहशतवाद विरोधी पथकाकडे गुप्त माहिती संकलन व विस्लेषण, दहशतवादाच्या अनुषंगाने रॅडिकलायझेशन व डिरॅकलायझेशन संदर्भातील उपाययोजना, दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांची नोंद व तपास ही कामे दिलेली होती. 

सद्यस्थितीत दहशतवाद विरोधी पथक व “फोर्स वन” या दोन्ही विशेष पथकांचे प्रशासकीय नियंत्रण स्वतंत्र वरिष्ठ अधिकार्‍यांकडे असल्यामुळे आवशयक त्या प्रमाणात एकात्मिक नेतृत्व व समन्वय साधण्यात अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान, समन्वितव परिणामकारक करण्यासाठी राज्य सुरक्षा दलातील “फोर्स वन” पथकाचे प्रशासकीय व कार्यकारी नियंत्रण यापुढे दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य याच्या अधिपत्याखाली राहील असा शासन निर्णय 16 नोव्हेंबर 26 रोजी प्रसृत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हा भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचे इंजिन आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई व आजुबाजुच्या परिसरात सतत देशविरोधी दहशतवादी कारवाया करणे पाकिस्तानप्रणित दहशतवादी संस्थांचे व विविध धार्मिक कडव्या संघटनांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुंबई जवळील भिवंडी भागात 9 डिसेबर 2023 रोजी NIA ने पडघा जि. ठाणे व पुणे, मुंबई वगैरे 44 ठिकाणी धाडी घालून 15 आरोपींना अटक केली. होती. पडघा गावाला अल् शाम नाव ठेऊन त्याला सिरीयाचा भाग म्हणून जाहीर करण्यात आले होते. ह्यात दहशतवादी साकिब नाचन, मुलगा शामिल नाचन, भाऊ अकिब नाचन ह्याचा सामावेश आहे.  ह्या आरोपींनी मुंबई सह अनेक ठिकाणी जाऊन रेकी केली होती. त्यांना विदेशातून पैसा मिळत होता. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची त्यांची तयारी होती. ड्रोनने हल्ला करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात होते. साकिब नाचन संघटनेत सहभागी होणार्‍यांना “बायथ’’ म्हणजे ISIS साठी निष्ठा ठेवण्याची शपथ देत होता. पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार हे त्याचे ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल. काश्मीरचे निमित्त करुन या दहशतवादी संघटना सातत्याने भारतविरोधी कारवाया करत असतात. विशेषतः, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील सुशिक्षित मुस्लिमांमध्ये धार्मिक मूलतत्ववादाचा प्रसार करुन त्यांची माथी भडकावण्याचे काम ह्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे. अशा प्रकारच्या मूलतत्ववादाने, कट्टरतवादाने प्रभावित झालेले लोक आपल्याला देशभरात अनेक ठिकाणी सापडत आहेत. 15 ऑगस्ट 2026 च्या सुमारास पाकिस्तानी आय् एस, आय् ह्या संस्थेचा सदस्या असलेल्या शबनम भट्टीने भारतातील 300 तरुणांना रॅडिकलाइज करून त्यांना अंमली पदार्थ, शस्त्रे, स्पोटके ह्यांचे प्रशिक्षण दिल्याचे उघडकीस आाले आहे. त्यानंतर भारत शासनाने विविध राज्यायतील पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रासह अनेक राज्यात एकाच वेळी कारवाई करुन 300 हून अधिक दहशतवाद्यांनी कोणतीही दुर्घटना करण्यापूर्वीच अटक केली व मोठा अनर्थ टाळला. भारत सरकारने दहशतवादाशी लढताना झीरो टॉलरन्स हे धोरण जाहीर केले आहे. तसेच कोणतेही दहशतवादी कृत्य म्हणजे पाकिसा्‌तानने भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध समजले जाईल असेही घोषित केले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात दहशतविरोधी लढाई अनेक स्तरांवर प्रखरपणे लढणे गरजेचे होणार आहे.

ह्या संदर्भात 14 नोव्हेंबर 26 रोजी जर्मन सरकारने घटना दुरुस्ती करुन गुप्तचर यंत्रणांना केवळ राष्ट्रविरोधी माहिती गोळा करण्याच्या पलीकडे जाऊन दहशतवादी ताकदींच्या दुष्ट कारवायांची साखळी तोडण्याचे एकत्रित अधिकार दिले आहेत, ह्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. 2021 पासून ISI च्या Inter Services Public Relations (ISPR) ह्या संस्थेला OTT चा वापर करून भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. ह्या पार्श्वभूमिकेवर महाराष्ट्र शासनाच्या वर उल्लेखिलेल्या निर्णयानंतर दहशतवाद विरोधी पथक ह्या सर्व बाबींवर अधिक प्रभावीपणे कारवाई करेल अशी अपेक्षा अहे.

TAGS
RELATED POSTS