Recent

Articles

भारताच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग

By on June 8, 2026

भारताच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग :- प्रवीण दीक्षित माजी पोलिस महासंचालक

पुणे :- भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारश्याबाबत भारतीयां मध्येच न्यूनगंड निर्माण करून जातीय विद्वेष आणि लिंग भेदभाव वाढीस लावून आपआपसात भांडणे उभी करून भारताच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचे मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले .

श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक स्पार्क फाऊंडेशन संचालित स्पार्क ॲकडमीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी दीक्षित बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर जीएसटी विभागाच्या सहआयुक्त संजाली डायस, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी संचालक पुरुषोत्तम लोहिया , स्पार्क ॲकाडमीचे संचालक महेश पोहनेरकर , प्रकल्प प्रमुख मनिषा नरडेकर , माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य शरद सारडा , शैक्षणिक संचालक स्वागत दरख आदी मान्यवर उपस्थित होते .

दीक्षित म्हणाले , चिन ने अमेरिकेच्या तथाकथित पुढारलेल्या हार्वर्ड आणि बोस्टन यांसारख्या विद्यापीठांत सुमारे १ ट्रीलियन डॉलरची गुंतवणूक केली असून या गुंतवणीकीद्वारे भारतीयांना मोठ्या रक्कमेच्या शिष्यवृत्त्या देऊन भारतीय तरुणांची डोके भडकविण्याचे काम केले जात आहे , असे मिळालेल्या माहितीनुसार आणि अभ्यासाअंती लक्षात आले आहे . एकिकडे भारतीय संस्कृती विषयी न्यूनगंड तयार करणे आणि एकिकडे मार्क्सवाद आणि जिहादी वृत्तींना प्रोत्साहन देणे असा दुहेरी डाव मांडला आहे .भारतीयांनी या कटा चे बळी ठरू नये .जाती जातीत विद्वेष आणि कटूता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे .भारतावर आता पूर्वी सारखे थेट हल्ले करू शकत नसल्याने भारतीय संस्कृती आणि परंपरेचा पाया भुसभुशीत करणे आणि भारतीय नीतिमूल्यांची नाकेबंदी करण्याचे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुटील कारस्थान आहे .

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीक्षित म्हणाले की , स्पर्धा परिक्षां द्वारे एखादे पद मिळवणे ही प्राथमिक पायरी असून पुढील प्रवासाचे हे पहिले पाऊल आहे . प्रशासकीय सेवेत काम करतांना नागरीकांप्रती संवेदनशिलता बाळगत त्यांच्या विषयी उत्तरदायित्वाची भावना बाळगावी . स्पर्धा परीक्षांद्वारे महिलांचा टक्का वाढत आहे हा कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहे .

जीएसटी विभागाच्या सहआयुक्त संजाली डायस त्यांच्या मनोगतात म्हणाल्या , स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन लोकसेवेचा हा राजमार्ग असून सीमेवर लढणारा योद्धा आणि प्रशासकीय अधिकारी देशसेवा करीत आहेत . प्रशासनातील प्रत्येक पद हे महत्वाचे आहे .

प्रास्ताविक अकॅडमी च्या प्रकल्प प्रमुख मनिषा नरडेकर यांनी केले. तर स्पार्क ॲकाडमीचे संचालक महेश पोहनेरकर यांनी स्पार्क ॲकाडमी बाबत माहिती दिली . वैष्णवी दुर्गे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले .

छायाचित्र ओळी :-श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक स्पार्क फाऊंडेशन संचालित स्पार्क ॲकडमीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी यशवंत विद्यार्थी आणि मान्यवर .

TAGS
RELATED POSTS