आजच्या काळात गुन्हेगार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद, भ्रष्टाचार, बँकांना लुटणे, सायबर गुन्हे करत असतात. ह्याशिवाय पूर्वापार होणार्या शरीराविरुद्धचे गुन्हे, मालमत्ताविरोधी गुन्हे लाखोंच्या संख्येने होतात. ह्यातील गुन्हेगारांना अचूकपणे पकडणे व असे गुन्हे होणार नाहीत ह्यासाठी जागतीक पातळीवरील प्रगत देशात वापरले जाणारे अधुनिक तंत्रज्ञान तातडीने वापरणे ही काळाची गरज आहे. गुन्हा झाल्यानंतर होणार्या प्रचंड नुकसानापेक्षा Artificial Intelligence (AI) व Internet of things (IOT) ह्यांचा वापर करून कोणत्या ठिकाणी दहशतवाद किंवा बँकांना लुटणे, परदेशातून तस्करी किंवा धार्मिक दंगली अशाप्रकारचे गुन्हे कोण करू शकेल हे आधीच ओळखून त्यांना प्रतिबंध करणे शक्य झाले आहे. Internet चा वापर करून इस्रोने विकसित केलेल्या Satellite च्या मदतीने विविध विषयातील दहा न्याय वैद्यक ह्यांची मदत घेऊन गुन्ह्याच्या तपास करणार्या पोलीसांना गुन्ह्यामधे नेमका काय तपास करावा ह्या सूचना Video च्या माध्यमातून देणे आवश्यक आहे. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या पोलीसांना अचूक मार्गदर्शन मिळेल व नंतर ती गुन्ह्याची
जागा पुनःपुनः सादर करणे (Re-construction of crime scene) शक्य होईल. गुन्ह्याच्या जागेवरील केस, धुळीचे कण, जंतू किंवा रसायने हे अतिसूक्ष्म पुराव्यांच्या मदतीने Thermal scanners वापरून जागच्या जागीच गोळा करणे शक्य झाले आहे. Cyber गुन्ह्यात देखील त्या ठिकाणी उपलब्ध गोष्टी अन्यत्र हलविल्याने Cyber Value बदलते त्यामुळे Digital Cyber Forensic Lab च्या मदतीने घटनास्थळी तपास पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शवविच्छेदन सुद्धा Digitally Centralized Recording वापरून करणे आवश्यक आहे ज्यामुळे मृतव्यक्तीचा योग्य सन्मान राखला जाईल व तरीही अचूक पुरावे मिळतील. ह्यासाठी तंत्रज्ञान व गुन्ह्यांच्या तपासाचे शास्त्र ह्यांचा पूर्ण समन्वय होणे आवश्यक आहे. नुकत्याच, महाराष्ट्रशासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी Mobile Forensic Lab पुरवून तंत्रज्ञान तळापर्यंत पोचविण्याची सुरवात केली आहे, परंतु त्यात वेगाने वर उल्लेखलेले बदल करणे जरुरीचे आहे.