Articles

PFI वरील बंदी व नंतर पुढे!

By on October 13, 2022

1998 मधे लालकृष्ण अडवाणी भाताचे गृहमंत्री असतांना कोइमतुर
येथे निवडणुकीची प्रचारसभा घेण्यासाठी गेले होते त्यावळेला AL UMAH ह्या
संघटनेने बाँबस्फोट केले होते. नंतर ही संस्था PFI मधे सामील झाली. 2002
मधे सिमी ह्या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली. त्यामुळे त्यातील अनेक
व्यक्तींनी PFI मधे प्रवेश केला. 2006 मधे PFI ची स्थापना करण्यात आली.
तत्पूर्वी एक वर्ष आधी मुसलमानांच्या तीन गटांचे एकत्रीकरण झाले. ते होते

National Democratic Fund,
Karnataka Forum For Dignity
Manitha Neethi Pasarai, Tamilnadu
ह्या संघटनेने स्वतःला वंचित, शोषित व अत्याचाराने पीडलेल्या
लोकांचा उद्धार हे उद्दिष्ट जाहीर केले होते. ही संघटना दक्षिण भारतात जरी
बनवली तरी इतर मुस्लिम संघटनांना सामिल करून तिचा सर्व देशात प्रसार
झाला. एवढेच नव्हे तर मालदीव्ज, मॉरिशस व अन्य अनेक देशातही PFI ची
वाढ झाली. तुर्की व कतार ह्या देशातून PFI ला मोठा पाठिंबा मिळत होता.
तुर्कीचा मुख्य एर्दोगन ह्याला खलिफत चा मुख्य व्हायची हौस आहे व त्यामुळे
तो भारतातील मुसलमान तरुण मुलांना हेरून तुर्कीत शिकण्यासाठी शिष्यवृत्या
देउन बोलावतो व नंतर त्यांना ISIS च्या ताब्यात देतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर
भारताविरुद्ध प्रचार करण्यात तुर्की आघाडीवर आहे. कतार मधे नोकरीनिमित्त
गेलेल्या मुसलमानांना जबरदस्तीने PFI ला देणग्या द्यायला लावल्या जात
होत्या. Pro- Al Quaida and Pro- ISIS असे PFI मधे दोन गट होते.

PFI चे देशपातळीवरील 13 ही सदस्य हे पुरुष आणि मुसलमान होते. केरळमधे
ह्या संघटनेचे खूप मोठ्या प्रमाणावर cadre based सदस्य होते. खालील
संस्था PFI शी निगडीत होत्या.
Rehab Foundation अनेक दिव्यांग लोकांना ह्या संस्थेमार्फत पुनर्वसनाच्या
नावाखाली शरीराचे भाग विकणे, शस्त्रांची बेकायदेशीर आयात व अन्य गोष्टीत
अडकवले असण्याची शक्यता आहे.
Campus Front of India अनेक तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांच्या मार्फत
विरोधकांच्या हत्या करणे, रा. स्व.संघा च्या सदस्यांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती
काढणे हे काम ते करत होते.
All India Imams Council
National Confederation of Human Rights Organazation अनेक
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांशी संबन्ध ठेवणे, न्यायालयात खटले चालवणे
हे काम हे करत होते.
National Woman’s Front लव जिहादचे काम करणे.
Junior Front, Empower India Foundation
Rehab Foundation Kerala
28/9/2022 रोजी PFI वर बंदी घालतांना भारत सरकारने जाहीर
केले आहे की, PFI आणि त्यांच्या वरील संस्था तरूण, विद्यार्थी, महिला,
इमाम, वकील व इतर दलित घटकांमधे प्रचार प्रसार करून निधी गोळा करत
होते व PFI ला मजबूत करायचे काम करत होते. त्यांचा गुप्त उद्देश होता की,
तरुणांना कट्टरवादी बनवायचे व त्यांच्या माध्यमातून लोकशाही प्रणालीवर घाव
घालायचा. RSS चे नेते, तसेच भारत भेटीवर आलेले ज्यू ह्यांना tourist

ठिकाणी ठार मारायचे. PFI च्या सदस्यांचे सिमी, जमात उल् मुजाहिदीन बांगला
देश आणि ISIS ह्या जागतिक दहशतवादी संघटनेशी घनिष्ठ संबंध होते.
त्यातल्या अनेकांनी ISIS मधे भाग घेतलेला होता व त्यातले काही इराक,
सिरीया मधील युद्धात ठार झालेले आहेत. तर काही परत आल्यानंतर त्यांना
राज्य पोलीसांनी अटक केली आहे. बंदी नंतर 1250 व्यक्तींना अटक करण्यात
आली आहे.
PFI ने त्यांचे काम इजिप्त मधील Muslim Brotherhood ह्या
संस्थेप्रमाणे चालवले होते. स्वतःच्या कुटील कारवाया लपवून संकेतस्थळांवर
उदात्त विचार मांडायचे, त्यातून संघटना बळकत करायची, परंतु गुप्तपणे
तरुणांना कट्टरवादी बनवायचे. संघटनेशी संबंधित सर्व गटांचे काम, त्यांची
संकेतस्थळे कायद्याच्या चौकटीत आहेत असे वाटतील अशी खात्री केलेली असे.
PFI ला मिळणारा बहुतेक निधी त्यांच्या समर्थकांक़डून देणग्यांच्या स्वरूपात
घेतला जाई. Muslim Brotherhood सुद्धा इजिप्त व युरोपातील
मुसलमानांच्या उद्धारासाठी काम करत आहोत असे दाखवत असे. PFI देखील
संकेतस्थळावर स्वत;ला गरीब, मागास मुसलमानांसाठी काम करतो असे दाखवत
असे, त्यामुळे PFI किंवा त्यांच्या संकेतस्थळावर बंदी आणणे सोपे नव्हते.
ह्या संबंधी तेलंगाणा पोलीसांनी हैद्राबाद येथे नुकतीच (5/10/2022)
माझ हसन फरुक (29), अब्दुल जहेद आणि महम्मद समिउद्दीन ह्यांना
दसर्‍याच्या मिरवणुकीमधे दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी अटक केली ही घटना
विचार करायला लावणारी आहे. त्यांच्या कडून 4 ग्रेनेड व 5 लाख रुपये जप्त
करण्यात आले. सप्टेंबर 2014 मधे त्यावेळी 21 वर्षाच्या माझने त्याचा चुलत
भाऊ महम्मद अब्दुल्ला बसीद ह्याच्या बरोबर पॅलेस्टाईन, सिरिया किंवा इराक
ह्या ठिकाणी जिहादसाठी जायचे ठरवले होते. ते पश्चिम बंगालमधे गेले होते व
तेथून त्यांना ढाक्कामार्गे अफगाणिस्तानला जायचे होते. परंतु त्यांच्या पालकांनी
मुलगा हरवल्याची तक्रार केल्याने तेलंगाणा पोलिसांनी त्यांना पश्चिम

बंगालमधील मालदा येथे शोधून परत आणले. त्यानंतर त्यांचा कट्टरवादीपणा
कमी करण्याच्या कार्यक्रमात मार्गदर्शकांनी त्यांच्या पालकांच्या समक्ष अनेक
तास समजूत घातली. त्यानंतर 1 वर्षानी अटक केलेल्या तिघांनी पुन्हा एकदा
युद्धात जाण्याचा निर्णय घेतला. ते श्रीनगर येथे जाणार होते व तेथून स्थानिक
दहशतवाद्यांच्या सहाय्याने ते इस्लामिक स्टेट (IS) मधे जाण्यासाठी सिरीया
किंवा इराकमधे जाणार होते.

PFI च्या बँकेतील खात्यांची चौकशी केल्यानंतर त्यात असलेले पैसे व
खातेधारक ह्यांची उपलब्ध माहिती योग्य न आढळल्याने Income Tax ने PFI
चे registration रद्द केले होते.

मिळालेल्या पुराव्यावरून उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात ह्या राज्यांनी
PFI वर बंदी घालण्याची मागणी केली होती. ह्या राज्यात तसेच दिल्ली येथील
दंगलीत PFI चा सहभाग असल्याचा आरोप आहे. नूपुर शर्मा ह्यांचे भाषण किंवा
हिजाब बंदी विरुद्ध आंदोलन करून विशेष महत्त्व नसलेल्या घटनांचा बाऊ करून
असंतोष पसरवायचा त्यांचा उद्देश होता. तसेच अनेक मुस्लिम देशांना
भारताविरुद्ध उचकवून भारतालाही माघार घ्यायला लावण्यात आली होती.
S.D.P.I. हा राजकीय पक्ष हा PFI चा राजकीय पक्ष म्हणून काम
करतो असा संशय आहे. ह्या राजकीय पक्षाच्यावतीने जवळ जवळ 800
नगरसेवक विविध राज्यांमधे निवडून आले आहेत. ही राज्ये खालील प्रमाणेः
कर्नाटक, केरळ, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार
आणि महाराष्ट्र. ह्या पक्षाने मुस्लिम आणि दलित ह्यांच्या एकीतून
लोकसभेसाठी 60 ठिकाणे नक्की केली आहेत; असे S.D.P.I. चे नॅशनल
जनरल सेक्रेटरी इल्यास महम्मद थुंबे ह्यांनी सांगितले. अश्रफ मौलवी, केरळ
प्रांताचे अध्यक्ष ह्यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष हा पारदर्शीपणे काम करतो व
तो आर्थिकदृष्ट्या तसेच विचारदृष्ट्या वेगळा आहे व ते घटनेने दिलेल्या

अधिकारांप्रमाणे मुसलमान, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी ह्यांच्यासाठी
जून 2009 पासून काम करीत आहेत व ह्या पक्षाविरुद्ध घटनाविरोधी काम
करण्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. ह्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष M. K.
Faizy ह्यांनी सांगितले की, PFI वरील बंदी म्हणजे देशात अघोषित आणीबाणी
आहे.थुंबे ह्यांच्या मते, भ्रष्टाचाराविरुद्ध तसेच दारू व ड्रग्ज ह्या विरुद्ध
असणारा कोणीही भारतीय नागरीक जो इतर राजकीय पक्षांचा सदस्य नाही, तो
5 रुपये देऊन त्यांचा सदस्य होऊ शकतो. ह्या मौलवीने पुढे सांगितले, त्यांच्या
सदस्यांनी केलेला हिंसाचार ते माफ करत नाहीत. ह्या राजकीय पक्षाचे काही
वरिष्ठ नेते हे PFI चेही वरिष्ठ नेते होते परंतु, ह्या राजकीय पक्षाने त्वरित
PFI पासून दूर असल्याचे घोषित केले आहे.

2010 मधे NewMan College इडुकी, केरळ येथील प्राध्यापक T. J.
Joseph ह्यांनी एक प्रश्नपत्रिका तयार केली होती. त्यातील प्रश्न हे
प्रेषिताविरुद्ध आहेत असे म्हणत PFI च्या सदस्यांनी प्राध्यापक T. J. Joseph
चर्चमधून परत येत असतांना त्यांचा हात कापला. त्यांना कॉलेजमधून निलंबित
करण्यात आले व 2014 साली निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी त्यांना पुन्हा
सेवेत घेण्यात आले व निवृत्तीचा कार्यक्रम करण्यात आला परंतु तो पर्यंत त्यांच्या
पत्नीने आत्महत्या केली. PFI वर बंदी घातल्यानंतर प्राध्यापक T. J. Joseph
यांनी सांगितले की PFI ला मुसलमानराज्य स्थापायचे होते व त्यासाठी ते
हिंसाचार करत होते. प्राध्यापक T. J. Joseph ह्यांच्या मते 2010 मधे
त्यांच्यावर हल्ला झाला त्याच वेळेस त्यावेळच्या शासनाने बंदी घातली असती
तर नंतर ठार मारलेल्या अनेकांचे प्राण वाचले असते.

न्यायालयात NIA ने सांगितले की PFI व त्यांच्या इतर संघटनांनी
सहज जाळ्यात सापडणार्‍या अनेक तरुणांना लष्कर इ तयबा, इस्लामिक स्टेट

व अल कायदा ह्या दहशतवादी संघटनांमधे सदस्य होण्यासाठी प्रोत्साहन दिले
होते. भारतामधे हिंसाचार व दहशतवादी कृत्ये करून हिंसक जिहाद करून त्यांना
2047 पर्यं मुसलमान राज्य स्थापन करायचे होते. NIA च्या मते
शासनाविरुद्ध विशिष्ट वर्गात असंतोष पसरवून लोकांच्यात विद्वेष निर्माण
करायचा होता.

PFI ला पर्यायी न्यायव्यवस्था स्थापन करून आपण करत असलेला
हिंसाचार योग्य आाहे हे दाखवायचे होते व विविध धर्मांमधे असंतोष निर्माण
करायचा होता.

NIA च्या मते PFI कडून जप्त केलेल्या कागदपत्रांमधे असे दिसते
की विशिष्ट धर्माच्या लोकांना ठार मारण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. 2016 ते
2022 पर्यंत PFI ने ठार मारलेल्या 9 पैकी 6 जण RSS चे सदस्य होते. तर
SFI च्या आदिवासी मुलांचा नेता असलेल्या अभिमन्यूसही एर्नाकुलम् येथे ठार
मारण्यात आले.

ED ने केलेल्या तपासाप्रमाणे गेल्या काही वर्षात PFI च्या खात्यात
120 कोटी रुपये जमा झाले आहेत. हे पैसे भारतातून तसेच परदेशातून आले
आहेत व त्यांचा उपयोग गैरकायदेशीर कृत्यांसाठी केला गेला. त्यांचा उपयोग
करून 2020 मधे दिल्लीत दंगे घडवण्यात आले, तसेच K A Rauf Sherif जो
PFI सदस्य व CFI (Campus Front of India) चा National General
Secretary होता, त्याने परदेशातून 1.36 cr. जमा केले व निर्यातीच्या
सामानासाठी आहेत असे दाखविले. त्याने हथरस उत्तरप्रदेश येथे दंगा
करण्यासाठी 4 लोक पाठवले होते. त्यात त्याला फेब्रु. 2021 मधे अटक
करण्यात आली.

ED च्या तपासाप्रमाणे केरळ येथील Munnar Villa Vista हा घर
बांधणी प्रकल्प करायचा होता आणि मिळवलेले पैसे तिकडे वळवायचे होते.

PFI चा कोषाध्यक्ष P. Koya ह्याने ED ला सांगितले की PFI ला परदेशातून
पैसे मिळाले नाहीत. पण ED च्या तपासाप्रमाणे गल्फ देशातील हजारो लोकांनी
जे PFI चे सक्रीय सदस्य आहेत त्यांनी PFI च्या अकांउंटमधे पैसे सामील
केलेले नाहीत म्हणजे ते हवाला मार्गे PFI च्या सदस्यांच्या खात्यात आलेले
आहेत.

अनीस अहमद National General Secretory, PFI ह्याने
Computer Applicatin मधे पोस्टग्रॅज्युएशन केले आहे. तो बंगळूरू येथे
ग्लोबल टेक्निकल अधिकारी होता. PFI चा अध्यक्ष सलाम ह्याने
रसायनशास्त्रात कालिकत येथून मास्टर्स केले होते व तो इलेक्ट्रिसिटी बोर्डात
काम करत होता. 2010 पासून PFI विरुद्ध 1400 गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत. NIA ने तपास केल्यानंतर 46 व्यक्तींविरुद्ध दोषारोप शाबीत झाले होते.
त्यातील 21 जण PFI चे सदस्य होते 2013 मधे कन्नूर, नारथ येथे शस्त्रास्त्र
प्रशिक्षण शिबिर चालवल्या बद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

असे असले तरीही सर्व मुसलमान PFI च्या विचारसरणीचे आहेत असे
समजणे बरोबर नाही. जसे All Indiia Pasmanda Muslim Mahaz a
leading organization of Pasmanda Muslims ह्या संघटनेने बंदीचे
स्वागत केले आहे. त्यांच्या मते कट्टरवादी व दहशतवादी विचाराच्या मुस्लीम
संघटना तरुणांना दहशतवादी बनवत आहेत. व हे इस्लाम च्या शिकवणी विरुद्ध
आहे. तसेच, All India Imam Organisation Chief Umar Ahmad Ilyasi
ह्यांच्या विनंतीप्रमाणे RSS चे सरसंघचालक 30 September रोजी त्यांना
दिल्लीत भेटले. ह्या साठी त्यांना सत धमकीचे फोन येत आहेत. पण त्यांनी
स्ष्ट केले की ते सरसंघचालक भागवत ह्यांना राष्ट्र पिता समजतात व ते
त्यावर खंबीर आहेत.

बंदी च्या काळात सुरक्षा यंत्रणा अनेक बाबी शोधून काढतील. दिल्‌ली
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शर्मा ह्यांच्यासमोर आता सुनावणी होउन बंदी
राहणार किंवा कसे ह्याचा निर्णय होणार आहे.

सद्ध्या टिपु सुलतान Front नावाने एक संस्था स्थापन करून
त्यातुन गैरकायदेशीर गोष्टींना सुरवात करण्यात आली आहे. देश विघातक
प्रवृत्ती, येणार्‍या काळात वाढू द्यायच्या नसतील तर योग्य विचार करणार्‍या
मुसलमान महिला व पुरुषांना अन्य समाजानेही पाठिंबा द्यायला पाहिजे. तसेच
अन्याय ग्रस्त मुसलमानांना पोलिस व न्यायालयाकडे तक्रार करायला प्रोत्साहन
द्यायला पाहिजे. त्यातून कदाचित फरक पडू शकेल.
————– ——- ——————-

TAGS
RELATED POSTS

LEAVE A COMMENT