परम मित्र प्रकाशनातर्फे प्रकाशित व माधव भांडारी लिखित डाव्यांचा खरा चेहरा ह्या उत्कृष्ट पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भाग घेण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. ह्या पुस्तकास अत्यंत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना अशोक मोडक ह्यांनी लिहिलेली आहे. पुस्तकात लेखकाने सदर विषय 13 भागात सविस्तर मांडला आहे. शेतकरी, कामागार, दलित, अल्पसंख्य व गरिबांच्या नावाने व त्यांच्या खर्या खोट्या मागण्यांचे आपणच प्रवक्ते आहोत असा कांगावा करीत आपला खरा चेहरा लपवायचा व हिंसाचाार करायचा ही डाव्यांची वस्तुस्थिती आहे. प. बंगाल, त्रिपुरा व केरळ ह्या राज्यांचा त्या साठी त्यांनी प्रयोग शाळा म्हणून वापर केला. नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी उग्र चेहरा आहे. विश्वासघात हाच त्यांचा उद्योग आहे. डाव्यांच्या भ्रष्टाचाराचे वास्तव, विरोधाचे केवळ ढोंग, बौद्धिक क्षेत्रातही भ्रष्टाचार ह्यावर ही लेखकाने प्रकाश टाकला आहे. डावे हे नामवंत खोटारडे आहेत व ते टोकाची असहिषणुता आणि कंपूशाही करतात, हे लेखकाने दखवून दिले आहे.
आचारो प्रथमः धर्मः अशी आपल्याकडे धर्माची व्याख्या केलेली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे जगत्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. सगळे सारखे आहेत वगैरे वरवर आकर्षक वाटणारी वाक्ये वापरून सामान्य लोकांना फसवायचे व प्रत्यक्षात फक्त स्वतः मजा करायची असा ढोंगी पणा करणारे डावे आहेत. हे रशियातील स्टॅलिन असो नाहीतर चीन मधील माओ असो ह्यांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते. रशिया व चीन मधील भ्रष्टाचार जगविख्यात आहे. निरपराध हजारो लोकांचा बळी घेण्यात आला. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा असे भारतातील त्यांचे अनुयायी स्वतःला डावे म्हणत भारतातही असाच हिँसाचार व भ्रष्टाचार करत आहेत.
युरोपमधे 18व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली व यंत्रांच्या सहाय्याने वस्तु बनवायला सुरवात झाली. त्याच बरोबर मालक व कामगार असे दोन वर्ग निर्माण झाले. मालक कामगारांचे कायम शोषण करतात, जमीनदार भूमीहीन मजुरांची पिळवणुक करतात, श्रीमंत गरीबांना नाडतात असे तत्वज्ञान मार्क्स ने मांडले. प्रत्यक्ष इंग्लंड मधे मार्क्स चा विशेष परिणाम झाला नाही, परंतु रशियातील लेनिन नी त्याच्या पासून प्रेरणा घेतली व तिथे लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेजवळ पोचुन लोकशाही संपवली व कम्युनिस्टांची सत्ता स्थापना केली. लेनिन नंतर स्टॅलीन पासून गोर्बाचेव पर्यंत कम्युनस्टांची सत्ता चालू राहिली. मध्यंतरी चीन मधे माओने सत्ता काबीज केली व तिथेही त्याच्यापद्धतीची कम्युनिस्ट राजवट सुरु केली. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक भारतीय तरुण शिकायला केंब्रिज विद्यापीठात गेले व कम्युनिस्ट होऊन परत आले. त्याची सविस्तर माहिती व त्यांचा खोटारडेपणा लेखकाने सविस्तर कागद पुराव्यासकट विशद केला आहे. ह्यापैकी अनेक जण भारत सरकारचे मंत्री झाले किंवा परराष्ट्र सेवेत, प्रशासकीय सेवेत रुजू झाले. सामान्य जनतेविरोधी धोरणे तयार करणे व भारताचे तुकडे होतील ह्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांची नीती होती. कामगारांच्या हितासाठी आपण लढतोय असे दाखवायचे परंतु अशी टोकाची भूमिका घ्यायची की रोजगार देणार्या संस्था बंदच पडतील. हाच प्रकार शेतकर्यांच्या बाबतीतही होता. कसेल त्याची जमीन ह्या गोंडस तत्वाखाली सर्व जमीन मालक उध्वस्त झाले, मालक झालेल्या मजुरांना जमीन विकता न येण्यामुळे व भांडवल नसल्याने जमीन असूनही विशेष फायदा झाला नाही. शेतीसाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता होती व ते न मिळण्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसतात. त्याच प्रमाणे वनवासी लोकांच्या हक्कांसाठी नक्षलवादी चळवळ सुरु केल्याचे भासवण्यात आले, प्रत्यक्षात मात्र त्यातून नक्षल्यांचे अर्थकारण सुरु झाले व त्यांना जिथे शासन नाही अशी दण्डकारण्याची जागा स्वतःसाठी सुरक्षित करता आली. बस्तर जिल्हयात बाहेरच्यांना जाण्य़ास बंदी पण मिशनर्य़ांना मुक्तद्वार. त्यामुळे अबुजमलचा डोंगर हा नक्षल्यांचा गढ बनला आहे.ह्याला प्रमुख कारण त्या वेळचा डाव्या विचारसणीचा जिल्हाधिकारी बि अेन् शर्मा. हा नंतर नीती आय़ोगा पर्यंत पोचला. मुख्यतः दलित आणि आदिवासी महिला ह्या नक्षल्यांच्या अत्याचारांचे लक्ष्य आाहे. कित्येक लहान मुलांना; मुलींना नक्षल्यांनी घरातून पळवून जबरदस्तीने बाल सैनिक म्हणुन बरबाद केले आहे. नक्षलवाद हा संघटित गुह्नेगारीचा प्रकार बनला असुन त्याला कोणतेही तात्विक अधिषठान नाही. शहरी नक्षलवादााचे खरे स्वरूप लेखकाने विशद केले आहे. खोटी माहिती पसरवणे, सुपारी देउन खून करणे, उठावासाठी निधी गोळा करणे, खटल्यांच्या कामात कार्यकर्त्यांना मदत करणे, भूमिगत कार्यकर्त्यांना लपण्यासाठी आसरा देणे अशी कामे हे करत असतात. हया सर्व गोष्टी लेखकाने सविस्तर मांडल्या आहेत.
लोकशाहीने चालणार्या भारताचा विनाश करणे व खुद्द चीनमधेही तिथल्या सत्ताधार्य़ांनी नाकारलेल्याा माओवादाच्या नावाखाली सर्वंकश सत्ता हस्तगत करणे हे भारतीय़ डाव्यांचे उद्देश आहे हे नीट समजून घेउन जनतेने ते नाकारणे आवश्यक आाहे, हे सगळ्यांना समजावून सांगण्याचे आवाहन लेखकाने केलेले आहे व ते अगदी बरोबर आहे.
आंतर्राष्ट्रीय स्तरावर भारत विरोधी भूमिका घ्यायची, चीनची बाजू घेउन भारतावर टीका करायची, स्वतःला कम्युनिस्ट न म्हणता डावे म्हणायचे, काँग्रेसमधे घुसायचे व काँग्रेसही त्यांना सामील करून घेत होती, कारण तेही ह्या आंतर्राष्ट्रीय व्यवस्थेचे लाभार्थी होते व हाच डाव्यांचा खरा चेहरा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे.
अनेक उदाहरणे देउन लेखक पटवून देतात की भ्रष्टाचार हाच डाव्यांचा शिष्टाचार होता. केवळ राजकारणातच नह्वे तर शैक्षणिक, ऐतिहासिक, प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातही अप्रामाणिकपणा हे डाव्यांच्या वागण्याचे वैशिष्ट्य आहे. चुकीचा इतिहास पसरवून देशात, समाजात धार्मिक संघर्ष पसरवणे डावे करत होते.
केवळ सामान्य वाचकांनीच नह्वे तर सर्व राजकारणी लोकांनी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे, असे मी आग्रहाने सांगीन.