Articles

बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप

By on April 15, 2022

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलिस महासंचालक

गेल्या २५ वर्षात बदलत्या नवीन तंत्रज्ञानाने समाजात क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. देश विघातक शक्ती ह्या नवीन तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवुन विशिष़्ट धर्मातील  सुशिक्षित तरुण मुलांना व मुलीँना मूलतत्ववादी बनवून त्यांच्या कडून दहशतवादी कृत्ये करुन घेत आहेत. त्यातील काहीजण ISIS  साठी सीरिया, अफगाणीस्तान येथे पकडले गेले आहेत. अंतर्गत सुरक्षेसाठी हा फार मोठा धोका आहे.दहशतवादी ह्या कारवायांसाठी प्रचंड प्रमाणात ड्रग्स देशात पाठवून शस्त्रास्त्रे व निधी एकत्र करताना तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशातील तरुण सर्रास किळसवाणे गुन्हे करताना आढळून येत आहेत. शहरात होणार्‍या chain snatching, चोर्‍या, दरोड्याच्या घ़टनांमागे ड्रग्स ची च़टक हे प्रमुख कारण आहे. नवीन तंत्रज्ञानाने cyber crimes च्या माध्यमातून महिलांची फसवणूक व आर्थिक गुन्हे हया मधे दरवर्षी होणारी  वाढ ही भीती निर्माण करणारी आहे. आर्थिक लालचीने अनेक सुशिक्षित , महिला, वृद्ध आपले पैसे गेल्याची तक्रार रोज करताना आढळून येतात. समाज माध्यमातून ओळख झाल्याचे दाखवायचे व लग्न करण्याचे आश्वासन देवून महिलांची शारीरिक व आर्थिक फसवणूक करण्याचे गुन्हे वारंवार घ़डत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन लहान मुलांवर लैँगिक अत्याचाराच्या घ़टना व मुलीँना फूस लावुन पळवून नेण्याच्या घटनांमागे आंतर्राष्ट्ररीय़ टोळ्या निष्पन्न झाल्या आहेत.

T.V. channels  वर दिसणार्‍या सिनेमांमधील हिंसाचार व लैँगिकता, तसेच दारू, ड्रग्स ह्यांच्या व्यसनांनी महिलांची छेडछाड करण्याच्या घटनाही सर्वत्र वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे महिलांवरील बलात्काराच्या घ़टनांमध्ये ९८.५%  घ़टना ह्य़ा महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीँनी केलेल्या होत्या. पीडितेचे व़डील, भाऊ, नातेवाईक , शेजारी हेच आरोपी होते. अशा गुन्ह्यात पीडित व्यक्ती दिवस जाईपर्यंत पोलिसात तक्रार करत नाही व तक्रार केल्या नंतरही नातेवाईकांच्या दबावाने तक्रार मागे घेते किंवा न्यायालयात जबाब बदलते. त्यामुळे आरोपी धाडसी पणे समाजात फिरत राहतात. गेल्या काही वर्षात लग्न करण्या ऐवजी live-in relationship मधे राहण्याचा कल तरुणांमधे वाढत आहे. कालांतराने ह्यातील स्त्रिया ‘मला लग्नाचे आमिष दाखवले, माझ्यावर बलात्कार केला’ अशा तक्रारी करतात परंतु न्यायालय त्या तक्रारी अमान्य करते.

राजकीय़ व वैयक्तिक हेव्यादाव्यातून विरोधी व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी वकिलांकडे जायचे व दिवाणी गुन्हे फौजदारी गुन्ह्यात बदलायचे व पोलीसांवर दबाव टाकून विरोधकांना सतवायचे ही प्रवृत्ती वाढत आहे. खोटे गुन्हे दाखल करायला लावून विरोधी पक्षीयांना अटक करा, त्यांची पोलीस कोठडी मागा अशी मागणी राजकीय नेते वारंवार करतांना आढळतात. त्यामुळे पोलीस बळाचा गैरवापर होतो व समाजाचा पोलीसांवरील विश्वास कमी होत असतो. असे खटले न्यायालयात प्रदीर्घ काळ चालू राहतात व त्यामुळे विरोधी पक्षीयांना मनस्ताप सहन करायला लागतो. जे पोलीस अधिकारी अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यास व विरोधी पक्षीयांना अटक करण्यास नकार देतात, त्यांना आकसाने कठीण, दूरच्या ठिकाणी बदलले जाते. त्यामुळे पोलीस अधिकार्‍यांचे मनोधैर्य खच्ची होते. अनेक समाजविघातक शक्ती जसे वाळू माफिया, जमिन माफिया कर्तव्यदक्ष शासकीय व पोलीस अधिकार्‍यांवर  हल्ले करतात व काही वेळा ह्या निरपराध अधिकार्‍यांचा त्यात बळीही जातो.

राजकीय पक्ष वरील परिस्थिती सुधारण्यासाठी क्वचितच प्रयत्न करतांना दिसतात. उलट सांगू तसे वागणारे व भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांनाच कार्यकारी पदावर नेमले जाते. त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळून अशा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनाही निलंबित करावे लागते. ह्यासाठी पोलीस अधिकारी व जनता ह्यांच्यामधे विश्वासाचे वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी जनतेतील सुयोग्य स्त्री-पुरुषांना पोलीस मित्र म्हणून काम करण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. नवनवीन गुन्ह्यांबद्दल पोलीसमित्रांच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करणे व जनतेस स्वसंरक्षण करण्यास मदत करणे ह्यातूनच येणार्‍या काळात कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्यास मदत होईल.

—————————————-

 

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT