Articles

Traffic Reforms

By on April 21, 2022

वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न एक दिवस किंवा एक आठवडा मर्यादित न ठेवता सतत चालू राहणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यात जनतेचा सहभाग वाढू शकेल व ठोस प्रगती करता येईल. ठिकठिकाणी निर्माण होणारे वाहतूकीतील अडथळे, वेळा व ठिकाणे हे लोकांच्या मदतीने नक्की करणे गरजेचे आहे. त्यातील जे अडथळे रस्त्यावरील अनधिकृत आक्रमणामुळे निर्माण झाले आहेत ते महानगरपालिकेच्या सहाय्याने कालबद्ध स्वरूपात दूर करण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. अनेक इमारतींमधे वाहने लावण्याची व्यवस्था असूनही वाहने रस्त्यावर उभी केली जातात. अन्य देशांप्रमाणे रस्त्यावर वाहन लावण्यासाठी पैसे आकारले जावेत. गर्दीच्या वेळेस त्या ठिकाणी जास्त आकार घेतला जातो. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे येथेही तातडीने आकार घेण्याची आवश्यकता आहे. अनेक वाहने न वापरता वर्षानुवर्षे ठिकठिकाणी उभी दिसतात.  रस्त्यावरील कोणतेही वाहन सात दिवसापेक्षा अधिक उभे दिसल्यास महानगरपालिकेच्या मदतीने उचलून नेण्याची व संबंधित वाहन मालकास दंड करण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने सर्व राज्यांना आदेश दिलेला आहे की. वाहनचालकांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम वाहतूक सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांना देण्यात यावी.  त्याची अम्मलबजावणी तातडीने आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांची कमतरता भरून काढण्यासाठी स्थानिक दुकाने, गृह सहकारी संस्था यांच्याकडून वाहतूक पोलीस मित्र (Traffic Wardens)  तातडीने नेमण्याची गरज आहे.

वर सुचवलेले बदल करण्याने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.

______________   ________________________________

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT