Policing for women
By Praveen Dixit, IPS
It is indeed heartening to see the various government, semi government and non government bodies engaged in securing women’s rights, celebrating the annual international women’s day. However, the same can not be said about the plights and challenges facing women.
In today’s world, women are often found to be engulfed by issues like female infanticide, the trading of minor girls through internet, child marriages, Eve teasing, rape and sexual exploitation, dowry related torture, domestic violence, workplace harassment, mental persecution, financial hardships faced by widows, neglect of old women, financial and cyber crimes against women. Besides, they are routinely made to suffer the injustice and inequality for being women.
The government has always been sensitive against such crimes and cases of discrimination. Stringent laws and legal remedies have been framed besides launching the toll free line 112 India app and 1930 for cyber complaints. Even anonymous complaints can be launched through www.cybercrime.gov.in
The fact that, despite all such initiatives, there is a rise in crimes against women every passing year. This needs to be looked at its roots.
The number of cases registered against women are quite negligible as against the quantity of injustice heaped on them. Irrespective of being rich or poor, younger or old, of any religion or caste, women are found to be victims of such atrocities. Yet, the pressure from family members or direct / indirect criticism by the nearby residents, or the fear of being shamed prohibits them from exposing the injustice. They keep fearing the perpetrators and suffering the trauma all through their life. The accused, on the other hand, keep roaming freely with zero guilt, poised for many more such brazen acts.
There exists a major need for the NGOs and Police Mitras to step ahead for helping the women victims to register the cases and give witness accounts.
TECHNOLOGY PAVES THE WAY
Empowering women through technology and digitisation is possible and now essential, too, for the rate of conviction to go higher.
Today, several big cities have CCTV systems installed, by virtue of which, some crimes can also be prevented before these are committed and cops are expected to act speedily or even better, in advance.
The use of Artificial intelligence is enabling faster reporting of events and inputs. Though the CCTV installation at schools, gardens and workplaces has remarkably restricted the street level crimes, there has been a constant rise in complaints of domestic violence.
Honour killings of girls by father or brother under the pretext of bringing disrepute to the family name have not stopped. Similarly, number of cases of sexual harassment at workplaces are yet to see a downward trend. Cases of cheating & occasionally murders of those who prefer live in relationship are being reported frequently.
The increase in the Cyber crimes is indeed worrisome. It is painful to see people losing their lives’ earnings to cheats in a moment and then ending their lives in depression. This necessitates the speedy investigation on an urgent basis, to save lives. It is pertinent to keep the cyber help lines functional during the night as most of the cyber crimes occur after the working hours.
UK has already declared the Cyber attacks and allied crimes as terror crimes. India needs to follow suit.
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त
प्रवीण दीक्षित
पूर्व पोलीस महासंचालक
नुकताच महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणार्या सर्व शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींनी जागतिक महिला दिन साजरा केला. परंतु महिलांना भेडसावणार्या समस्या कमी झाल्याचे काही दिसत नाही.
मुलगी म्हणून होणार्या भ्रूण हत्त्या, लहान मुलींचा पैशासाठी आंतरजाला मार्फत होणारा व्यापार, मुलींची छेडछाड, महिलांवरील बलात्कार, हुंड्यासाठी छळवणूक, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी दिला जाणारा त्रास, महिलांचा मानसिक छळ, विधवा महिलांना सोसाव्या लागणार्या आर्थिक हाल अपेष्टा, वृद्ध महिलांची होणारी उपेक्षा , महिलांविरुद्ध होणारे आार्थिक व सायबर गुन्हे अशा अनेक प्रकारे महिलांना सतत त्रास होत असतो. त्याशिवाय, महिला म्हणून होणारी उपेक्षा, पुरुषांच्या तुलनेत असमान वागणूक ह्यांनाही महिलांना सतत तोंड द्यावे लागते.
महिलांवर होणारे गुह्ने, व भेदभाव पूर्ण वागणूक ह्याविरुद्ध शासन नेहमीच संवेदनाशील राहिले आहे व सतत त्यासाठी कठोर निर्बंध (कायदे) करण्यात आले आहेत. महिलांसाठी toll free 112 India app & for cyber complaints 1930 सुरु करण्यात आल्या आहेत. असे असूनही महिलांविरुद्धचे गुन्ह्ने दरवर्षी वाढत आहेत.त्याची कारणे काय आहेत ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
महिलांविरुद्ध दाखल होणारे गुह्ने हे प्रत्यक्षात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या तुलनेत नगण्य असतात. महिला श्रीमंत असोत अथवाा गरीब, लहान असोत किंवा मोट्या, कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या त्या ह्या अत्याचारांमुळे पीडित असतात. पण तरीही घरातील व्यक्तींच्या दबावामुळे, आजुबाजूस राहणार्या लोकाकडून होणार्या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष टीकेमुळे, लाजेमुळे महिला आपल्यावरील झालेले गुन्ह्ने उघड करायला धजावत नाहीत व त्यामुळे अत्याचारांची व्यथा आयुष्यभर सहन करीत राहतात व गुह्नेगाराना भीत राहतात. त्याच बरोबर, अन्याय करणारे गुह्नेगार मात्र उजळ माथ्याने फिरत राहतात व असे अनेक अन्याय करण्यास निर्ढावतात.
पीडित महिलांनी गुह्ने दाखल करण्यासाठी तसेच न्यायालयात आरोपी विरुद्ध साक्ष देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच पोलिस मित्रांनी पुढे येउन मदत करयची मोठी गरज आहे. Digitisation चा फायदा घेउन महिलांना त्यासंबंधी सक्षम करण्याची मोठी गरज अहे. त्यामुळे गुह्ने शाबीत होण्याच्या प्रमाणात ही वाढ होइल.
आज अनेक मोट्या शहरात CCTV लावण्यात आले आहेत. त्यांचा उपयोग करून गुह्ने होण्यापूर्वीच पोलिस अधिकार्यांनी त्यांची नोंद घेउन गुह्नेगारावर कारवाई करणे अपेक्षित आहे. Artificial intelligence चा वापर करून त्वरित सूचना देण्याचीही सोय लवकरच करण्यात येणारआहे. रयग्णालये, शाळा, बागा, कामाची ठिकाणे ह्या ठिकाणी CCTV लावण्याने तिथे होणार्या गुह्न्यांना खूपच चाप बसला आहे.
परंतु, घरगुती हिंसाचाराच्या गुह्न्यात मात्र सतत वाढ होत आहे. घराण्याचा अपमान झाला ह्या नावाखाली घरातील बाप, भाउ मुलीची हत्या करताना आढळतात. तसेच कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळाची प्रकरणे ही वाढत आहेत.
Cyber गुह्न्यांमधे होणारी वाढ चिंताजनक आहे. एका क्षणात पूर्ण आयुष्याची कमाई नाहिशी झाल्यामुळे लोकांमधे नैराश्य येऊन लोक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे ह्या गुह्न्यांचा तपास अत्यंत तातडीने होणे आवश्यक आहे. बर्याच वेळा हे गुह्ने कामाच्या वेळेनंतर होतात, हे लक्षात घेऊन cyber help lines रात्रीही चालू ठेवणे जरूरीचे अहे. Cyber गुह्ने म्हणजे दहशतवादाचे गुह्ने असे इंग्लंड मधे नुकतेच जाहीर करण्यातआले आहे. भारतात ही त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे.
—————– ————————— ————–
राष्ट्रीय सुरक्षा दिन
प्रवीण दीक्षित.
निवृत्त पोलीस महासंचालक.
‘‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’’ निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षेबद्दल अंतर्मुख होऊन प्रत्येकाने गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. सध्या चालू असलेल्या व कधी संपेल हे माहित नसलेल्या रशिया विरुद्ध युक्रेनच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांमधील युद्ध, अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर इस्लामच्या नावाखाली चाललेले धर्मलंड माणसांचे महिलांवरील अत्याचार व दहशतवादाला प्रोत्साहन, चीनच्या विस्तारवादाच्या धोरणामुळे सीमेवरील अनेक देशांना वाटणारी सततची भीती अशा अनेक गोष्टींमुळे राष्ट्रीय सुरक्षेला केंव्हा तडा जाईल अशी परिस्थिती भेडसावत आहे. ह्यामुळे निर्वासितांचे लोंढे सुरक्षिततेसाठी स्वतःचा देश सोडून दुसर्या देशात जाण्यासाठी कासावीस झालेले आहेत. 30 ते 40% वेगाने वाढणार्या चलन फुगवट्यामुळे अनेक देशातील लोक मेटाकुटीला आले आहेत व नोकरी व्यवसायातून मिळणार्या अल्पशा पैशांमधे जगणार्या मध्यमवर्गीय लोकांना रोजचे दोन वेळचे संतुलित जेवण मिळणे सुद्धा स्वप्न ठरावे अशी चित्रे दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक देशांमधे घडतांना दिसत आहेत. सैन्यातील अधिकार्यांची मुजोरी, जमीनदारांचे बेपर्वा वर्तन व भ्रष्टाचार ह्यामुळे भारताच्या शेजारी असलेल्या अनेक देशांमधे लोकशाही केव्हाच संपलेली असून अराजक चालू आहे. अशा ह्या जागतिक परिस्थितीत भारत अलिप्त राहील किंवा भारतावर त्याचा परिणाम होणार नाही असे वाटून घेणे स्वतःची फसवणूक ठरेल.
जगातील अन्य ठिकाणांच्या तुलनेत भारताचे वेगळेपण हे केवळ भारतातील सनातन धर्म, त्याची शिकवण, भारतातील वेद, उपनिषदे ह्यातून निर्माण झालेले संस्कार व भारतातील कुटुंब व्यवस्था ह्याच्यामुळेच टिकून आहे. सतत सकारात्मक, केवळ आपल्यालाच नव्हे तर जगातील सर्व लोकांना मदत करण्याची इच्छा, सत्चारित्र्य, सद्गुणांवरील श्रद्धा हे भारताचे वैशिष्ट्य आहे; परंतु पाश्चिमात्य संस्कृतीच्या वरवर आकर्षक वाटणार्या पण खरोखर विनाशाकडे नेणार्या अनेक गोष्टींना भारतीय लोक बळी पडतील ह्यासाठीचा प्रचार अनेक माध्यमातून सतत चालू असतांना दिसतो. राष्ट्रीय सुरक्षा ही भारतातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा, कुटुंबाची सुरक्षा व एक भारत श्रेष्ठ भारत ह्या संकल्पनेवर आधारीत आहे. ह्याशिवाय भारतातील करोडो लोक हे जगातील अनेक देशांमधे नोकरी, शिक्षण, व्यवसाय निमित्ताने गेलेले आहेत. आज त्या ठिकाणीही त्यांच्यावर ते सनातन धर्मावरती विश्वास ठेवतात म्हणून जीवघेणे हल्ले केले जात आहेत. भारतातीलही लव्ह जिहाद च्या रूपाने होणारी तरुण महिलांची हत्या व फसवणुक ही काळजी निर्माण करणारी आहे. कुटुम्बापासून दूर राहणारे व एक एकटे असलेले वृद्ध हे सहज बळी पडतील अशी परिस्थिती आहे.
भारतातील पारंपारिक व्यवसाय नाकारून, कोणतीही कौशल्ये निर्माण न करणाार्या पुस्तकी-शिक्षणाची पद्धत स्वीकारण्यामुळे भर तारुण्यात निराशाग्रस्त होऊन अनेक तरूण, तरूणींमध्ये पारंपारिक गुन्हे, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे करण्याकडे कल वाढत आहे. ह्याशिवाय तरूणपणीच अनेक तरूण, तरुणी आत्महत्येसारखे नको ते पाऊल उचलत आहेत. मनःस्वाथ्य बिघडल्यामुळे आज अनेकजण भयंकर अशा ड्रग्ज, दारू अशा व्यसनांना बळी पडलेले आहेत. किंबहुना, भारततातील तरुणांना व्यसनाधीन बनवण्यासाठी शेजारील देश ड्रोन्स, जल, जमीन व हवाई मार्गाने तस्करी मार्फत ड्रग्ज पाठवण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. गेल्या एका वर्षात 80,000 कोटी रुपयांची ड्रग्स तस्करी उघडकीस आणून हे ड्रग्ज नष्ट करण्यात आले.
भारत एकसंध राहून त्याची प्रगती होउ नये ह्यासाठी अंतर्गत दुफळी माजवणे, भारतातील लोकांना हाताशी धरून शासनावरील विश्वास नाहीसा करणे, ह्यासाठी अनेक देश कटिबद्ध झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबींपासून दूर राहणे हे राष्ट्रीय सुरक्षा दृढ करणे आहे.
युद्धात पराभव झाल्याने,अल्पसंख्य जमातीतील तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांचामार्फत लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या सनातन धर्मातील लोकांच्या हत्या करणे, धर्माधर्माच्या अनुयायांमधे दंगे घडवणे हा शेजारील राष्ट्रांचा भारत खिळखिळा करण्याचा उपाय आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीमधील तरूणांमधे डाव्या विचारसरणीचे बीज पेरून विकासाची कामे उद्ध्वस्त करणे, विकास होऊ न देणे हेच काही मुठभर लोकांचे उद्दिष्ट झाले आहे. शहरातीलही अनेक प्राध्यापक, विद्यापीठातील तरूण, कलाकार वकील या प्रचाराला बळी पडून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या रूपाने जगातील अनेक देश भारतात निधी पाठवून धर्माधर्मात, जातीजातीत, स्त्री-पुरुषांमधे भेद निर्माण करून ठिकठिकाणी लोकशाहीने दिलेल्या हक्कांचा गैरवापर करून भारताच्या प्रगतीमधे खीळ घालत आहेत. ह्या सर्वांपासून विचारपूर्वक सावध राहणे आवश्यक आहे.
वैय्यक्तिक आपातकालामधे मदत मिळण्यासाठी भारतसरकारने 112 India हे विनामुल्य अॅप सुरू केले आहे. स्वतःच्या स्मार्टफोनमधे ते प्रत्येकाने सुरू करून सुरक्षा-दलांबरोबर संपर्कात राहणे जरुरीचे आहे. अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणे हा सर्वांचा हक्क असला तरीही प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नव्हे. हे ओळखून आपापसातील मतभेद हे चार श्रेष्ठ माणसांच्या मदतीने सामोपचाराने सोडवणे हे शहाणपणाचे आहे. आर्थिक सुरक्षेसाठी रोकड व्यवहार न करता डिजिटल पेमेंट्स ही पद्धत स्वीकारणे म्हणजे जोखीम कमी करणे आहे. मी बदलणार नाही, असा अभिमान न बाळगता, अद्ययावत राहणे ही काळाची गरज आहे. शहरे वाढत असतांना रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळणे म्हणजे स्वतःची सुरक्षा वाढविणे हे समजून स्वतः तर हे नियम पाळावेतच पण इतरांनाही ते मोडण्यापासून परावृत्त करणे जरूरीचे आहे. मुले मुली ही राष्ट्रीय संपत्ती समजून लहानपणापासूनच त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. दिवसेंदिवस लहान मुलांनी केलेले गुन्हे वाढत आहेत. त्यांच्याकडे लक्ष न दिल्यास त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. प्रगती करत असतांना वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ह्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यात्मातील तत्त्वांवर विश्वास ठेऊन केलेली प्रगतीच शाश्वत सुखाकडे नेऊ शकते त्यामुळेच भारतीय परंपरा, संस्कार ह्यांचावर दृढ विश्वास ठेऊन नवनवीन शास्त्रीय व तांत्रिक गोष्टींचा स्वीकार केल्यास स्वतःची व राष्ट्राची सुरक्षा करण्यास आपण मदत करणार आहोत. प्रश्न आहे की तुम्ही तयार आहात का?
———————————————
भारत – चीन संबंध
प्रवीण दीक्षित
(निवृत्त पोलीस महासंचालक)
2014 मधे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान, चीन ह्या भारताच्या पारंपारिक शत्रूंबरोबर संबंध सुधारण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न केले. पहिल्य शपथविधीच्या वेळेसच पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आले. तसेच चीनचे प्रमुख शी झिंपिंग ह्यांना सपत्नीक भारतात बोलावून त्यांचे अहमदाबाद, चेन्नाई वगैरे ठिकाणी आदरातिथ्य करणयात आले. तसेच नरेंद्र मोदी यांनी चीनला भेट देऊन दोन्ही देशातील आर्थिक संबंध सुधारण्यावर भर दिला व सीमाप्रदेश तसेच व्यापारातील तूट व इतर अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे परस्पर संबंध कलुषित होणार नाहीत ह्याची पराकाष्ठा केली. विविध आंतर्राष्ट्रीय बैठकांमधेही सहभागी होऊन चीन बरोबरचे सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
असे असूनही 2019 मधे चीनने डोकलाम ह्या 18,000 फूट उंच असलेल्या अक्साई चीन, लडाख ह्या भागात धुमश्चक्री करू भारताच्या जवळ जवळ 30 शूर सैनिकांना शहीद केले. ह्यात चीनचे किती सैनिक मेले हे चीनने शेवटपर्यंत उघड केले नाही पण, उपग्रह-चित्रांप्रमाणे 100 हून अधिक चिनी सैनिक मेल्याचा अंदाज आहे. त्यानंतरही पुढचे जवळ जवळ 20 महिने विविध स्तरांवर सैन्याच्या अधिकार्यांमधे बोलणी झाल्यानंतर ह्यावर्षी मोदी व शी ह्यांची मध्य आशियातील बैठकीपूर्वी चीनने आपले सैन्य मागे घेतले. त्यानंतर आता पुन्हा अरुणाचल प्रदेशमधे चिनी सैन्य भारतीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना, भारतीय सैन्याने त्यांना पिटाळून लावले. मध्यंतरीच्या काळात सीमावर्ती प्रदेशात चीनने सैन्यासाठी पक्की सोय केल्याचे आढळते. पँगाँगत्से तलावाच्या चीनच्या बाजूला चीनने पक्के रस्ते बांधल्याचेही नजरेस आले आहे. चीनच्या लडाख,अरूणाचल प्रदेश, सिक्कीम व अन्य ठिकाणी चाललेल्या विस्तारवादी प्रयत्नांना भारताने कडक आक्षेप घेतला आहे व जोपर्यंत सीमा प्रदेशातील चिनी सैन्य मागे हटणार नाही तो पर्यंत भारत -चीन आर्थिक संबंध सामान्य होणार नाहीत हे स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानातील हाफिज सईद व इतर अनेकांना आंतर्राष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे ह्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमधे भारताने आणलेल्या प्रस्तावाला नकाराधिकार वापरून चीनने अमान्य केले. त्याहीवेळी दहशतवाद्यांना हा पाठिंबा आहे व त्यामुळे जगात चीनची नाचक्की होत आहे हे सांगायला भारताने कमी केले नाही. चीनचा पाकिस्तानला मिळणारा सतत पाठिंबा व त्यामधून चीनची पाकिस्तानी बंदरांकडे जाण्याची वाट निर्धोक ठेवणे हे कारण आहे. हे भारताने अधोरेखित केले आहे.
चीनचे हे विस्तारवादी प्रयत्न 1955 सालापासून चालू होते. 1959 मधे केंद्रीय सुरक्षा दलाच्या 10 जवानांना हॉटस्प्रिंग्ज येथे चीनने ठार मारले. 1962 मधे काहीही कारण नसतांना भारतावर आक्रमण केले. 1950 पासून तिबेट गिळंकृत करून हजारो तिबेटी, बुद्धिस्ट लोकांना व धर्मगुरू दलाई लामांना परागंदा होण्यास भाग पाडले. त्या वेळेस काँग्रेसच्या नेतृत्त्वातील भारत सरकारने, “हा भाग ओसाड आहे. तेथे गवताचे पातेही उगवत नाही.’’ असे सांगून चीनच्या विस्तारवादी धोरणाकडे दुर्लक्ष केले. भारतीय सैन्याला दुसर्या महायुद्धातील बंदूका वापरायला भाग पाडण्यात आले. बर्फासाठी आवश्यक कोटपरखा, बूट इत्यादि आावश्यक साहित्येही उपलब्ध करून दिली नाहीत. तरीही मेजर शैतानसिंग सारख्या शूर भारतीय जवानांनी रिझांग्ला, चिशूल येथे कडवी झुंज दिली व हौताम्य पत्करले. सीमावर्ती प्रदेशात रस्ते, पूल, दळणवळणाची साधने दिल्यास त्याचा चीनला फायदा होईल असे सांगत काँग्रेस सरकारने तिथे राहणार्या लोकांकडे व त्यांच्या अपेक्षांकडे पूर्ण काणाडोळा केला. ह्याउलट मोदी सरकारने सीमावर्ती प्रदेशामधे भारतीय वायुदलासाठी आवश्यक धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण केले. येथे अत्याधुनिक लढावू विमाने, सुसज्ज लांब पल्ल्याच्या तोफा, पेगँगत्सो तलावात पहारा देण्यासाठी वेगवान नौका व इतर अनेक अत्यावश्यक सैनिकी मदत वर्षाच्या सर्व काळात मिळेल ह्याची चोख व्यवस्था केली. तसेच ह्या सर्व भागात, प्रचंड परिश्रम करून व अधुनिक तंत्रज्ञान वापरून पक्के रस्ते, पूल, बोगदे ह्यांची निर्मिती केली आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे भारतीय सैन्याचे तसेच सीमावर्ती प्रदेशातील जनतेचे मनोबल उंचावले आहे. ह्याशिवाय पंतप्रधान मोदी स्वतः दोकलाम चकमकीनंतर ह्या भागात गेले व त्यांनी सैन्याचे अभिनंदन केले.
आन्तर्राष्ट्रीय स्तरावर ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे चीन भारताच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्त्व मिळू नये ह्या साठी चीन सतत नकाराधिकार वापरत असतो. ह्यावरील कारवाई करतांना भारताने चीनची अनेक अॅप्स भारतात वापरली जाणार नाहीत असे निर्बंध घातले आाहेत. भारतीय जनतेनेही आम्ही चीनचा माल वापरणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
छोट्या देशाांना प्रचंड प्रकल्प बनवून देतो असे सांगून त्यादेशांना आर्थिक डबघाईला आाणणे व त्यानंतर त्या देशांना पूर्णपणे हतबल करणे हे चीनचे धोरण श्रीलंकेच्या परिस्थितीतून उघड झाले आहे. ह्या उलट भारत मात्र दक्षिणपूर्व आशिया, आफ्रीका येथील अनेक देशांना त्यांना आवश्यक ती मदत देत आहे. त्यामुळे चीनला प्रत्युत्तर म्हणून इंडोनेशिया सारखे देश भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करून भारतावरील विश्वास दृढ करीत आहेत, हाच मोदींच्या परराष्ट्र नीतीचा विजय म्हणणे आवश्यक आहे.
———————————————
This section is widgetized. To add widgets here, go to the Widgets panel in your WordPress admin, and add the widgets you would like to Blog Sidebar.
*This message will be overwritten after widgets have been added
Praveen Dixit, IPS retired as DGP Maharashtra. He also worked as DG Anti Corruption Bureau. Mr Dixit is decorated with President’s Medal for Distinguished Services and for Meritorious Services. Special Rapporteur, National Human Rights Commission, in charge of Maharashtra and Goa. Mr Dixit also retired as Vice Chairman (Administrative) in Maharashtra Administrative Tribunal at Mumbai.
© 2022 Praveen Dixit – Copyright – Designed & Developed By Host2Unlimted