Articles

दहशतवादी कारस्थाने व उपाय

By on September 17, 2021

14 सप्टेंबर 2021 रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने विविध ठिकाणांहुन 6 दहशतवाद्यांना अटक केली.जान मोहम्मद अली शेख ऊर्फ समीर(वय 47),उस्मान (वय 22),मूलचंद (वय 47), झिशान कामर (वय28), मोहम्मद अबू बकर (वय 23), आणि मोहम्मद आमिर जावेद (वय 31) ह्या सहा जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी जान मोहम्मद अली शेख या मुंबईतील सायन येथे राहणार्‍या तरुणास मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी ट्रेनमधून रवाना झाला असता त्याला कोटा येथून अटक करण्यात आली. विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत दीड किलो `RDX’ ह्या दहशतवाद्यांकडून हस्तगत केले. चौकशीत उघ़डकीस आले की सण उत्सवाच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याचा ह्या सर्वांचा डाव होता. `ISIS’ पासून `अल् कायदा’ पर्यंत सर्वच दहशतवादी संघटना एकत्रित रीत्या हल्ले करणार होत्या. 1993 प्रमाणे मुंबईत साखळी स्फोट करणे, मुंबईतील लोकल्स मधे स्फोट करणे व त्यासाठी रेकी करणे असा त्यांचा विचार होता. जान महम्मद याचे वडील ओसामा दुबई येथे मदरसा चालवतात. ते व त्यांचा भाऊ ह्यांच्या सांगण्यावरून हे कारस्थान रचण्यात आले. दाऊद इब्राहिमचा भाऊ असिम ह्याने हवाला मार्फत आवश्यक पैसे उपलब्ध करून दिले. जान मोहम्मद आणि उस्मान हे जानेवारी महिन्यात मस्कत येथे गेले. तेथे त्यांच्या पासपोर्टवर Immigration ची मोहोर न उमटवताच हे दोघे बोटीने

पाकिस्तानातील थट्टा येथील दहशतवादी कँपमधे अन्य चौदा बंगाली बोलणारया व्यक्तींसह रवाना झाले. ह्याच दहशतवादी कँपमधे 2008 सालातील मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यातील कसाब ह्याला प्रशिक्षण देण्यात आले होते. ह्या दहशवाद्यांकडे सापडलेली स्फोटके ऑगस्टच्या सुरवातीस अमृतसर जवळील सीमा भागात Drone ने टाकण्यात आली होती. तेथून ती अन्यत्र नेण्याचे काम ह्या दहशतवाद्यांना देण्यात आले होते. ह्या दहशतवाद्यांना वेळच्यावेळीच पकडल्यामुळे मोठ्या घातपाताचा कट उघडकीस येऊ शकला. वरील माहितीवरून हे स्पष्ट आहे की हा दहशतवादाचा कट पाकिस्तानच्या ‘ISI’ ह्या गुप्तचर संस्थेने आखला होता व हवालामार्फत आवश्यक तो निधी गोळा करण्यात आला होता. त्यांना मदत करण्यासाठी स्मगलिंग करणार टोळ्यांमधील लोकं व ठिकठिकाणच्या मुसलमान व अन्य व्यक्तींची मदत घेण्यात आली होती. ह्यामधे पाकिस्तानशिवाय, दुबई, मस्कत ह्याही ठिकाणांचा वापर करण्यात आला आहे. तसेच अत्याधुनिक अशा Drone तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात आला आहे. ‘RDX’ ही स्फोटके केवळ लष्कराच्या ताब्यात असतात.परंतु पाकिस्तानी सैन्याने ती दहशतवाद्यांना पुरवलेली होती.

गेल्या महिन्यात पंजाबमधे 4 sleeping Cells उघडकीस आणण्यात आली. गेल्या काही महिन्यात ड्रोनच्या मदतीने भारताच्या सीमाभागात शस्त्रास्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले आहे. गेले काही महिने मुंबई, नवी मुंबई परिसरात कोट्यवधीचे हशीश व अन्य Drugs वारंवार पकडण्यात आले आहेत. यावरून Narcotics, अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके, हवाला, व दहशतवाद ह्यांचा जवळचा संबंध आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेतल्याने पाकिस्तानी लष्कराने तालिबानी दहशतवादी नेत्यांचे सरकार बनविण्यात पुढाकार घेतला आहे व तालिबानने काश्मीर मधे पाकिस्तानला मदत करावी अशी मागणी केली आहे. तालिबाननेही काश्मीरमधील मुसलमानांना मदत करणे हा आमचा हक्क आहे असे जाहीर केले आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सरकार स्थापन केल्यानंतर भारतातील काही राजकीय निरीक्षकांनी आता तालिबान नेते बदलले आहेत व त्यांच्यामुळे भारताला कुठलाही धोका नाही असे विचार व्यक्त केले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र पाकिस्तान व तालीबानी एकत्र येऊन त्यांना भारतामध्ये व काश्मीरमधे हिंसाचार घडवणे व येथील लोकशाही प्रणली संपुष्टात आणून तालिबानसारखे राज्य स्थापन करणे हाच उद्देश्य आहे. तालिबानच्या “आम्ही बदललो’’ वगैरे म्हणण्यावर थोडाही विश्वास न ठेवता त्यांच्या प्रत्येक कृतीकडे अत्यंत सावधपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

भारतातील सशस्त्र दले, नौसेना, तटरक्षक दल, सुरक्षा यंत्रणा व पोलीस ह्यांनी आपल्या प्रशिक्षणामधे आमूलाग्र बदल करणे आवश्यकआहे. आत्मघातकी हल्ले करणे हे तालिबानचे वैशिष्ट्य आहे त्या दृष्टीने रेल्वे स्टेशन्स, बस स्थानके येथे संशयित व्यक्ती व सामान ह्यांची वारंवार तपासणी आवश्यक आहे. सरकारी तसेच खाजगी वाहनांची अँब्युलन्सेसची तपासणी जरूरीची आहे. ड्रोन विरुद्ध तंत्रज्ञान लवकरात लवकर प्रभावी करणे व भारत पाकिस्तान सीमेवर ड्रोनच्या वापरास पूर्णपण बंदी करणे आवश्यक आहे. देशाच्या अंतर्गत भागात सुरक्षादले, पोलीस ह्यांनी केवळ Technical Intelligence अवलंबून न राहता, जमिनीवर प्रत्यक्ष काय चालू आहे हे कळण्यासाठी Human Intelligence
ची मदत घेणे गरजेचे आहे. समाजातील राष्ट्रप्रेमी अशा व्यक्तींना आवाहन करून त्यांनी दिलेल्या मदतीचे स्वागत करून सामान्य लोकांच्या मदतीने दहशतवाद्यांना मदत करणार्‍या व्यक्तींवर वेळच्या वेळी कठोर कारवाई अपेक्षित आहे. मूलतत्ववाद्यांच्या विरुद्ध मुसलमान लोकांचीही मदद घेउन बहकलेल्या तरुणांना आवरणे आवश्यक आहे. सोशल मीडिया Social media व इंटरनेट internet ह्यांचा गैरवापर करून दहशतवादी आपली कारस्थाने पार पाडत असतात. त्यामुळे संशयित व्यक्तींचे फोन, email वर लक्ष ठेऊन त्यांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. ह्या विरुद्ध केवळ राजकीय फायद्यासाठी आक्रोश करून सुरक्षा दले व पोलीस ह्यांचे मनोधैर्य खच्ची करणे हे राष्ट्रविघातक आहे. सर्वसाधारण लोकांनीही मोठ्या प्रमाणात पोलिस मित्र बनून देशाची सुरक्षा बळकट करणे गरजेचे आहे.

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT