Browsing Category

Videos


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Videos

PFI वरील बंदी व त्यानंतर पुढे

By on October 20, 2024

PFI वरील बंदी व त्यानंतर पुढे-

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलीस महासंचालक

www.praveendixit.com

9765551133

1998 मधे लालकृष्ण अडवाणी भाताचे गृहमंत्री असतांना कोइमतुर येथे निवडणुकीची प्रचारसभा घेण्यासाठी गेले होते त्यावळेला AL UMAH ह्या संघटनेने बाँबस्फोट केले होते. नंतर ही संस्था PFI मधे सामील झाली. 2002 मधे सिमी ह्या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली. त्यामुळे त्यातील अनेक व्यक्तींनी PFI मधे प्रवेश केला. 2006 मधे PFI ची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी एक वर्ष आधी मुसलमानांच्या तीन गटांचे एकत्रीकरण झाले. ते होते

 National Democratic Fund,

Karnataka Forum For Dignity

Manitha Neethi Pasarai, Tamilnadu

ह्या संघटनेने स्वतःला वंचित, शोषित व अत्याचाराने पीडलेल्या लोकांचा उद्धार हे उद्दिष्ट जाहीर केले होते. ही संघटना दक्षिण भारतात जरी बनवली तरी इतर मुस्लिम संघटनांना सामिल करून तिचा सर्व देशात प्रसार झाला. एवढेच नव्हे तर मालदीव्ज, मॉरिशस व अन्य अनेक देशातही PFI ची वाढ झाली. तुर्की व कतार ह्या देशातून PFI ला मोठा पाठिंबा मिळत होता. तुर्कीचा मुख्य एर्दोगन ह्याला खलिफत चा मुख्य व्हायची महत्वाकांक्षा आहे व त्यामुळे तो भारतातील मुसलमान तरुण मुलांना हेरून तुर्कीत शिकण्यासाठी शिष्यवृत्या देउन बोलावतो व नंतर त्यांना ISIS च्या ताब्यात देतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध प्रचार करण्यात तुर्की आघाडीवर आहे. कतार मधे नोकरीनिमित्त गेलेल्या मुसलमानांना जबरदस्तीने PFI ला देणग्या द्यायला लावल्या जात होत्या.   Pro- Al Quaida and Pro- ISIS असे PFI मधे दोन गट होते.  PFI चे देशपातळीवरील 13 ही सदस्य हे पुरुष आणि मुसलमान होते. केरळमधे ह्या संघटनेचे खूप मोठ्या प्रमाणावर cadre based सदस्य होते. खालील संस्था PFI शी निगडीत होत्या.

Rehab Foundation ह्या संस्थेने अनेक दिव्यांग लोकांना ह्या संस्थेमार्फत पुनर्वसनाच्या नावाखाली शरीराचे भाग विकणे, शस्त्रांची बेकायदेशीर आयात व अन्य गोष्टीत अडकवले असण्याची शक्यता आहे.

Campus Front of India अनेक तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांच्या मार्फत विरोधकांच्या हत्या करणे, रा. स्व.संघा च्या सदस्यांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती काढणे हे काम ते करत होते.

All India Imams Council इमामांच्या मार्फत कट्टरवादी प्रचार करणे.

National Confederation of Human Rights Organazation अनेक आंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांशी संबन्ध ठेवणे, न्यायालयात खटले चालवणे हे काम हे करत होते.

National Woman’s Front लव जिहादचे काम करणे.

Junior Front, Empower India Foundation

Rehab Foundation Kerala

          28/9/2022 रोजी PFI वर बंदी घालतांना भारत सरकारने जाहीर केले आहे की, PFI आणि त्यांच्या वरील संस्था तरूण, विद्यार्थी, महिला, इमाम, वकील व इतर दलित घटकांमधे प्रचार प्रसार करून निधी गोळा करत होते व PFI ला मजबूत करायचे काम करत होते. त्यांचा गुप्त उद्देश होता की, तरुणांना कट्टरवादी बनवायचे व त्यांच्या माध्यमातून लोकशाही प्रणालीवर घाव घालायचा. RSS चे नेते, तसेच भारत भेटीवर आलेले ज्यू ह्यांना tourist ठिकाणी ठार मारायचे. PFI च्या सदस्यांचे सिमी, जमात उल् मुजाहिदीन बांगला देश आणि ISIS ह्या जागतिक दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ संबंध होते. त्यातल्या अनेकांनी ISIS मधे भाग घेतलेला होता व त्यातले काही इराक, सिरीया मधील युद्धात ठार झालेले आहेत. तर काही परत आल्यानंतर त्यांना राज्य पोलीसांनी अटक केली आहे. बंदी नंतर 1250 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

          PFI ने त्यांचे काम इजिप्त मधील Muslim Brotherhood ह्या संस्थेप्रमाणे चालवले होते. स्वतःच्या कुटील कारवाया लपवून संकेतस्थळांवर उदात्त विचार मांडायचे, त्यातून संघटना बळकत करायची, परंतु गुप्तपणे तरुणांना कट्टरवादी बनवायचे. संघटनेशी संबंधित सर्व गटांचे काम, त्यांची संकेतस्थळे कायद्याच्या चौकटीत आहेत असे वाटतील अशी खात्री केलेली असे. PFI ला मिळणारा बहुतेक निधी त्यांच्या समर्थकांक़डून देणग्यांच्या स्वरूपात घेतला जाई. Muslim Brotherhood सुद्धा इजिप्त व युरोपातील मुसलमानांच्या उद्धारासाठी काम करत आहोत असे दाखवत असे. PFI देखील संकेतस्थळावर स्वत;ला गरीब, मागास मुसलमानांसाठी काम करतो असे दाखवत असे, त्यामुळे  PFI  किंवा त्यांच्या संकेतस्थळावर बंदी आणणे सोपे नव्हते.

ह्या संबंधी तेलंगाणा पोलीसांनी हैद्राबाद येथे नुकतीच (5/10/2022) माझ हसन फरुक (29), अब्दुल जहेद आणि महम्मद समिउद्दीन ह्यांना दसर्‍याच्या मिरवणुकीमधे दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी अटक केली ही घटना विचार करायला लावणारी आहे. त्यांच्या कडून 4 ग्रेनेड व 5 लाख रुपये जप्त करण्यात आले. सप्टेंबर 2014 मधे त्यावेळी 21 वर्षाच्या माझने त्याचा चुलत भाऊ महम्मद अब्दुल्ला बसीद ह्याच्या बरोबर पॅलेस्टाईन, सिरिया किंवा इराक ह्या ठिकाणी जिहादसाठी जायचे ठरवले होते. ते पश्चिम बंगालमधे गेले होते व तेथून त्यांना ढाक्कामार्गे अफगाणिस्तानला जायचे होते. परंतु त्यांच्या पालकांनी मुलगा हरवल्याची तक्रार केल्याने तेलंगाणा पोलिसांनी त्यांना पश्चिम बंगालमधील मालदा येथे शोधून परत आणले. त्यानंतर त्यांचा कट्टरवादीपणा कमी करण्याच्या कार्यक्रमात मार्गदर्शकांनी त्यांच्या पालकांच्या समक्ष अनेक तास समजूत घातली. त्यानंतर 1 वर्षानी अटक केलेल्या तिघांनी पुन्हा एकदा युद्धात जाण्याचा निर्णय घेतला. ते श्रीनगर येथे जाणार होते व तेथून स्थानिक दहशतवाद्यांच्या सहाय्याने ते इस्लामिक स्टेट (IS) मधे जाण्यासाठी सिरीया किंवा इराकमधे जाणार होते.

PFI च्या बँकेतील खात्यांची चौकशी केल्यानंतर त्यात असलेले पैसे व खातेधारक ह्यांची उपलब्ध माहिती योग्य न आढळल्याने Income Tax ने PFI चे registration रद्द केले होते.

 मिळालेल्या पुराव्यावरून उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात ह्या राज्यांनी PFI वर बंदी घालण्याची मागणी केली होती. ह्या राज्यात तसेच दिल्ली येथील दंगलीत PFI चा सहभाग असल्याचा आरोप आहे. नूपुर शर्मा ह्यांचे भाषण किंवा हिजाब बंदी विरुद्ध आंदोलन करून विशेष महत्त्व नसलेल्या घटनांचा बाऊ करून असंतोष पसरवायचा त्यांचा उद्देश होता. तसेच अनेक मुस्लिम देशांना भारताविरुद्ध उचकवून भारतालाही माघार घ्यायला लावण्यात आली होती.

S.D.P.I.  हा राजकीय पक्ष हा PFI चा राजकीय पक्ष म्हणून काम करतो असा संशय आहे. ह्या राजकीय पक्षाच्यावतीने जवळ जवळ 800 नगरसेवक विविध राज्यांमधे निवडून आले आहेत. ही राज्ये खालील प्रमाणेः कर्नाटक, केरळ, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र. ह्या पक्षाने मुस्लिम आणि दलित ह्यांच्या एकीतून लोकसभेसाठी 60 ठिकाणे नक्की केली आहेत; असे S.D.P.I.  चे नॅशनल जनरल सेक्रेटरी इल्यास महम्मद थुंबे ह्यांनी सांगितले. अश्रफ मौलवी, केरळ प्रांताचे अध्यक्ष ह्यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष हा पारदर्शीपणे काम करतो व तो आर्थिकदृष्ट्या तसेच विचारदृष्ट्या वेगळा आहे व ते घटनेने दिलेल्या अधिकारांप्रमाणे मुसलमान, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी ह्यांच्यासाठी जून 2009 पासून काम करीत आहेत व ह्या पक्षाविरुद्ध घटनाविरोधी काम करण्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष M. K. Faizy ह्यांनी सांगितले की, PFI वरील बंदी म्हणजे देशात अघोषित आणीबाणी आहे.थुंबे ह्यांच्या मते, भ्रष्टाचाराविरुद्ध तसेच दारू व ड्रग्ज ह्या विरुद्ध असणारा कोणीही भारतीय नागरीक जो इतर राजकीय पक्षांचा सदस्य नाही, तो 5 रुपये देऊन त्यांचा सदस्य होऊ शकतो. ह्या मौलवीने पुढे सांगितले, त्यांच्या सदस्यांनी केलेला हिंसाचार ते माफ करत नाहीत. ह्या राजकीय पक्षाचे काही वरिष्ठ नेते हे PFI चेही वरिष्ठ नेते होते परंतु, ह्या राजकीय पक्षाने त्वरित PFI पासून दूर असल्याचे घोषित केले आहे.

 

2010 मधे NewMan College इडुकी, केरळ येथील प्राध्यापक T. J. Joseph ह्यांनी एक प्रश्नपत्रिका तयार केली होती. त्यातील प्रश्न हे प्रेषिताविरुद्ध आहेत असे म्हणत PFI च्या सदस्यांनी प्राध्यापक T. J. Joseph चर्चमधून परत येत असतांना त्यांचा हात कापला. त्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले व 2014 साली निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले व निवृत्तीचा कार्यक्रम करण्यात आला परंतु तो पर्यंत त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. PFI वर बंदी घातल्यानंतर प्राध्यापक T. J. Joseph यांनी सांगितले की PFI ला मुसलमानराज्य स्थापायचे होते व त्यासाठी ते हिंसाचार करत होते. प्राध्यापक T. J. Joseph ह्यांच्या मते 2010 मधे त्यांच्यावर हल्ला झाला त्याच वेळेस त्यावेळच्या शासनाने बंदी घातली असती तर नंतर ठार मारलेल्या अनेकांचे प्राण वाचले असते.

न्यायालयात NIA ने सांगितले की PFI व त्यांच्या इतर संघटनांनी सहज जाळ्यात सापडणार्‍या अनेक तरुणांना लष्कर इ तयबा, इस्लामिक स्टेट व अल कायदा ह्या दहशतवादी संघटनांमधे सदस्य होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. भारतामधे हिंसाचार व दहशतवादी कृत्ये करून हिंसक जिहाद करून त्यांना 2047 पर्यं मुसलमान राज्य स्थापन करायचे होते.  NIA च्या मते शासनाविरुद्ध विशिष्ट वर्गात असंतोष पसरवून लोकांच्यात विद्वेष निर्माण करायचा होता.

PFI ला पर्यायी न्यायव्यवस्था स्थापन करून आपण करत असलेला हिंसाचार योग्य आाहे हे दाखवायचे होते व विविध धर्मांमधे असंतोष निर्माण करायचा होता.

  NIA च्या मते PFI कडून जप्त केलेल्या कागदपत्रांमधे असे दिसते की विशिष्ट धर्माच्या लोकांना ठार मारण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. 2016 ते 2022 पर्यंत PFI ने ठार मारलेल्या 9 पैकी 6 जण RSS चे सदस्य होते. तर SFI च्या आदिवासी मुलांचा नेता असलेल्या अभिमन्यूसही एर्नाकुलम् येथे ठार मारण्यात आले.

ED ने केलेल्या तपासाप्रमाणे गेल्या काही वर्षात PFI च्या खात्यात 120 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे पैसे भारतातून तसेच परदेशातून आले आहेत व त्यांचा उपयोग गैरकायदेशीर कृत्यांसाठी केला गेला. त्यांचा उपयोग करून 2020 मधे दिल्लीत दंगे घडवण्यात आले, तसेच K.A. Rauf Sherif जो PFI सदस्य व CFI (Campus Front of India) चा National General Secretary होता, त्याने परदेशातून 1.36 cr. जमा केले व निर्यातीच्या सामानासाठी आहेत असे दाखविले. त्याने हथरस उत्तरप्रदेश येथे दंगा करण्यासाठी 4 लोक पाठवले होते. त्यात त्याला फेब्रु. 2021 मधे अटक करण्यात आली.

 ED च्या तपासाप्रमाणे केरळ येथील Munnar Villa Vista हा घर बांधणी प्रकल्प करायचा होता आणि मिळवलेले पैसे तिकडे वळवायचे होते.  PFI चा कोषाध्यक्ष P. Koya ह्याने ED ला सांगितले की PFI ला परदेशातून पैसे मिळाले नाहीत. पण ED च्या तपासाप्रमाणे गल्फ देशातील हजारो लोकांनी जे PFI चे सक्रीय सदस्य आहेत त्यांनी PFI च्या अकांउंटमधे पैसे सामील केलेले नाहीत म्हणजे ते हवाला मार्गे PFI च्या सदस्यांच्या खात्यात आलेले आहेत.

120 कोटी कोणाकडून मिळाले ह्याचा सध्या तपास यंत्रणा तपास करीत आहेत. मल्लपुरम् व कोइिकोडे ह्या जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, ह्यांनी PFI च्या खात्यात पैसे पाठवल्याचे आढळले आाहे. मल्लपुरम् येथे राहणार्‍या अबूबकर पझेदाथ याचे निवासस्थान व कार्यालय येथून सोने व मोठी रोकड रक्कम ED ने नुकतीच जप्त केली होती. राजनैतिक अधिकार्यांना असलेल्या सवलतींचा गैरफयदा घेउन हे सोने भारतात आणले गेल्याचा संशय आहे. या व्यक्तीचा PFI शी थेट संबंध नसला तरी बंदी घलण्यात आलेल्या या संघटनेच्या खात्यात पैसे हस्तांतरित करीत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. अबू बकरशी संबंधित असलेल्या अन्य काही उद्योजकांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर काहींनी आपल्याकडील काळा पैसा PFI ला देणगी म्हणून दिल्याचे वृत्त आहे. कोट्टाकल, चनकुवेट्टी, इदरीकोड, रानदधानी आणि पोनमला या मल्लपुरम् जिल्ह्यातील गावामधील फर्निचरचे व्यापारी, दागिन्यांचे दुकानदार,पर्यटन व्यावसायिक यांच्या कार्यालयांची झ़डती  घेउून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. PFI चा नेता मोहम्मद शेफिक ह्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास होत आहे.  हे पैसे 2020 साली दिल्लीत झालेल्या दंगलीवर खर्च केल्याचा आरोप होत आहे.

18 October 2024 रोजी ED ने 35 स्थावर मिळकती ज्यांची किंमत 56.56 कोटी आहे जप्त केल्याचे सांगितले, ह्या मिळकती PFI नियंत्रित करीत होती व त्याचा फायदा त्यांनाच मिळत होता. तपासात निष्पन्न झाले की PFI चे गल्फ मधे कुवेत, ओमान,कतार, सोदी अरेबिया, UAE, तसेच सिंगापुर मधे 13000 सक्रीय सदस्य आहेत. भारताबाहेरील ह्या लोकांची District Executive Committee (DEC) स्थापन करून त्यांना निधी गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. हा निधी हवाला तसेच संशयित बँक माध्‌यमातून PFI च्या दहशतवादी व संशयित कारवायांसाठी वापरला जात असे. पैसे कोणी दिले आहेत, ते कळणार नाही ह्याची खात्री केली जात असे. PFI च्या घटनेत दिलेल्या समाजसेवा ह्या उद्दिष्टांपेक्षा हा पैसा भारतात जिहाद मार्गे इस्लामिक चळवळ वाढवण्यासाठी वापरला जात होता. त्याचा उपयोग हिंसक कृत्ये करण्यसाठी केला जात असे.समाजात विद्वेष पसरवणे, अशांतता निर्माण करणे, भारताचे सार्वभौमत्व  कमी करणे व गृह युद्धाची तयारी करणे हे खरे उद्दिष्ट होते. त्यासाठी,  शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली विविध प्रकारे ठोसे, लाथा  मारणे, लाठी चालवणे, सुरा चालवणे ह्यामधून गृह युद्धाची तयारी करून घेतली जात होती. त्यातील काही प्रकार असे होते; Steps for preparation for civil war, by creating unrest and strife in the society that includes Non-violent air raids, Guerilla Theatre, Alternative Communication Systems, etc. Methods of cruelty and subjugation include Haunting officials, Taunting officials, Fraternization, Mock Funerals, Interdict, Lysistratic Non-action (means withhold sex from someone in order to achieve something) etc. सार्वभौमत्व व भारताची एकी कमी करण्यासाठी कायदे भंग करणे, दोन सार्वभौमत्व मानणे, समांतर सरकार चालवणे,गुप्त हेरांची माहिती उघड करणे हे प्रकार होते. हे सर्व प्रशिक्षण वर्ग खोट्या मालकीच्या नावाने चालवले जात होते, PFI च्याा नावे एकही जागा नव्हती. असाच एक वर्ग 2013 नारा शस्त्र प्रशिक्षणाचा होता ज्यात दारुगोला व शस्त्रे वापरून दोन धर्मात तेढ निर्माण करणे व त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी तयार केले जात होते.  (https://timesofindia.indiatimes.com/india/arms-training-disguised-as-pe-classes-goal-was-civil-war-ed-gives-fresh-details-on-pfis-agenda-methods/articleshow/114354006.cms )

अनीस अहमद National General Secretory, PFI ह्याने Computer Applicatin मधे पोस्टग्रॅज्युएशन केले आहे. तो बंगळूरू येथे ग्लोबल टेक्निकल अधिकारी होता. PFI चा अध्यक्ष सलाम ह्याने रसायनशास्त्रात कालिकत येथून मास्टर्स केले होते व तो इलेक्ट्रिसिटी बोर्डात काम करत होता. 2010 पासून PFI विरुद्ध 1400 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. NIA ने तपास केल्यानंतर 46 व्यक्तींविरुद्ध दोषारोप शाबीत झाले होते. त्यातील 21 जण PFI चे सदस्य होते 2013 मधे कन्नूर, नारथ येथे शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिर चालवल्या बद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

असे असले तरीही सर्व मुसलमान PFI च्या विचारसरणीचे आहेत असे समजणे बरोबर नाही. जसे All Indiia Pasmanda Muslim Mahaz a leading organization of Pasmanda Muslims ह्या संघटनेने बंदीचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते कट्टरवादी व दहशतवादी विचाराच्या मुस्लीम संघटना तरुणांना दहशतवादी बनवत आहेत. व हे इस्लाम च्या शिकवणी विरुद्ध आहे. तसेच, All India Imam Organisation Chief Umar Ahmad Ilyasi ह्यांच्या विनंतीप्रमाणे RSS चे सरसंघचालक 30 September रोजी त्यांना दिल्लीत भेटले. ह्या साठी त्यांना सत धमकीचे फोन येत आहेत. पण त्यांनी स्ष्ट केले की ते सरसंघचालक भागवत ह्यांना राष्ट्र पिता समजतात व ते त्यावर खंबीर आहेत.

टिपु सुलतान Front नावाने एक संस्था स्थापन करून त्यातून गैरकायदेशीर गोष्टींना सुरवात करण्यात आली आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी NIA ने PFI च्या दुसर्‍या फळीतील नेत्यांवर लगाम करण्यासाठी केरळमधील 56 ठिकाणांवर धाडी टाकल्या. PFI ला नव्या नावाने सक्रीय करण्याची तयारी त्या संघटनेच्या सदस्यांनी केल्याचा प्रकार उजेडात आला. कर्नाटकच्या शिमोगामधे PFI च्या समर्थकांनी भिंतीवर नव्या घोषणा लिहील्या होत्या. ह्या घोषणांमध्ये Join CFI असा उल्लेख केला आहे. पोलीसांच्या मते CFI (Campus front Of India) ही PFI शी संलग्न आहे. दोन्ही संघटना आपल्या `कॅडर’ च्या कारवाया पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात होत्या.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) प्रतिबंधित इस्लामी कट्टरपंथी संघटना Popular Front of India (PFI) शी संबंधित आणखी एका सदस्याला अटक केली. मोहम्मद मुबारक असे त्याचे नाव असून तो केरळ उच्च न्यायालयात वकील आहे. आरोपी मुबारक केरळ मधील एर्नाकुलमचा रहिवासी असून, तो संघटनेतील सदस्यांना हत्या करण्याचे प्रशिक्षण देत असल्याची महिती NIA ने दिली. NIA ने दिलेल्या माहितीनुसार “मोहम्मद मुबारक `PFI च्या’ देशभरातील सदस्यांना मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देत असे. बंदी घातलेल्या संघटनेच्या सदस्यांना `टार्गेट’ कसे संपवायचे हेही तो शिकवत असे. मुबारकच्या घरातून पिशवीत लपवून ठेवलेली कुर्‍हाड आणि तलवारींसह आणखी काही शस्त्रेदेखील जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे बॅडमिंटन बॅगेत ठेवण्यात आली होती. अटक करण्यात आलेला वकील मोहम्मद मुबारक वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिट स्क्वाड चालवत होता,’’ असे NIA ने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. NIA ने 2 तासाच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्याला अटक केली आहे. मुबारकची पत्नीदेखील वकील आहे.

बंदी च्या काळात सुरक्षा यंत्रणा अनेक बाबी शोधून काढल्या संबंधितांवर दोषरोप पत्र पाठवण्यात आले. दिल्‌ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश शर्मा ह्यांच्यासमोर सुनावणी होउन बंदी कायम ठेवण्याचा निर्णय 20 मार्च 2023 रोजी देण्यात आला.

 देश विघातक प्रवृत्ती, येणार्‍या काळात वाढू द्यायच्या नसतील तर योग्य विचार करणार्‍या मुसलमान महिला व पुरुषांना अन्य समाजानेही पाठिंबा द्यायला पाहिजे. तसेच अन्याय ग्रस्त मुसलमानांना पोलिस व न्यायालयाकडे तक्रार करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्यातून कदाचित फरक पडू शकेल. मुस्लिम मनातील कट्टरता व धर्मांधता संपवण्यासाठी शासन, प्रशासन याचबरोबर मुस्लिम समाज ह्यांनीही पुढाकार घेण्याची जरूर आहे. मुसलमानांना स्वतःहून मुख्य प्रवाहात यावे लागेल, अन्यथा त्यांच्याकडेही संशयानेच पाहिले जाणार त्यामुळेच PFI किंवा अन्य कुठल्या नावाने कट्टरवादी सक्रीय होणार नाहीत.

       ————–    ——-  ——————-

 

 

 


VIEW POST

View more


VIEW POST

View more


VIEW POST

View more


VIEW POST

View more


VIEW POST

View more


VIEW POST

View more


VIEW POST

View more


VIEW POST

View more
Videos

भारतातून होणारी मानवी तस्करी

By on January 2, 2024

भारतातून होणारी मानवी तस्करी

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलीस महासंचालक

नुकतेच 303 भारतीय प्रवाश्यांना मंबईहून दुबईमार्गे निकारागुवाकडे घेऊन जाणारे विमान मानवी तस्करीच्या संशयामुळे फ्रांसमधील पॅरीस जवळील ‘वात्री’ विमानतळावर उतरले असताना पोलिसांनी त्याची चौकशी केली. ह्यातील 21 व्यक्ती हया गुजरातमधील मेहसाणा भागातील होत्या. अन्य प्रवासी भारताच्या इतर भागातून आलेले होते. एअर बस A340 विमान रुमेनिया स्थित लिजंड एअर लाईन्स तर्फे वापरण्यात येत होते. फ्रेंच अधिकार्‍यांना मिळालेल्या निनावी माहितीप्रमाणे ह्या व्यक्तींजवळ आप्रवासासाठी (Immigration) आवश्यक कागदपत्रे नव्हती व ते संभावित मानवी तस्करीमधे अडकलेले असावेत असा संशय होता. निकारागुवा येथे जाणार्‍या हे विमान पूर्व नियोजित इंधन भरतीसाठी वात्री विमानतळावर उतरले असता मधल्या वेळात फ्रेंच पोलिसांनी मानव तस्करीच्या संशयावरून ह्या व्यक्तींची विचारपूस करायला सुरवात केली. फ्रेंच पोलीसांच्या तपासात मानवी तस्करी संबधीच्या आरोपांना दुजोरा देतील असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. पण 23 व्यक्तींनी फ्रेंच न्यायालयाकडे आमचा भारतात छळ होत आहे व त्यामुळे आम्हाला फ्रांसमधे निर्वासित म्हणून घोषित करावे व आसरा द्यावा अशी मागणी केली. फ्रेंच न्यायाधीश सदर व्यक्तींची विचारपूस करत आहेत. व सध्या त्यांना पॅरीस येथे ठेवण्यात आले आहे. इतर व्यक्तींना घेऊन निकारागुवा ऐवजी हे विमान पुन्हा मुंबईला पाठविण्यात आले. परत आलेल्या व्यक्तींची संबधित राज्यातील पोलीस सखोल चौकशी करत आहेत. गुजरात पोलिसांनी सखोल विचारपूस केल्यावरती एकाही व्यक्तीने मानवी तस्करीशी आपला काही संबंध होता असे उघड केलेले नाही. बहुतेक प्रवाश्यांनी सांगितले की, ते सुट्टीसाठी चालले होते. व त्यांच्या विरुद्ध मानवी तस्करीचा कोणताही पुरावा मिळालाा नाही.

जरी कोणताही पुरावा मिळाला नसला तरीही मानवी तस्करीचा संशय कायम आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कोणत्याही विशिष्ट देशात जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सदर व्यक्तींजवळ नव्हती. निकारागुवा हा मध्य अमेरिकेतील देश असून त्याचा उपयोग करून जमिनीमार्गाने अमेरिकेत (USA) बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवायची जागा पाहिले जाते. निकारागुवा येथे जाण्यासाठी व्हिसा लागत नाही, व अमेरिकेशी वैर असल्यामुळे, अमेरिकेत बेकायदेशीरपणे जाणार्‍्या लोकांना निकारागुवा शस्त्रासारखा वापर करुन प्रोत्साहन देत आहे, असा संशय आहे.  

  मानवी तस्करी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारी अत्यंत गुंतागुंतीची घटना आहे. मानवी तस्करीमधे प्रामुख्याने महिला व मुले हे बळी असतात; परंतु पुरूषांची मानवी तस्करीही मोठ्या प्रमाणावर होत असते. दर वर्षी सहा ते आठ लाख व्यक्तींची मानवी तस्करी होते. व हा आकडा दरवर्षी वाढत आहे. मानवी तस्करी केलेल्या व्यक्तींना देहविक्रय, खाणकामगार, शेतमजूर, घरगुती कामगार आणि इतर अनेक प्रकारच्या इच्छा नसलेल्या गुलामगिरीत काढावे लागतात. सदर व्यक्तींना बळजबरीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शोषण करण्यासाठी वापरले जाते. मोठ्या प्रमाणातील बेरोजगारी व सरकारी अधिकार्‍यांची निष्क्रियता ह्याला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. ह्यामधे गरिबी हे एक मोठे कारण आहे. मानवी तस्करीमधे आंतर्राष्ट्रीय संघटित गुन्हेगारी दिसून येते. त्यातून होणार्‍या नफ्यामुळे संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार, शस्त्रांस्त्रांचा व्यापार मोठ्या प्रमाणात केला जातो. ह्यामुळे सर्वच देशांना फार मोठा सुरक्षेचा धोका उद्भवतो. देहव्यापार ह्याशिवाय एखाद्या व्यक्तीस बळजबरीने, फसवणुकीने, खोटी आमिषे दाखवून गुलामासारखी कामे करायला लावणे, मानवी तस्करीत आढळून येते. मानवी तस्करीतील व्यक्तींना अन्यायाविरुद्ध लढण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसते. कारण सर्वच देश त्यांना बेकायदेशीरपणे ते देशात आले आहेत व त्यांनी चुकीचे काम केले आहे असे समजतात. परंतु त्यातून फायदा मिळवणारे दलाल मात्र कुठल्याही शिक्षेशिवाय निसटून जातात.

मानवी तस्करी करणार्‍यांमधे नातेवाईक, पालक, मित्र, शाळेतील शिक्षक, गावातील प्रमुख व्यक्ती, प्रवास आयोजित करणार्‍या संस्था, नोकरी देणारे दलाल, अनेक देशांमधे असणारे संघटित गुन्हेगार, वेश्यावृत्तीशी निगडित दलाल तसेच भ्रष्ट पोलीस, कस्टम्स, इमिग्रेशन, सीमासुरक्षा अधिकारी जबाबदार आहेत. महिला व मुलांच्या व्यतिरिक्त ज्या पुरूषांना आपले कायदेशीर अधिकार माहित नाहीत ते ही तस्करीचे बळी ठरतात. 

महाराष्ट्र सरकारने नुकताच सुरू केलेला कौशल्य विकास उपक्रम देशातील सर्व राज्यात तातडीने आमलात आणण्याची आवश्यकता आहे. केवळ औद्योगिक शिक्षण संस्थांमधेच कौशल्य विकासाचे धडे देण्यापर्यंत मर्यादित न राहता, शाळेतील तसेच शाळे बाहेरीलही बारा वर्षाच्या वरील सर्व मुला मुलींना कौशल्य विकासाचे पाठ देणे जरूरीचे आहे. जगातील अनेक विकसित देशांमधे तेथील वृद्धांची संख्या वाढल्यामुळे काम करण्यास तरूण व्यक्ती उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनातर्फेच अशा देशांशी करार करून तेथे आवश्यक कौशल्ये भारतातील तरूणांना उपलब्ध केली व त्या देशांशी सर्व खबरदारी घेऊन सेवा पुरवणार्‍्या व्यक्तींचे योग्य ते करार केले तर मानवी तस्करीच्या ह्या संघटित गुन्ह्यांना थोडा लगाम लागण्याची शक्यता आहे. सध्याची Protector of Emigrants (Ministry of Labour) ही संस्था त्यात मोलाचे योगदान देऊ शकते. 

***************   *************   ***************




Widget Area

This section is widgetized. To add widgets here, go to the Widgets panel in your WordPress admin, and add the widgets you would like to Blog Sidebar.

*This message will be overwritten after widgets have been added